॥ अमृतबोध ॥
संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. त्यामुळेच सामान्य माणसांच्या विचारांची पोच जिथे खुंटते तिथून पुढे केवळ संतच पाहू शकतात. यातही पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांचे अगदी वेगळेपण स्पष्ट दिसते. ते मोजके व नेमके सांगतात आणि छोट्याशा सूत्रातून प्रचंड अर्थ सहज मांडून जातात. त्यावर शांतपणे विचार केला की आपल्याला खूप मोठे बोधपाथेय त्यातून उपलब्ध होत असते.
आजचा त्यांचा विचार वरवर पाहता सहज सोपा वाटला तरी त्यातून साधकाच्या जीवनाला विशिष्ट पारमार्थिक सुसूत्रताच ते प्रदान करीत आहेत. परमार्थातील Do's and Don'ts ते येथे स्पष्ट करून सांगत आहेत. चर्चा, वाद तर सोडा, साधकाने भगवंतांच्या सप्रेम स्मरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याच विचारांमध्येही गुंतू नये, इतके खोलात जाऊन ते तळमळीने मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे हे अमृतशब्द आपल्या अंगवळणी पडले तर आपले साधन निर्विघ्नपणे शेवटास जाऊन आत्मसुखाचे वैभव निश्चितपणे आत्मसात होईल, यात शंका नाही !
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. )
0 comments:
Post a Comment