॥ अमृतबोध ॥
आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव.
वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा संप्रदाय असून तो " विश्वधर्म " होण्याच्या योग्यतेचा आहे, असे श्रीसंत गुलाबराव महाराज म्हणत असत. या संप्रदायाने पुरस्कारलेले कलियुगातील अत्यंत सोपे व हमखास यश देणारे साधन म्हणजे श्रीभगवंतांचे नामस्मरण होय. या साधनेचा पुरेपूर अनुभव वारीमध्ये येतो. आज आषाढी वारीची सांगता विठुरायाच्या दर्शनाने होत आहे. या पार्श्वभूमीवर, निष्ठावंत वारकरी सत्पुरुष, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे हे अमृतवचन सर्वांनी जाणीवपूर्वक वाचून तत्काळ अंमलात आणावे इतके महत्त्वाचे आहे. आपली कोणतीही कर्मे मधे न येऊ देता, कसलाही आळस पुढे न करता, प्रेमाने व नेमाने हे नामस्मरणाचे सुलभ साधन तुम्हां-आम्हां सर्वांनी आजच्या सुमुहूर्तावर प्राणपणाने जपावे, वाढवावे, हीच या आनंदप्रसंगी कळकळीची प्रार्थना !!
( कृपया ही इमेज व पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप तसेच हाईक इ. मिडियावरून शेयर करून आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वदूर पोहोचवावी, ही विनंती. )
0 comments:
Post a Comment