Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

29 August 2015

अमृतबोध - ८





ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते. ग्रंथ काही तुमच्या शंकांचे समाधान करू शकत नाहीत. ग्रंथांमध्ये जे सांगितलेले असते, त्या ज्ञानाचा श्रीसद्गुरूंच्या कृपेने जो अनुभव येतो, तोच आत्मानुभव होय. ग्रंथप्रचिती म्हणजेच शास्त्रप्रचिती ही गुरुप्रचितीशी जुळल्यानंतर मग जेव्हा आपण श्रीसद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन करून तो स्वत: अनुभव घेतो तेव्हाच आत्मप्रचिती लाभते. ही सर्व प्रक्रिया श्रीसद्गुरुकृपेशिवाय होत नाही व सद्गुरूंची पूर्णकृपा होण्यासाठी आपल्या चित्तात अपार सद्गुरुप्रेम असावे लागते. हे प्रेमही जन्म जन्मांतरी निष्ठेने केलेल्या सेवा व साधनेचेच मधुर फळ असते. असे सद्गुरुप्रेम ही शब्दांनी सांगता येणारी गोष्टच नाही, तो केवळ अनुभवाचाच प्रांत आहे.
श्रीसद्गुरु हे देखील शास्त्रज्ञान व स्वानुभव या दोन्ही बाबतीत पूर्ण अनुभवी असावे लागतात. तरच ते शिष्याचे सर्व बाजूंनी समाधान करून त्याला आत्मानुभव देऊ शकतात. म्हणून आत्मानुभव प्राप्त होण्यासाठी ' शाब्दे परे निष्णात ' अशा श्रीसद्गुरूंची पूर्णकृपा व्हावीच लागते, त्यासाठी अन्य कोणताही उपाय नाही, असे परम पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज येथे स्वानुभवपूर्वक सांगत आहेत. 
प. पू. सद्गुरु श्री. मामा महाराज देशपांडे म्हणतात, " ग्रंथांवरून होणारे ज्ञान अपुरे असून,
आत्मानुभव येण्यासाठी श्रीसद्गुरूंचीच कृपा व्हावी लागते. 
' सद्गुरुप्रेम ' हा शब्दाचा विषय नसून अनुभवाचा आहे. 
म्हणूनच सद्गुरु हे ' शाब्दे परे च निष्णातः '
असे असावे लागतात. 
आत्मानुभवासाठी श्रीगुरुकृपा व्हावीच लागते. "


( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.)
Read More

20 August 2015

अमृतबोध - 7


॥ अमृतबोध ॥

संशय हा अज्ञानाचा खास मित्र आहे; आणि अज्ञानी ही आपली खरी ओळख आहे. म्हणून हा संशय आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. व्यवहारात काहीवेळा संशय हा खबरदारीचा एक भाग म्हणून उपयोगी पडेल, पण परमार्थात मात्र तो आपले पूर्ण वाटोळेच करतो. भगवंत गीतेत स्पष्ट म्हणतात की, " संशयात्मा विनश्यति । " संशय जिथे असतो तिथे नाश होतोच.
साधनेला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा श्रीगुरुकृपा झालेली असली तरी आपले दोषही खूप असतात. साधनेने हळू हळू ते सर्व दोष नष्ट होतात हे अगदी सत्य असले तरी सुरुवातीच्या काळात हा संशय फार त्रास देतोच. ह्या दोषाच्या तावडीतून भले भले सुटलेले नाहीत, मग आपल्या सारख्या सामान्य साधकांची काय परिस्थिती होत असेल?
देव खरंच आहे का? इथून सुरुवात होऊन, आपल्याला सद्गुरूंनी नक्की अनुग्रह दिलाय ना? का ते विसरले आपल्याला? आपल्यावर नक्की त्यांचे कृपाछत्र आहे ना? अशा हजार रूपांनी हा संशय आपले मन ढवळून काढतो. या संशयाच्या तावडीत एखादा सापडला की कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी अवस्था होऊन जाते. जेवढी सुटण्याची धडपड जास्त करेल, तेवढा तो अधिकच गुंतत जातो
पण परम कनवाळू महात्म्यांनी यावरही सुंदर उपाय सांगून ठेवलेले आहेत. परम पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज या संशय राक्षसाचा हमखास नाश करण्याचा अचूक उपाय या बोधातून सांगत आहेत. साधकाची आपल्या श्रीसद्गुरूंप्रति श्रद्धा जितकी दृढ असेल तितका हा संशय लवकर नष्ट होतो. " श्रीसद्गुरु हे अत्यंत कनवाळू असून माझा सर्वतोपरि तेच सांभाळ करीत आहेत, मी त्यांच्या आज्ञेचे जसेच्या तसे पालन करून प्रेमाने साधनाच केली पाहिजे ", अशी आपली दृढ श्रद्धा असेल तर हा संशय आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही. श्रीगुरुचरणीं जो अनन्य भावाने शरण जाऊन नेमाने साधना करतो तो परमार्थमार्गात नि:संशय यशस्वी होतोच !!
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.)
Read More

11 August 2015

अमृतबोध - ६


⁠⁠⁠॥ अमृतबोध ॥

संतांना श्रीभगवंतांच्या कृपेने वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान झालेले असते. त्या स्वानुभवाच्या जोरावर संत अगदी मोजके व अर्थपूर्ण बोलतात. त्यांचे सांगणे म्हणूनच ' काळ्या दगडावरील पांढ-या रेघे'सारखे पूर्णसत्य असते.
पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज येथे महत्त्वाचा बोध करताना मन व चित्तातील फरक किती सहज सांगतात पाहा.
अग्नीच्या संपर्कात आलेली प्रत्येक गोष्ट अग्नीच्या दाहामुळे वितळते. तसे प्रपंचरूपी अग्नीच्या संपर्कात आलेले मनही पातळ होऊन आणखी सैरावैरा धावू लागते. तेच मन जेव्हा देवघरात ठेवले जाते, तेव्हा तेथील भगवंतांच्या स्थिर अधिष्ठानाच्या बळाने ते आपली संकल्प-विकल्पांची सततची सवय सोडून स्थिर होते. त्यावेळी त्याच मनाला चित्त म्हणतात.
जर आपले मन सतत घरातच राहिले तर त्याला नक्की ध्यान लागते, पण ते पत्नीचे. म्हणजे त्यातून पुन्हा प्रपंचातच राहतो आपण.
यावर अगदी नेमका उपाय सांगताना प. पू. मामा म्हणतात की, प्रपंच सतत बदलणारा असल्याने तो चंचल मनाने करावा. पण परमार्थ हा स्थिरतेकडे नेणारा असल्यामुळे काही प्रमाणात स्थिर झालेल्या चित्ताने परमार्थ करावा. अशी सावधता जर आपण बाळगली तर ते मन, नि:संशय, निर्विचार, निर्विकार आणि नि:संग होऊन परमपदापर्यंत आपोआप पोचते. म्हणून आपण प्रपंचात राहिलो तरी चालेल, पण प्रपंचाला आपल्या आत जाण्यापासून  हरप्रकारे रोखले पाहिजे.
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. )
Read More

7 August 2015

अमृतबोध - ५


॥ अमृतबोध ॥

संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. त्यामुळेच सामान्य माणसांच्या विचारांची पोच जिथे खुंटते तिथून पुढे केवळ संतच पाहू शकतात. यातही पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांचे अगदी वेगळेपण स्पष्ट दिसते. ते मोजके व नेमके सांगतात आणि छोट्याशा सूत्रातून प्रचंड अर्थ सहज मांडून जातात. त्यावर शांतपणे विचार केला की आपल्याला खूप मोठे बोधपाथेय त्यातून उपलब्ध होत असते.
आजचा त्यांचा विचार वरवर पाहता सहज सोपा वाटला तरी त्यातून साधकाच्या जीवनाला विशिष्ट पारमार्थिक सुसूत्रताच ते प्रदान करीत आहेत. परमार्थातील Do's and Don'ts ते येथे स्पष्ट करून सांगत आहेत. चर्चा, वाद तर सोडा, साधकाने भगवंतांच्या सप्रेम स्मरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याच विचारांमध्येही गुंतू नये, इतके खोलात जाऊन ते तळमळीने मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे हे अमृतशब्द आपल्या अंगवळणी पडले तर आपले साधन निर्विघ्नपणे शेवटास जाऊन आत्मसुखाचे वैभव निश्चितपणे आत्मसात होईल, यात शंका नाही !
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. )
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates