॥ अमृतबोध ॥
आज श्रीगुरुपौर्णिमा !! परमानंदस्वरूप श्रीसद्गुरूंच्या पूजनाचा महत्त्वाचा उत्सव.
श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व असतात. भगवंतांचे अपरंपार प्रेममय, दयामय व वात्सल्यपूर्ण स्वरूप म्हणजे श्रीसद्गुरु होय. या तत्त्वाला कोणतीही उपमा देताच येत नाही, असे सर्व संत सांगतात. येथे केवळ शरणागतीपूर्वक सादर दंडवतच घालायचा असतो.
श्रीसद्गुरूंच्या मातृस्वरूपाचे, माउलीरूपाचे यथार्थ वर्णन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या अमृतमय बोधातून करीत आहेत. तसेच आपण मनुष्यजन्माचे सार्थक कसे करून घ्यावे याचेही सुयोग्य मार्गदर्शन करीत आहेत. ही बोध-जाणीव मनीमानसी ठसवून घेऊन त्यानुसार वर्तन करणे हीच श्रीगुरूंप्रति आपण अर्पण केलेली खरी भावांजली ठरेल !!
आजच्या परमपावन दिनी विश्वातील सर्व श्रीसद्गुरु स्वरूपांना सादर दंडवत !
( कृपया ही इमेज फेसबुक, व्हॉट्सप व इतर सोशल मिडीयाद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही सादर विनंती. )
0 comments:
Post a Comment