नमस्कार मित्रहो,
संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्याचे कार्य दीपस्तंभ करीत असतो. आपल्या आयुष्यरूपी जहाजाला सतत योग्य मार्गावर ठेवण्यासाठी याच संतवचनरूप दीपस्तंभाचा आधार नेहमी घेतला पाहिजे.
आज आषाढ शुद्ध द्वितीया, थोर दत्तावतारी सत्पुरुष योगिराज श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांची १०१ वी जयंती. या पावन तिथीचे औचित्य साधून आजपासून प. पू. श्री. मामांच्या अमृतमय व बोधप्रद वचनांचा आस्वाद आपण घेणार आहोत. कृपया या वचनांचे मन:पूर्वक वाचन-मनन करावे व फेसबुक, व्हॉट्सप, हाईक इत्यादी माध्यमांमधून ही सुवचने आपल्या परिचितांपर्यंतही पोहोचवावीत ही विनंती.
संतवचनांचे चिंतन आपल्या चित्ताचा समतोल टिकवून ठेवून आपल्याला सतत आनंदी व समाधानी ठेवते, व आजच्या जगात याच गोष्टी खूप दुर्मीळ झालेल्या आहेत. सुजाण वाचक आमच्या या उपक्रमास यशस्वी करण्यात भरपूर साहाय्य करतील याची आम्हांला खात्री आहेच !
0 comments:
Post a Comment