ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते. ग्रंथ काही तुमच्या शंकांचे समाधान करू शकत नाहीत. ग्रंथांमध्ये जे सांगितलेले असते, त्या ज्ञानाचा श्रीसद्गुरूंच्या कृपेने जो अनुभव येतो, तोच आत्मानुभव होय. ग्रंथप्रचिती म्हणजेच शास्त्रप्रचिती ही गुरुप्रचितीशी जुळल्यानंतर मग जेव्हा आपण श्रीसद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन करून तो स्वत: अनुभव घेतो तेव्हाच आत्मप्रचिती लाभते. ही सर्व प्रक्रिया श्रीसद्गुरुकृपेशिवाय होत नाही व सद्गुरूंची पूर्णकृपा होण्यासाठी आपल्या चित्तात अपार सद्गुरुप्रेम असावे लागते. हे प्रेमही जन्म जन्मांतरी निष्ठेने केलेल्या सेवा व साधनेचेच मधुर फळ असते. असे सद्गुरुप्रेम ही शब्दांनी सांगता येणारी गोष्टच नाही, तो केवळ अनुभवाचाच प्रांत आहे.
श्रीसद्गुरु हे देखील शास्त्रज्ञान व स्वानुभव या दोन्ही बाबतीत पूर्ण अनुभवी असावे लागतात. तरच ते शिष्याचे सर्व बाजूंनी समाधान करून त्याला आत्मानुभव देऊ शकतात. म्हणून आत्मानुभव प्राप्त होण्यासाठी ' शाब्दे परे निष्णात ' अशा श्रीसद्गुरूंची पूर्णकृपा व्हावीच लागते, त्यासाठी अन्य कोणताही उपाय नाही, असे परम पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज येथे स्वानुभवपूर्वक सांगत आहेत. प. पू. सद्गुरु श्री. मामा महाराज देशपांडे म्हणतात, " ग्रंथांवरून होणारे ज्ञान अपुरे असून,
आत्मानुभव येण्यासाठी श्रीसद्गुरूंचीच कृपा व्हावी लागते. श्रीसद्गुरु हे देखील शास्त्रज्ञान व स्वानुभव या दोन्ही बाबतीत पूर्ण अनुभवी असावे लागतात. तरच ते शिष्याचे सर्व बाजूंनी समाधान करून त्याला आत्मानुभव देऊ शकतात. म्हणून आत्मानुभव प्राप्त होण्यासाठी ' शाब्दे परे निष्णात ' अशा श्रीसद्गुरूंची पूर्णकृपा व्हावीच लागते, त्यासाठी अन्य कोणताही उपाय नाही, असे परम पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज येथे स्वानुभवपूर्वक सांगत आहेत. प. पू. सद्गुरु श्री. मामा महाराज देशपांडे म्हणतात, " ग्रंथांवरून होणारे ज्ञान अपुरे असून,
' सद्गुरुप्रेम ' हा शब्दाचा विषय नसून अनुभवाचा आहे.
म्हणूनच सद्गुरु हे ' शाब्दे परे च निष्णातः '
असे असावे लागतात.
आत्मानुभवासाठी श्रीगुरुकृपा व्हावीच लागते. "
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.)
0 comments:
Post a Comment