Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

13 September 2018

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती !
भगवान श्रीदत्तप्रभू अपळराजांच्या घरी दर्शश्राद्धाच्या दिवशी, क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंडसौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, "जननी, काय हवे ते माग !" असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, "स्वामी, हेच बोल सत्य करा !" असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पावनदिनी, सूर्योदय समयी पीठापूरमध्ये, श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात, "कलियुगात अवधूत होतील", असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच अाहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात "कलौ श्रीपादवल्लभ: ।" असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार असून त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. भगवान श्रीदत्तात्रेयांची कलियुगातील श्रीगुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते. भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज अशा मूळरूपात दर्शन झालेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या, प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या त्याच दर्शनानुसार योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे. तसेच एक भव्य तैलचित्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील 'माउली' आश्रमात आहे. त्याचाच फोटो या लेखासोबत शेयर केलेला आहे.
त्यांनी सोळाव्या वर्षी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे राहून अनेक दिव्य लीला केल्या.
भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम *"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।"* हा श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. पुढे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तच्या चातुर्मास्यात, प्लेगपासून संरक्षण व्हावे म्हणून सात नाम सप्ताह करवून घेतले होते. त्यांपैकी एका सप्ताहात पुन्हा याच महामंत्राचा सर्वांना उपदेश करून " दिगंबरा..." महामंत्र सर्वत्र प्रचलित केला.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी श्रीगुरुद्वादशी तिथीला आपला देह कुरवपूर येथे कृष्णामाईत अदृश्य केला, पण त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा "नित्य अवतार" आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत चालूच राहणार आहे.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून "श्रीपादचरित्रामृतम्" ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे. श्रीनृसिंहवाडी स्थानावर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव(जामोद) येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते. आज त्याजागी श्रीपाद सेवा मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. त्या जागृत स्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून, तेथूनही त्यांच्या अद्भुत लीला आजही सतत चालू असतात.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना कुरवपूर क्षेत्री, १९५४ सालच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन दिनी स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी बिल्वदलासह दिव्य पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. त्या सोन्यासारख्या दिसत असत, पण प्रत्यक्षात कशापासून बनलेल्या होत्या हे ज्ञात नाही. कारण ते श्रीभगवंतांच्या संकल्पानेच निर्माण झालेले साक्षात् आत्मलिंगच होते. त्या पादुका सदैव पू.मामांच्या सोबत असत. पू.मामांच्या देहत्यागानंतर त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. त्याबरोबर त्या जशा प्रकटल्या होत्या तशाच पुन्हा अदृश्य झाल्या. त्या दिव्य पादुकांच्या तीर्थाला अद्भुत सुगंध येत असे आणि त्या तीर्थाने असंख्य भक्तांचे रोग, पिशाचबाधा व अडचणी दूर होत असत. आजच्या पावन दिनी त्या पादुकांचे सर्वांना दर्शन व्हावे म्हणून या लेखासोबत त्यांचाही फोटो शेयर करीत आहे.
साजुक तुपातला शिरा, माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत. मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते. वस्तुत: आवड - नावड यांचा या श्रीपादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे !
आजच्या परम पावन दिनी, भगवान भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
विमला: कीर्तयो यस्य श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण जयति स्वेष्टकामधुक् ॥
"ज्यांची यश-कीर्ती अत्यंत उज्ज्वल आहे असे साक्षात् श्रीदत्तप्रभूच कलियुगामध्ये भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे अद्भुत असे श्रीपादरूप धारण करून निरंतर कार्य करीत आहेत !"
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


Read More

12 August 2018

मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

आज श्रावण शुद्ध प्रतिपदा !
भारतीय पंचांगामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा संपूर्ण महिनाच अत्यंत पवित्र व हवाहवासा वाटणारा असतो. या काळात निसर्ग देखील मोहरून आलेला असतो. एकूणच चातुर्मासातील या पवित्र महिन्यात सर्वत्र अतिशय सुंदर वातावरण असते. याच काळात त्यामुळे व्रतवैकल्ये आवर्जून करावीत असे पूर्वीच्या श्रेष्ठांनी सांगून ठेवलेले आहे.
श्रावण महिन्याला आपल्याकडे का बरे एवढे पावित्र्य दिले गेले असावे? याचा विचार करता मला नेहमी असे वाटते की, आम्हां भारतीयांचे परमआराध्य व पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचा जन्ममास आहे, म्हणूनच तो आम्हांला अत्यंत प्रिय व पवित्र वाटतो.
एक विलक्षण योगायोग म्हणजे, या श्रीकृष्णजन्म-मासाच्या पहिल्याच दिवशी, त्या पूर्ण पुरुषोत्तमाच्या परमप्रिय भक्तश्रेष्ठ व साक्षात् भगवती श्रीराधाराणींच्याच प्रेमावतार, श्रीसंत मीराबाईंची जयंती असते !
श्री मीराबाई ह्या अलौकिक आणि अद्भुत विभूतिमत्त्व आहेत. त्यांच्या भक्तिविश्वाची व प्रगल्भ प्रेमभावाची किंचितशी कल्पनाही करणे, आपल्या मानवी बुद्धीच्या कक्षेच्या फार बाहेरचेच आहे. त्यांचे विलक्षण जीवनचरित्र, त्यांचे जगावेगळे बालपण, कर्तव्यपालन म्हणून नि:संगपणे त्यांनी केलेला संसार, कृष्णस्मरणात त्यांनी नि:संकोचपणे प्राशन केलेले विष व त्या विषाचा हरिकृपेने तत्काळ नष्ट झालेला प्रभाव, त्यानंतर सर्वसंग त्याग करून संपूर्ण भारतभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भक्तिप्रचार आणि त्यांचा अद्वितीय देहत्याग; सारेच कल्पनातीत आहे ! चमत्कारालाही विस्मय वाटावा असेच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना एकदा एकाने प्रश्न विचारला, "मामा, श्रीसंत मीराबाईंना पण विष पाजले होते व सॉक्रेटिसलाही विषच पाजले गेले. मग दोघांत फरक काय?" प.पू.मामांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक व पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, "अरे, विष पिऊन सॉक्रेटिस मेला, पण मीराबाई जिवंतच राहिल्या !" या एकाच वाक्यात पू.मामांनी श्रीसंत मीराबाईंचा अद्भुत अधिकार नेमकेपणे अधोरेखित केला आहे.
सच्च्या भक्तहृदयाचे अप्रतिम भावाविष्कार असणारे श्री मीराबाईंचे अभंग वाचताना आपल्याला अगदी भारावून जायला होते. त्यांचा तो उत्फुल्ल माधुर्यभाव, त्यांची अनन्य कृष्णप्रीती, त्यांची सडेतोड भक्तितत्त्व-मांडणी, स्वानुभूतीची अथांग खोली, सारे किती मोहक आणि विशेष आहे ना ! त्या साक्षात् भगवती श्रीराधाजीच असल्यामुळे त्यांच्या अद्भुत अधिकाराविषयी आपण काय भाष्य करू शकणार? साक्षात् श्रीकृष्णप्रेमच त्यांच्या रूपाने साकार झाले होते !! म्हणून आपण तेथे केवळ साष्टांग दंडवतच करू शकतो ! तेच आपले परमभाग्य !!
श्रीसंत मीराबाईंच्या अभंगांवर मराठीमध्ये फारशी पुस्तके नाहीत. थोडीबहुत जी काही आहेत ती चरित्रपरच आहे. त्यांच्या रचनांचे यथामूल चिंतन करून त्यातील विलक्षण भक्तिरहस्य कोणीच आजवर प्रकट केलेले नव्हते. अर्थात् ते सोपे कामच नाही. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "अभंग आस्वाद" या ग्रंथमालेच्या नवव्या भागाद्वारे, श्रीसंत मीराबाईंच्या निवडक पन्नास अभंगांवर अत्यंत सुरेख असे विवरण नुकतेच प्रकाशित करून ही उणीव नेटकेपणे भरून काढलेली आहे. या पन्नास अभंगांची निवड इतकी चपखल झालेली आहे की, त्यातून श्रीसंत मीराबाईंचे अलौकिक व अद्वितीय भावविश्व अतिभव्य आणि उदात्त रूपात आपल्या समोर उभे ठाकते. श्री मीराबाईंच्या अभंगांवरचा हा मराठीतला पहिलाच असा ग्रंथ आहे. अवघ्या चाळीस रुपयांच्या या बहुमोल पुस्तकातून, चाळीस वर्षे जरी नियमाने अभ्यास केला तरी दरवेळी नवनवीन अर्थच लाभतील यात शंका नाही. श्रीसंत मीराबाईंची शास्त्रपूत मांडणी, आपल्या पूर्वजन्मातील प्रसंगांचे स्पष्ट उल्लेख करणारी शब्दरचना, प्रेमभक्तीचे मार्मिक सिद्धांत व भक्तांसाठी सुबोध उपदेशामृत हे श्री मीराबाईंचे काही काव्यविशेष आहेत. ते प.पू.श्री.दादांनी या ग्रंथात जागोजागी अगदी अचूकपणे दाखवून दिलेले आहेत. वाचकांनी, सद्भक्तांनी व अभ्यासकांनी या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा ही विनंती.
संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे यांचा "म्हाराँ रि गिरधर गोपाल" नावाचा संत मीराबाईंच्या त्याच अभंगावरील जबरदस्त विवरणग्रंथ सर्वांनी एकदातरी वाचावाच वाचावा. या चौदा प्रवचनांतून श्रीसंत मीराबाईंचे खरे, आभाळाएवढे व्यापक विभूतिमत्त्व आणि त्यांच्या नितांतमधुरा अंतरंग अनुभव स्थितीची खोली समजून येईल. भक्तिशास्त्रातले अदृष्टपूर्व सिद्धांत त्यात पू.दादांनी सविस्तर व संतचरित्रांतली आणि विशेषत: मीराबाईंच्या चरित्रातली उदाहरणे घेऊनच मांडलेले आहेत.  भक्तिप्रांतातले अत्यंत गुह्य म्हणून सांगितलेल्या आणि केवळ अनुभवगम्यच मानलेल्या भावरूपकात्मक अष्टदलकमलाचे सुरेख दर्शन पू.दादांनी या ग्रंथात करविलेले आहे. ही अपूर्व माहिती अन्यत्र कुठेच पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे हा ग्रंथराज अभ्यासक व प्रेमीभक्त अशा दोघांसाठीही अद्वितीय-अलौकिकच ठरतो.
श्रीसंत मीराबाईंच्याच जातकुळीची भावगहिरी कृष्णप्रचिती अंगांगी मिरवणा-या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी, श्रीसंत मीराबाईंच्या "फागुन के दिन चार रे ।" या पदावरील आपल्या विवरणग्रंथात, भक्तहृदयात साकारणारा हरिप्रेमरसाचा दैवी होलिकोत्सव, भक्तहृदयात साजरा होणारा भगवान श्रीरंगांचा अलौकिक रंगोत्सव इतका बहारदार मांडलाय की बस ! श्रीसंत मीराबाईंची सर्वांगसुंदर प्रेमानुभूतीच त्यातून पू.सौ.ताई स्वानुभवपूर्वक आपल्यासमोर ठेवतात. श्रीसंत मीराबाईंचे अद्वितीय-अलौकिक भावविश्व समजून घ्यायचे असेल, तर वर सांगितलेले तिन्ही ग्रंथराज अभ्यासणे नि:संशय आवश्यकच आहे, असे मला मनापासून वाटते. संत हे त्यांच्या वाङ्मयरूपाद्वारे अजरामर ठरलेले असतात. म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाचे वाचन, मनन व चिंतन हीच त्यांची अनोखी संस्मरणी असते, त्यांची ब्रह्मरसप्रदायिनी दिव्य संगतीच असते. या तिन्ही ग्रंथांच्या वाचनाने मी तरी प्रेमभक्तीची शाब्दिक का होईना, पण अतिशय भावमधुर अशी अनुभूती घेतलेली आहे व नेहमीच घेत असतो.
काही लोक जेव्हा या परमश्रेष्ठ विभूती विषयी ' ती मीरा ' अशा एकेरी उल्लेखाने बोलतात किंवा त्यांच्या चरित्राविषयी काही अनुदार उद्गार काढतात; तेव्हा खरंच त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते. श्री मीराबाईंसारख्या संतांचा परमादरपूर्वक उल्लेख करणे किंवा त्यांचे स्मरण होणे, हे आपल्या कैक जन्मांच्या पुण्याचे सुफलितच म्हणायला हवे. कोणत्याही संतांचा झोपेतही असा अनादराने उल्लेख होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच सतत काळजी घेतली पाहिजे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीसंत मीराबाईंच्या विषयी एक अप्रतिम दृष्टांत देत असत. ते म्हणत, "एखादा खूप प्रख्यात शिल्पकार असावा, त्याने जीव लावून आपली अजोड कलाकृती निर्माण करावी, की तशी पुन्हा होणार नाही; बघणा-यांना वाटावे की ही आपल्याच सुखासाठी केलेली आहे, म्हणून सगळ्यांनी आनंदाने ती शिल्पकृती पाहावी. आणि अशी अप्रतिम कलाकृती करणा-या शिल्पकाराला शोधायला जावे तो लक्षात यावे की शिल्प म्हणून स्वत: शिल्पकारच तेथे बसलेला आहे ! असे त्या मीराबाईंचे आयुष्य आहे. श्रीभगवंतांनी मीराबाईंच्या रूपाने अजोड कृती करून ठेवलेली आहे. त्यांच्या रूपाने अलौकिक लीलाच घडवलेली आहे !"
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी महारासेश्वरी श्रीकृष्णप्रिया श्री श्री मीराबाईंच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत !
अभंग आस्वाद - भाग नववा मधील पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या अतिशय गोड काव्यमय  अर्पणपत्रिकेच्या रूपाने आपणही महाभगवती श्री मीराबाईंच्या चरणीं प्रेमपसायाची सादर प्रार्थना करू या.
चंद्र कृष्णप्रभू, मीरा चंद्रिका ।
आराधित प्रभू, मीरा राधिका ॥१॥
मीरा गिरिधर, अंगे अद्वय ।
अवीट सुखाचे, लीला आलय ॥२॥
मधुर रतीचे, ओघ अनादी ।
शरण अमृता, राखावे पदीं ॥३॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

वर उल्लेख केलेले ग्रंथ 30% सवलतीत मिळवण्यासाठी श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्या ©02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा. ]



Read More

14 July 2018

अलौकिक स्वामीकला

करुणाब्रह्म

नमस्कार !!
आज आषाढ शुद्ध द्वितीया, 'श्रीपाद जयंती'चे महापर्व आहे ! भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०४ वी जयंती आहे.
प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी मंगळवार दि.२३ जून १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्यावर, रात्री साडे अकराच्या सुमारास गरुडेश्वर येथे देहत्याग केला. त्यांनी पूर्वीच प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांना नृसिंहवाडी मुक्कामी 'कुलोद्धारक पुत्र होईल', असा आशीर्वाद देऊन ठेवला होता. त्याचवेळी "काही अडचण भासल्यास श्रीचरणांचे मनोभावे स्मरण करावे", असेही सूचक उद्गार श्रीस्वामींनी काढले होते. त्याचा प्रत्यय प.पू.मातु:श्रींना लवकरच आला. २३ जूनच्या संध्याकाळी मातु:श्रींना प्रचंड प्रसववेदना होऊ लागल्या. काहीकेल्या त्या वेदना शमेनात. शेवटी रात्री त्यांनी कळवळून प.प.श्री.स्वामीमहाराजांची प्रार्थना केली. त्याबरोबर भक्तकरुणाकर श्रीस्वामी महाराज पुण्यातील त्यांच्या घरात सदेह प्रकट झाले व म्हणाले, "बाळ, घाबरू नकोस. या वेदना आता शमतील. आम्ही थोड्याच वेळात देह ठेवतो आहोत. परवा सकाळी तुला आमच्याच अंशाने पुत्र होईल, त्याचे नाव 'श्रीपाद' ठेवावे. तुझे कल्याण असो", असे म्हणून आशीर्वादाची मुद्रा करून श्रीस्वामी महाराज अदृश्य झाले. त्यावेळी इकडे गरुडेश्वरला खरेतर त्यांनी निरवानिरवीचे बोलून डोळे मिटून घेतलेले होते. तेवढ्यात पुन्हा डोळे उघडले. तेव्हा समोर बसलेल्या शिष्योत्तम श्री.शंकरकाका देशमुख आजेगावकर यांनी विचारले असता, "भक्तकार्यार्थ जाऊन आलो", असे स्वामी महाराज उत्तरले व त्यांनी देहत्यागाची लीला केली. प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी गुरुवार दि.२५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रावर प्रसूत झाल्या व श्रीपादांचा जन्म झाला. नेमके अगदी त्याचवेळी, साडेनऊ वाजता गरुडेश्वरी स्वामींचा पुण्यपावन देह नर्मदेत विसर्जित केला गेला. तिकडे स्वामीकुडी नर्मदामैयाच्या कुशीत विसावली तर इकडे स्वामीकला पार्वतीमातेच्या कुशीतून पुनश्च अवतरली; भक्तवत्सल श्रीस्वामी महाराजांचे भक्तोद्धाराचे कार्य अक्षुण्ण ठेवण्यासाठी !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे साक्षात् श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजच होते; याचा आजवर अनेक भाग्यवान भक्तांनी अनुभव घेतलेला आहे. कांचीपीठाधीश्वर परमाचार्य जगद्गुरु श्रीमत् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज प.पू.श्री.मामांना 'प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज' असे संबोधूनच त्यांच्याशी संवाद करीत असत. श्री.रंगावधूत महाराजांचे शिष्योत्तम असलेल्या कोसंब्याच्या प.पू.पंडितजी कुलकर्णी महाराजांना प.पू.श्री.मामांच्या ठायी नेहमीच प.प.श्री.स्वामी महाराजांचे दर्शन होत असे. पू.मामांच्या जागी प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांचे दर्शन लाभलेले काही भाग्यवान भक्त आजही हयात आहेत. अशा या अलौकिक श्रीदत्तात्रेयस्वरूपाच्या, श्रीपादरायांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सादर साष्टांग दंडवत !
आपल्या सद्गुरूंचे अलौकिकत्व अतिशय भावगर्भ शब्दांत मांडताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज आणि सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पूर्ण कृपा लाभलेले प.पू.श्री.श्री.द. उपाख्य मामासाहेब देशपांडे हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होय. श्रीदत्त संप्रदाय, श्रीनाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदायांचे अध्वर्यू तसेच वैदिक प्राचीन शक्तिपात योगविद्येचे महान आचार्य म्हणून ते विश्वविख्यात आहेत. संतसाहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग आणि कल्पनातीत अपूर्व असे चिंतन सर्वश्रुतच आहे. संतवाड्मयावरील त्यांचे रसाळ निरूपण भल्याभल्यांना अंतर्मुख व्हायला लावणारे, थक्क करून सोडणारे आणि भगवत्सेवेची अवीट गोडी हृदयात निर्माण करविणारे आहे.
प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे आणि प.पू.मातु:श्री सौ.पार्वतीदेवी देशपांडे या परमार्थातील थोर अशा मात्या पित्यांच्या पोटी जन्माला आलेले प.पू.श्री.मामा दैवीगुणसंपदा आणि प्रेममाधुर्याचे झळाळते मेरुशिखरच होते. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन त्यांनी केलेली थोर राष्ट्रसेवा आणि त्यानंतर लोकसेवा, लोकोद्धारासाठी वेचलेले उर्वरित आयुष्यातील क्षण अन् क्षण जवळून पाहू गेलो तरी माथा त्यांच्या चरणी आदराने, कृतज्ञतेने लवतो. बुडतिया जनांचा आत्यंतिक कळवळा असलेली ही महान विभूती जगावेगळी असूनही जगातच रमली; जगाच्या कल्याणातच भगवत्पूजा बघून अविश्रांत कष्टत गेली; अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात प्रेमदीपच उजळीत राहिली.
प.पू.मातु:श्री पार्वतीबाई देशपांडे आणि प.पू.योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज; या आपल्या समर्थ सद्गुरुद्वयींकडून मिळालेला परमार्थाचा अतिदिव्य आणि तेजस्वी वारसा जोपासत त्यांनी अनेक जीवांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. जगभर विखुरलेल्या त्यांच्या हजारो साधकांच्या हृदयात त्यांच्या विभूतिमत्वाची, दैवीसंपदेची, अवतारित्वाची कोरली गेलेली सुमधुर स्मृतिचित्रे त्यांच्या सत्कीर्तीची उज्ज्वल पताका झळकवीत, त्यांची नित्य यशोगीतेच गुणगुणत आहेत."
आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श भक्त, आदर्श लोकशिक्षक व आदर्श सद्गुरु असे आदर्शांचेही परमादर्श असणारे प.पू.श्री.मामांचे समग्र चरित्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहे. तुम्हां-आम्हां परमार्थसाधकांनी ते चरित्र सदैव डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी असेच आहे.
लवकरच आपण प.पू.श्री.मामांच्या चरित्र व वाङ्मयाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी तसेच प्रचार व प्रसार कार्यासाठी एक नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत. या स्थळावर प.पू.श्री.मामांशी संबंधित सर्व माहिती, त्यांच्या वाङ्मयावरील अभ्यासकांचे चिंतन, पू.मामांची बोधवचने, त्यांच्या स्मृतिकथा व बोधप्रसंग, प.पू.मामांची विविध छायाचित्रे असे भरपूर साहित्य सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. भविष्यात सर्वांना या संकेतस्थळाचा सातत्याने अधिकाधिक उपयोग करता येईल.
प.पू.श्री.मामांच्या ठायी फार मनोहर असे गुरुतत्त्व प्रकटलेले होते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे अतिशय अद्भुत असे करुणामय स्वरूप म्हणजेच प.पू.श्री.मामा !! याच संदर्भातला एक जगावेगळा अनुभव सोबतच्या लिंकवरील लेखात मांडलेला आहे. प.पू.श्री.मामा भगवान सद्गुरु श्री माउलींना मोठ्या प्रेमादराने 'करुणाब्रह्म' म्हणत असत. सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने प.पू.श्री.मामाही अंतर्बाह्य करुणाब्रह्मच होऊन ठाकलेले होते. त्याचाच भावगहिरा प्रत्यय प्रस्तुत लेखातील, प.पू.श्री.शिरीषदादांनी स्वत: अनुभवलेल्या गोष्टीतून आपल्याला येतो. म्हणूनच, आजच्या पुण्यदिनी प.पू.श्री.मामांच्या श्रीचरणीं या लेखाच्या वाचनाद्वारे आपण भावपुष्पांजली समर्पूया व त्यांच्याच सप्रेम स्मरणात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर

Read More

11 July 2018

चालते-बोलते विद्यापीठ


संत हे चालते बोलते विद्यापीठच असतात. त्यांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून आपल्यासारख्या सामान्य जनांना सतत बोधामृत मिळत असते. जो साधक डोळसपणे संतांच्या उपदेशाचे व लीलांचे अनुसंधान ठेवून त्यातून लाभलेल्या अशा अद्भुत बोधकणांचा आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वापर करतो, तो निश्चितच सुखी व समाधानी आयुष्य जगतो. त्याचा प्रपंचही त्यामुळे नकळतच परमार्थमय होऊन जातो. यासाठीच परमार्थमार्गात या संतबोधाला विशेष माहात्म दिलेले दिसून येते. 'संतसंगती' हा परमार्थ-प्रवासाचा कणाच आहे असे म्हटले जाते, ते वावगे नाही.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे तर आदर्श लोकशिक्षकच होते. अत्यंत शास्त्रपूत आणि विशुद्ध अशी जीवनशैली अंगीकारून त्यांनी सद्धर्माचा परमादर्श लोकांसमोर ठेवला. आजच्याही काळात फारसे कष्ट न होता आवश्यक असे शास्त्राचरण नक्की करता येते, याचा उत्तम वस्तुपाठच त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्तनातून जगासमोर ठेवलेला आहे. अशाप्रकारे उभी हयात त्यांनी साधकांचे सर्वांगीण कल्याण करण्यात वेचली. परमार्थपूरक जीवनशैली कशी असावी? हे नीट समजून घेण्यासाठी प.पू.श्री.मामांच्या जीवनचरित्राचा अभ्यास जरूर करावा.
प.पू.श्री.मामांच्या दिनक्रमातील त्यांची एक अगदी छोटीशीच; पण आपणही दररोज सहज पालन करू शकू, अशी उत्तम सवय श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या ब्रह्मानंद ओवरी ग्रंथात सांगितलेली आहे.
"जेवण झाल्यावर प.पू.श्री.मामा आचमन करून खाली येत. खाली उतरल्यावर, देवांना नमस्कार करून त्यांच्या खांबापुढील आसनावर (आता ज्या ठिकाणी प.पू.श्री.मामांचा मोठा फोटो ठेवलेला आहे तेथे ) बसत. "भोजनोत्तर देवांना नमस्कार एवढ्याकरिता की, दोन वेळेला जे काही चार घास आपल्या पोटात जातात, ते देवांच्या कृपेमुळेच जातात !" असा खुलासा प.पू.श्री.दादांनी माझ्याजवळ एकदा केला होता. जेवण झाल्यावर देवांना नमस्कार करण्याची प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचीही जुनीच सवय आहे, हेही मी पाहिले आहे."
पाहा, अगदी छोटीशीच गोष्ट; पण जर ही सवय आपण स्वत:ला लावून घेऊन निष्ठेने सांभाळली तर किती समाधान देईल ना? आठवणीने नमस्कार तर फक्त करायचाय जेवल्यावर. त्यामुळे ही इतकी साधी व सोपी सवय लावून घ्यायला फारशी कठीणही ठरणार नाही.
श्रीभगवंतांचे 'कृतज्ञ' हे एक नाम आहे. कारण ते भगवंतही भक्तांच्या प्रेमाच्या बदल्यात कृतज्ञतेने आपल्या भक्तांचा सदैव सांभाळ करतात. म्हणूनच, त्या भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तकरुणाकर श्रीभगवंतांप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यांच्या ऋणातच राहण्यासारखे दुसरे सुख नाही या जगात !
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
http://sadgurubodh.blogspot.in
https://www.facebook.com/sadgurubodh/


Read More

5 July 2018

अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प.पू.श्री.मामांचे मानसपुत्र श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या      'ब्रह्मानंद ओवरी' या ग्रंथात सांगितल्या आहेत. अतिशय भावपूर्ण आणि मनोहर हकिकतींनी सजलेला हा ग्रंथ सर्व सद्गुरुभक्तांसाठी अवश्यमेव वाचनीय व मननीय आहे. उदाहरण महणून त्यातली ही छोटीशीच हकिकत पाहा किती विचार करण्यासारखी व अनुकरणीय आहे.
महोत्सवाची आठवण सांगताना श्री.पानसे एका ठिकाणी लिहितात, "सत्कारासाठी व्यासपीठावर चढताना, प.पू.सद्गुरु श्री.मामांनी व्यासपीठाला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केला. नंतर केव्हातरी प.पू.श्री.मामांना मी त्यासंबंधी विचारले; तेव्हा ते म्हणाले, "अरे, त्याच व्यासपीठावर काही वर्षांपूर्वी प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता !"
वास्तविक पाहता ते नाट्यगृह होते आणि त्याचे व्यासपीठ हे काही आदराचे स्थान नाही. परंतु आपल्या श्रीगुरूंचा पावन पदस्पर्श ज्या व्यासपीठाला झालेला आहे, ते त्या स्पर्शाने पुण्यपावनच झालेले आहे; शिष्य म्हणून आपल्यासाठी ते सदैव वंदनीयच आहे; अशीच प.पू.श्री.मामांची दृढ मनोधारणा होती. हृदयी वसणा-या त्या स्वाभाविक गुरुप्रेमानेच त्यांचे हात आपसूक जोडले गेले. किती दृढ आणि अलौकिक गुरुभक्ती आहे पाहा ! तुम्हां आम्हां साधकांसाठी प.पू.श्री.मामांनी फार मोठा आदर्शच येथे स्वत: आचरण करून घालून दिलेला आहे.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. 



Read More

28 June 2018

कहत कबीर सुनो भाई साधो

आज ज्येष्ठ पौर्णिमा !
आज थोर सत्पुरुष श्रीसंत कबीर महाराजांची जयंती व आळंदी येथील मागच्या पिढीतील अनन्य माउलीभक्त सत्पुरुष श्रीसंत मारुतीबुवा गुरव तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील थोर महासिद्ध श्रीसंत म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त या तिन्ही महात्म्यांच्या श्रीचरणीं दंडवत !
हिंदी संत जगतामध्ये श्रीसंत कबीर महाराजांचे नाव सर्वोपरि आहे. त्यांचे दोहे, साख्या, अभंग आजही अनेक भक्तांच्या नित्य पठणात आणि चिंतनात आहेत. त्यांचे वाङ्मय अतिशय सुंदर आणि खरोखरीच प्रचंड आहे. त्यांचे दोहे अत्यंत मार्मिक आणि मोजक्याच परंतु समर्पक शब्दांमध्ये अध्यात्माचे, परमार्थाचे स्वरूप सांगतात. श्रीसंत कबीर महाराजांची रसवंती अनेक विषयांमध्ये स्वच्छंद विहार करते आणि अनेक अर्थांच्या काव्य धुमाऱ्यांनी, कोंभांनी पैसावत साधक हृदयाचा ठाव घेते. त्यांची शब्दकळा काही न्यारीच आहे.
श्रीसंत तुकाराम महाराजांप्रमाणे श्री कबीर महाराज हेही परखड विचारांचे संत होते. परमार्थातील गैरसमजुती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, भोंदूगिरी, फसवणूक या सर्वांचा त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून खरपूस समाचार घेतलेला आहे.
तसेच श्रीसंत कबीर महाराजांचे सद्गुरु वर्णनपरह अनेक दोहे , साख्या आणि पदे उपलब्ध आहेत. अत्यंत भावभिजलेली अशी त्यांची मनोहर काव्यरचना आहे. सद्गुरूंसंबंधी बोलताना त्यांना राहवत नाही आणि ते फारच बहारीचे बोलून जातात. आपल्या एका सुप्रसिद्ध दोह्यात ते म्हणतात,
सब धरती कागज करू, लेखनी करू सब बनराय ।
सात समुंदकी मसी करू, गुरु गुन लिखा न जाय ।।
श्रीसंत कबीर महाराज म्हणतात की, साऱ्या पृथ्वीचा कागद केला, सर्व वृक्षांची लेखणी केली आणि सात समुद्रांची शाई केली तरी श्रीगुरूंचे गुण पूर्णपणे लिहिता येणार नाहीत.
श्री कबीर महाराज येथे अतिशयोक्ती करीत नाहीत, तर वस्तुस्थिती सांगतात. ' सद्गुरु ' हे असे अगाध तत्त्व आहे की ज्याचे समग्र आकलन होणे कधीही, कोणालाही शक्यच होणार नाही. सद्गुरूंचे गुण, माहात्म्य, अकारण दया, प्रेमळपणा, शिष्यवात्सल्य, अहैतुकी कृपा, थोरवी, श्रेष्ठपणा, ज्ञान, सर्वज्ञता या व अशा अनंत सद्गुणांची साधी यादी करणे देखील आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, तर त्यांचे वर्णन कोठून करणार ? हेच श्री कबीर महाराज या दोह्यातून सांगतात.
सद्गुरु श्री माउलींनी देखील ज्ञानेश्वरीत वेळोवेळा म्हटले आहे की, श्रीगुरूंचे माहात्म्य वर्णन करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. ज्याप्रमाणे कल्पतरूला फुलोरा आणणे, कापराला दुसऱ्याचा सुवास देणे, चंदनाला कशाचीही उटी देणे शक्य नाही; त्याचप्रमाणे,
तैसे श्रीगुरूचे महिमान ।
आकळिते के असे साधन ।
हे जाणोनिया नमन ।
निवांत केले ॥ ज्ञाने.१०.०.१३॥
श्रीगुरूंचे महिमान आकलन करून घेण्यासाठी साधनच अस्तित्वात नाही. म्हणून शांतपणे फक्त त्यांच्या श्रीचरणी मी नमन करतो. श्रीगुरूंचे गुण गाणे म्हणजे खऱ्या जातिवंत मोत्याला चमकण्यासाठी अभ्रकाचे पुट देणे किंवा शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा देण्याप्रमाणेच ठरेल. म्हणून या भानगडीत न पडता आपण आपले नमन करणेच श्रेयस्कर.
उगेयाचि माथा ठेविजे चरणी ।
हेचि भले ॥ ज्ञाने.१०.०.१५॥
अशाच आणखी एका सुंदर दोह्यात श्रीसंत कबीर महाराज शिष्य आणि गुरु यासंबंधी मत मांडतात. शिष्याने गुरूंना काय द्यायला हवे म्हणजे त्यांची कृपा होईल, हे श्रीमहाराज ह्या दोह्यातून फार सुंदर शब्दांत सांगतात.
पहिले दाता सिष भया, जिन तन मन अरपा सीस ।
पीछे दाता गुरु भये, जिन नाम दिया बकसीस ।।
श्रीमहाराज म्हणतात की; पहिल्यांदा शिष्य हा दाता असतो. तो सद्गुरूंना तन, मन आणि मस्तक अर्पण करतो. दुसऱ्यांदा सद्गुरु दाते असतात जे त्या शिष्याला 'नाम' बक्षीस देतात.
या दोह्यातून श्रीमहाराज शिष्याची लक्षणे सांगतात. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्रीगीतेच्या ४ थ्या अध्यायातील ' तद्विद्धि प्रणिपातेन ' या श्लोकावरील टीकेत अगदी अशाच अर्थांच्या ओव्या घातलेल्या आहेत. ते म्हणतात ; सद्गुरु हे ज्ञानाचे आश्रयस्थान असतात. त्यांची सर्वस्वाने सेवा केली तरच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल म्हणून;
तरी तनुमनजीवें ।
चरणांसी लागावें ।
आणि अगर्वता करावें ।
दास्य सकळ ॥ज्ञाने.४.३४.१६७॥
सर्वस्वाने, शरीर, मन आणि जीवाने, अहंकार समूळ टाकून देऊन या सद्गुरुरायांचे दास्य, सेवा करावी म्हणजे ते आपले सर्वस्व, आपला आत्मबोध आणि आनंद संपूर्णपणे आपल्याला देऊन टाकतात.
येथे श्रीसंत कबीर महाराज 'सीस' म्हणजे मस्तक असा उल्लेख करतात. त्याचा गर्भितार्थ 'अहंकार' असा आहे. तन, मन आणि अहंकार सर्वस्वाने त्यांच्या चरणी अर्पण केला की ते प्रसन्न होतात आणि परंपरेने आलेले पावन 'शक्तियुक्त नाम' बक्षीस म्हणून त्या जीवाला देतात. त्या परंपरेने आलेल्या सिद्ध नामाच्या अनुसंधानाने त्या शिष्याची अंतर्बाह्य शुद्धी होऊन, त्याच्या विशुद्ध झालेल्या चित्तात श्रीभगवंत पूर्णत्वाने प्रकट होतात व त्याचा परमार्थ सुफळ संपूर्ण होतो. ही नि:संशय श्रीगुरुकृपेचीच थोरवी आहे !
आजच्या पावन दिनी श्रीसंत कबीर महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
थोर वारकरी संत वै.विष्णुबुवा जोग महाराजांचे शिष्योत्तम, श्रीसंत मारुतीबुवा गुरव हे मोठे अधिकारी महात्मे होते. माउलींच्या सेवेकरी गुरव घराण्यातच जन्म झालेला असल्याने, त्यांना जन्मापासूनच माउलींच्या सेवेचे, प्रेमाचे बाळकडू मिळाले. तो वसा त्यांनी निष्ठेने सांभाळला, वाढवला आणि आजन्म श्री माउलींची प्राणपणाने सेवा केली. वै.जोग महाराजांच्या आज्ञेने, त्यांनी ज्ञानेश्वरीची १०८ दिवसांत १०८ पारायणे केली होती. त्यातील १०० पारायणे केवळ एकदा दूध पिऊन आणि शेवटची ८ पारायणे अजानवृक्षाची पडलेली पाने प्रसाद म्हणून खाऊन ! एवढी उपासना झाल्यानंतरच वै.जोग महाराजांनी त्यांना कीर्तन-प्रवचने करण्याची अनुमती दिली. पूर्वीच्या काळातील वारकरी धुरीणांची ही पद्धतच होती. आजच्यासारखी दोन चार कीर्तने प्रवचने पाठ करून केली जाणारी पोपटपंची त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांच्यासाठी कीर्तन-प्रवचन हे श्रीभगवंतांच्या निखळ सेवेचे साधन होते. दुर्दैवाने आज तो लोकांचा पैसे व प्रसिद्धी कमवण्याचा धंदा होऊन बसलेला आहे, याचे मनस्वी वाईट वाटते.
वै.मारुतीबुवा हे परम निष्ठावान माउली भक्त आणि हाडाचे वारकरी होते. ते रात्री शेजारतीनंतर माउलींच्या समाधी मंदिरात वीणेचा पहारा करीत व पहाटे काकड्यापूर्वी स्नान आन्हिक करीत. मग देवदर्शन झाल्यावर, जेथे त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहात, त्या वास्तूच्या उंब-यावर डोके ठेवून नमस्कार करीत. एकदा एकाने त्यांना विचारले की, "महाराज, येथे तर तुमचेच शिष्य राहतात, तुम्ही का नमस्कार करता त्या वास्तूला?" त्यावर बुवा उत्तरले, "अरे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांमधून एखादा महात्मा होईल आणि माझ्या ज्ञानोबारायांची पूर्णकृपा संपादन करेल, त्याला मी आत्तापासूनच वंदन करतो !" केवढी विलक्षण माउलीनिष्ठा !!
वै.मारुतीबुवांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना वारीला जाऊ न देण्याचा निर्णय त्यांच्या घरच्यांनी घेतला. त्यांना हे सांगितल्यावर ते म्हणाले, "जन्मल्यापासून माझी वारी कधीच चुकली नाही, मी आत्ताही चुकवणार नाही." त्यांच्या चिरंजीवांनी पुन्हा एकदा सांगितले की, वारीला तुम्हाला सोडणारच नाही. त्यावर ते म्हणाले, "तुम्ही मला जाऊ देणार नसाल तर मग मी हा देहच सोडून कायमचा माउलींच्या चरणी जाईन, पण वारी न करता राहणार नाही." त्यांनी आपला शब्द खरा केला, वारीच्या आठ दिवस आधीच माउलींच्या स्मरणात आळंदीला त्यांनी आजच्या तिथीला आपल्या देहाचा त्याग केला !! धन्य ते मारुतीबुवा आणि धन्य त्यांची अनन्य माउलीनिष्ठा !! अशी संतमंडळी आता पुन्हा होणे नाही. त्यांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत !!
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ज्यांचे समाधिमंदिर आहे, ते थोर अवलिया सत्पुरुष श्रीसंत म्हादबा पाटील महाराजही विलक्षण अधिकाराचे महासिद्ध होते. वरकरणी रागीट वाटणारे, बालोन्मत्तवृत्तीने राहणारे पाटील महाराज आतून पूर्ण रंगलेले महात्मे होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा व त्यांचा विशेष प्रेमानुबंध होता. त्यांच्या लीलाही मनोहर आहेत. पू.मामांना ते साक्षात् श्रीदत्तप्रभूच मानून त्यांच्याशी फार प्रेमादराने वागत असत. पू.मामांचेही त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते. प.पू.श्री.मामांच्या व त्यांच्या एकत्रित अशा अनेक लीला घडलेल्या आहेत. सांगलीला हरिपूर रोडवर  प.पू.श्री.मामांनी आपल्या सद्गुरूंच्या नावाने श्री गुळवणी महाराज प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे. तेथे बांधकाम चालू असताना एकदा तेथील व्यवस्था पाहणा-या एका साधकांनी पू.मामांना पुण्यात फोन करून विचारले की, "मामा, आपल्याला प्रतिष्ठानच्या जागेत बोअर घ्यायचे आहे. कुठे घ्यावे म्हणजे भरपूर पाणी लागेल?" पू.मामा त्यावेळी पूजा करीत होते. त्यांनी निरोप दिला की, "कुठे बोअर घ्यावे हे पाटील महाराज सांगतील, त्याप्रमाणे करावे." हे साधक तेव्हा जयसिंगपूरला राहात असत. गंमत म्हणजे त्यांनी फोन ठेवून मागे वळून पाहतात तर, त्यांच्या घराच्या दारात पाटील महाराज येऊन दत्त म्हणून उभे राहिले होते. ते म्हणाले, "अरे, कशाला पू.मामांना त्रास देतोस, कुठेही घे बोअर, भरपूर पाणी लागेल, काळजी करू नकोस." पुढे खरोखरीच सोयीची जागा बघून तिथे बोअर घेतले गेले व त्याला प्रचंड पाणी लागले. पण दोन्ही महात्म्यांची ही लीला पाहा किती अद्भुत आहे. पू.मामा निरोप देतात काय, त्याक्षणी पाटील महाराज दारात येऊन काही न विचारताच प्रश्नाचे उत्तर देतात काय; सगळेच अतर्क्य आहे. पू.म्हादबा पाटील महाराजांच्या व पू.मामांच्या अशा असंख्य लीला आहेत.
पू.म्हादबा पाटील महाराजांनी देह ठेवला तेव्हा पू.मामांचे परगावी शिबीर चालू होते. तेथे त्यावेळी त्यांची प्रवचनसेवा चालू होती. मध्येच ते थोडे थांबले व त्यांनी समोरच्या श्रोत्यांना दु:खद बातमी सांगितली की, "आत्ताच आमच्या पू.म्हादबा पाटील महाराजांनी देहत्याग केला." हे सांगून झाल्यानंतर पू.मामांनी प्रवचनसेवा तेथेच पूर्ण केली. पू.मामांचा पू.पाटील महाराजांवर असा अतिशय प्रेमलोभ होता.
आज प.पू.श्री.म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराजांचे भव्य समाधिमंदिर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याही श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून स्मरणपूर्वक प्रार्थना करूया !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in )


Read More

25 June 2018

अलौकिक गुरुप्रेम


( आज २५ जून तारखेने प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची जयंती. त्यानिमित्त त्यांचे हे पुण्यस्मरण ! )
प.पू.श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांचे शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय उपाख्य मामासाहेब देशपांडे महाराज हे विसाव्या शतकातील विलक्षण अधिकारी महात्मे होते. पू.श्री.मामांच्या सर्वच चरित्रलीला तुम्हां आम्हां साधकांसाठी अतिशय बोधप्रद आणि निरंतर मार्गदर्शक आहेत.
प.पू.श्री.मामांच्याकडे त्यांचे एक परगावचे अनुगृहीत साधक दर्शनाला नेहमी येत असत. त्यांचे नाव 'वामन' होते आणि ते पेशाने शिक्षक होते. म्हणून प.पू.श्री.मामा त्यांना 'गुरुजी' असे संबोधत असत. ते एकदा प.पू.श्री.मामांना म्हणाले, "आपण मला 'वामन' अशी नावानेच मारीत जावे !" त्यावर प.पू.श्री.मामा त्यांना गंभीर होऊन म्हणाले, "असले काही तुम्ही मनात सुद्धा आणू नका. तुम्हांला जर नावाने व एकेरी संबोधले, तर माझ्या सद्गुरूंना नावाने व एकेरी संबोधल्याचे पातक माझ्या डोक्यावर बसेल !" असे म्हणत असताना देखील प.पू.श्री.मामांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचे ते विलक्षण सद्गुरुप्रेम पाहून त्या गुरुजींनाही गहिवरून आले.
प.पू.श्री.मामांच्या ठायी सद्गुरुप्रेम असे आत-बाहेर भरून राहिलेले होते. ते त्या नित्यनूतन गुरुप्रेमाचाच विविध प्रकारे सतत आस्वाद घेत असत.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
https://sadgurubodh.blogspot.com/)


Read More

21 June 2018

तेंचि सार जाण योगाचें

विमनस्क होऊन स्वकर्तव्य विसरलेल्या अर्जुनाला बोध करण्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या श्रीमद् भगवद् गीतेची भारतीय तत्त्वादर्शांचा प्रमाणग्रंथ म्हणून गणना होते. या ग्रंथात कर्म, ज्ञान, भक्ती, सद्गुण, दैवी-असुरी संपत्ती, आत्मस्वरूप झालेल्या महानुभवांची लक्षणे, योग अशा असंख्य बाबींचा सुरेख ऊहापोह केलेला दिसून येतो. यातील अठरा अध्यायांना 'योग' याच नावाने संबोधले जाते. श्रीगीतेचे माहात्म्यच असे आहे की, स्वजनांशीच लढावे लागणार म्हणून बळावलेला अर्जुनाचा विषाद देखील इथे 'योग' या संज्ञेला पात्र ठरलेला आहे. ही आमच्या भारतीय विचारदर्शनाची प्रगल्भता आहे !
मुळात 'योग' हा शब्दच सर्वसमावेशक आहे. औपनिषदिक तत्त्व-धारेतील सहा प्रमुख दर्शनांमध्ये भगवान पतंजलींच्या योगदर्शनास मोठी मान्यता लाभलेली आहे. योग हा शब्द युज् धातूपासून बनलेला आहे. योग म्हणजे जोडले जाणे ! दोन भिन्न गोष्टींना जोडून एकसंधता निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे योग. वस्तुतः अध्यात्मविद्येचा मुख्य भाग असणारा हा योग आमच्या प्रत्येक जीवन-घटकात सामावलेला आहे. त्यामुळे आमचे अवघे आयुष्य हाही एक 'जीवनयोग'च म्हणायला हवा.
योग हा अध्यात्माचा केंद्रबिंदू आहे स्वतःला अपूर्ण मानणारा जीव पूर्ण असणाऱ्या परमात्म्याशी ज्या प्रक्रियेने पुन्हा एकरूप होतो, तोच 'योग' होय. संतवाङ्मयाचे मर्मज्ञ जाणकार श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"जीवाला परमेश्वराशी जोडणे हा योग. कशाने जोडतात ? तर अग्नीने ! वैराग्यरूपी अग्नीने दोघांना जोडता येते."* योग शब्दामधून हाच योग भारतीय शास्त्रांना व संतांना अभिप्रेत आहे. पण लौकिक अर्थाने योग म्हणजे योगासने, प्राणायाम असाच घेतला जातो.
आपण रोजच्या जीवनात योग शब्द अनेक ठिकाणी वापरतो. जसे; भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग. या सर्व योगांमध्ये त्या त्या साधनाने भगवंतांशी जोडले जाणेच अभिप्रेत आहे. म्हणजे जिथे जिथे काही जोडले जाण्याची प्रक्रिया घडते तिथे तिथे योग अनुस्यूत आहेच. याच अर्थाने वर उल्लेख केलेला अर्जुनाचा विषादही पाहता येईल. अर्जुनाला खूप दु:ख झाले म्हणूनच तर त्याचा तो विषाद नष्ट करण्यासाठी भगवंतांनी ज्ञान सांगितले. म्हणजे विषादामुळे ज्ञानाशी तो जोडला गेला, म्हणून तोच विषादयोग म्हटला जातो.
२१ जून हा *'जागतिक योग दिवस'* म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याचे चौथे वर्ष आहे. जगातील एकूण १५९ देश हा योगदिन साजरा करतात. आजचाच दिवस *'जागतिक संगीत दिवस'* म्हणूनही साजरा होतो. जगभरातील १८ देश तो साजरा करतात. हे त्याचे बत्तीसावे वर्ष आहे. योगायोगानेच योगदिन व संगीतदिन एकाच दिवशी साजरे होत असले, तरी त्यांच्यात एक फार महत्त्वाचा समन्वय आहे. त्या सामायिक दुव्याचाच आपण थोडक्यात विचार करणार आहोत.
*'गीतं वाद्यं तथा नृत्तं त्रयं सङ्गीतमुच्यते।'* अशी भरतमुनींनी संगीताची व्याख्या आपल्या नाट्यशास्रात केलेली आहे. गायकाचे गायन, वादकाचे वादन आणि गातानाचे गायकाचे अल्प पण आवश्यक असे हावभाव, शरीराच्या हालचाली म्हणजेच काही प्रमाणातले नाट्य यांच्या संयोगातून 'संगीत' साकारते. म्हणजे संगीतातही जोडले जाण्याची प्रक्रिया आहेच, हे यातून आपल्या ध्यानात येईल.
संगीत आणि योग यांच्यात एक गोष्ट समान आहे; ती म्हणजे सम किंवा समत्व. संगीतात जितके महत्त्व समेला आहे तितकेच महत्त्व योगात समत्वाला आहे. किंबहुना ही समच संगीत व योगाचे खरे सौंदर्य आहे. सम चुकली तर गायक-वादकाने आपले ज्ञान कितीही कौशल्यपूर्ण दाखवलेले असले, तरी ते रसहीनच ठरते. तसे योगात ( हठयोगात ) शरीरातील अवयवांमधे समप्रमाण जर नसेल तर योगाची सिद्धी होत नाही. चित्ताला समत्व नाही आले तर जीव-ब्रह्माचे ऐक्यही प्रतिष्ठापित होत नाही. म्हणून दोन्हींमध्ये समेला फार महत्त्व आहे. यासाठीच श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
अर्जुना समत्व चित्ताचें ।
तेंचि सार जाण योगाचें ।
जेथ मन आणि बुद्धीचें ।
ऐक्य आथि ॥ज्ञाने.२.५०.२७३॥
मन आणि बुद्धीचे ऐक्य जेथे होते, तेच योगाचे खरे सार आहे. "समत्वं योग उच्यते । " असे गीतेत श्रीभगवंतही त्यामुळेच स्पष्ट करतात.
आपल्या प्रत्येक कर्मामध्ये प्रयत्नपूर्वक सुयोग्य कौशल्य बाणवणे हाही योगच होय. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण कर्मयोग सांगताना एक मार्मिक सिद्धांत सांगतात की, *"योग: कर्मसु कौशलम् ।(भ.गी.२.५०)"* कौशल्याने कर्म करणे हाही योगच आहे. कौशल्य म्हणजे व्यवस्थितपणाने, नेटकेपणाने आणि प्रामाणिकपणे आपल्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून केलेले कर्म होय. कौशल्य म्हणजे कर्मातला Excellence. हाच आजमितीस दुर्मिळ होत चाललेला आहे. असे कौशल्य अंगी बाणण्यासाठी मनाबरोबरच शरीरही सुदृढ असावे लागते. तन-मनाचे आरोग्य राहण्यासाठीच सूर्यनमस्कार व योगासनांना दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे. म्हणजे यातही लौकिक योग आलाच.
सुखी जीवनयोगातील कौशल्याचे नेमके दिग्दर्शन करताना पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"आयुष्यात रोगाला बरे करून, भोगाला स्वस्थ करून आणि योगाला अंगीकारून पुढे जायचे असते."* दुर्लक्षित रोग हा आगीसारखा असतो, कळेपर्यंत राखरांगोळी करून मोकळा होतो. म्हणून रोगाला वेळीच प्रयत्नपूर्वक बरे केले पाहिजे.
भोग हा कधीच संतुष्ट न होणारा असल्याने काहीतरी मर्यादा घालून त्याला स्वस्थच केले पाहिजे. हाव वेळीच आवरली तर खरे, नाहीतर ती प्राण घेण्यास कमी करत नाही. हे दोन्ही जमल्यावर योगाचा अंगीकार करून शांतचित्ताने समोर येईल ते आपले कर्तव्यकर्म प्रामाणिकपणे केले तरच जीवन समाधानी व सुखी होईल. शेवटी समाधानच आपले खरे प्राप्तव्य आहे. हे तीन भाग जर नीट कळले व त्यानुसार वागायला जमले, तर जीवनाचे सुरेख नादमय संगीत आतूनच अनुभवायला मिळून आपले आयुष्याचा एक "जीवनयोग" होतो.
जीवनाचा असा योग होण्यासाठी काही आवश्यक असणा-या मुद्द्यांचा विचार मांडताना प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज तीन स्तर सांगतात. त्यांचा नक्कीच सखोल विचार व्हायला हवा.
1. Always act in present.*
2. The service you are in, be taken up and made most and there lies the mandate.
3. Even one molecule in its perfection outweighs the world.
वर्तमानात जगणारा माणूसच यशाचे शिखर गाठू शकतो. यशस्वी होण्यासाठी जन्मजात क्षमताच फक्त लागते असे नाही. आपण जे काही कर्तव्य/कर्म करीत आहोत, त्यातील प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची आवड व कामावरील पक्की निष्ठा असेल तर यश हमखास मिळतेच. कौशल्याचा महत्त्वाचा भाग प. पू. उपळेकर महाराज शेवटच्या वाक्यात सांगतात की, योग्य वेळी नेमके व समरसून केलेले प्रयत्न थोडे जरी असले तरी ते फार मोठा प्रभाव दाखवतात, हे विसरता कामा नये. म्हणून आपण जे काही करत असतो त्यातले सर्वोच्च कौशल्य मिळवण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. हाच प्रामाणिक प्रयत्न आनंददायकही ठरतो व अंतिमत: समाधानकारकही !
योग व संगीतातील हेच समत्व निष्ठेने अंगीकारल्यास ते आपल्या दैनंदिन जीवनात एक प्रकारची सुरेल तान निर्माण करते व ती तान जर आपल्या सुयोग्य प्रयत्नांनी टिकून राहिली, तर मग तेच योगाचे सार म्हणायला हवे. हेच तुम्हां आम्हां सर्वांसाठी सतत मिळवण्याजोगे महत्त्वाचे धनही आहे व तेच त्याचे साधनही आहे ! या तिन्ही स्तरांचा सर्वांगीण विचार करूनच पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज म्हणतात, "मनुष्यजन्म हा एक महायोग आहे !" श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज देखील 'विवेकचूडामणी'त, श्रीभगवंतांची प्राप्ती होण्यासाठी अत्यावश्यक असणा-या तीन अत्यंत दुर्लभ गोष्टींमध्ये पहिल्या क्रमांकावर मनुष्यजन्माचाच उल्लेख करतात. मनुष्यत्व, मग मुमुक्षुत्व व त्यानंतर महापुरुषसंश्रय अर्थात् सद्गुरुकृपा, याच त्या तीन अत्यंत दुर्लभ गोष्टी होत. जीवनात या तिन्हींचा संयोग झाला की मगच खरा महायोग साकारत असतो.
आपल्या दुर्मिळ अशा या मनुष्यजन्माचा असाच महायोग निरंतर साजरा करण्याचे सौभाग्य सर्वांना लाभो, हीच आजच्या या जागतिक योग व संगीत दिनानिमित्त श्रीचरणीं सादर प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( पूर्वप्रसिद्धी : 'शब्दीप्ता' जून २०१६ http://rohanupalekar.blogspot.in )
[ छायाचित्र संदर्भ : योगशास्त्रातील समत्वाचे प्रतीक असणारे, महाप्राणरूप गरुड. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील प्राचीन गरुडमूर्ती. ]


Read More

17 June 2018

निर्मळ आठवणींचा गहिरा डोह !!!


प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पावन सान्निध्यातील अलौकिक, अद्भुत आणि निरंतर मार्गदर्शक अशा स्मृतिकथांचे आदरणीय श्री.नारायणराव पानसे यांच्या लेखणीतून साकारलेली ही दोन कैवल्यलेणी - #ब्रह्मानंदओवरी व #चिदानंदविलास. त्यावरील आज प्रकाशित झालेले दै.तरुणभारत मधील परीक्षण. निखळ आनंद व सद्भाव प्रदान करणारे हे दोन्ही भावमधुर ग्रंथ अवश्य संग्रही ठेवावेत असेच आहेत !!!

 पुस्तकांसाठी संपर्क : श्रीवामनराज प्रकाशन © 02024356919 / 8888904481


Read More

13 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २९


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१७. अज्ञानाने अथवा नकळत झालेल्या पापांच्या नाशाकरिता मंत्र

आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः ।

देवकीनन्दन: स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥११९॥

आत्मयोनिः - स्वतःच स्वतःचे उपादान-कारण असणारा.

स्वयंजातः - स्वतःच स्वतःचे निमित्त-कारण असणारा.

वैखानः - भूमीला विशेषरूपाने खोदून काढणारा

सामगायनः - सामगान करणारा.

देवकीनंदन: - देवकीचा पुत्र.

स्रष्टा - सर्व लोक रचणारा.

क्षितीशः - पृथ्वीपती.

पापनाशनः - पापांचा नाश करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

पुराणपुरुष श्रीपुरुषोत्तम भगवंतांच्या असीम दयाकृपेने गेले महिनाभर संपन्न झालेली ही सर्व सेवा त्यांच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो !

या महिन्याभरात अनेक सद्भक्तांनी आवर्जून आपला प्रतिसाद कळवला, आनंद व्यक्त केला, पोस्ट शेयर करून असंख्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्या सर्व सद्भक्तांनाही सादर अभिवादन. सर्वांच्या वतीने ही सेवा श्रीचरणी प्रेमभावे समर्पित असो !

- रोहन विजय उपळेकर.


Read More

12 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २८


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१६. पोटाचे विकार दूर होण्याकरिता मंत्र

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु: ॥२९॥

भ्राजिष्णुः - प्रकाशरूप.
भोजनम् - मायारूपाने आस्वाद घेण्यास योग्य.
भोक्ता - पुरुषरूपाने भोगणारा.
सहिष्णुः - दैत्यांचे बळ सहन करणारा (त्यांचा पराभव करणारा.)
जगदादिजः - जगाच्या आधी हिरण्यगर्भरूपाने स्वतः उत्पन्न होणारा.
अनघः - निष्पाप.
विजयः - ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य इत्यादी गुणांनी विश्वाला जिंकणारा.
जेता - स्वभावतः भूतमात्रांहून वरचढ.
विश्वयोनिः विश्व व त्याचे कारण.
पुनर्वसु: - पुन्हा पुन्हा शरीरात आत्मरूपाने राहणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

11 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २७

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१५.  साधनेतील विघ्नांचा नाश होण्याकरिता मंत्र

वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणव: पृथुः ।
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ५७॥


वैकुण्ठः - पंचभूतांच्या परस्परविरोधी गती अडवून त्यांना एकमेकांशी जोडणारा.
पुरुषः - शरीरात राहणारा.
प्राणः - प्राणवायुस्वरूप.
प्राणदः - प्राण्यांचे प्राण खंडित करणारा.
प्रणवः  - ज्याला वेदही प्रणाम करतात असा, ॐकाररूपी.
पृथुः - प्रपंचरूपाने विस्तार पावणारा.
हिरण्यगर्भः - ज्याच्यापासून हिरण्यमय अण्डे उत्पन्न झाले, तो.
शत्रुघ्नः - शत्रूंना मारणारा.
व्याप्त: - कारणरूपाने सर्व कार्यांत व्याप्त असणारा.
वायुः  - वायुरूप.
अधोक्षजः  - आपल्या स्वरूपापासून क्षीण न होणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)


Read More

10 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २६

विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग


१४. भगवत्कृपा होण्याकरिता मंत्र

श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावन: ।
श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥७८॥

श्रीदः - भक्तांना ऐश्वर्य देणारा.
श्रीश: - लक्ष्मीपती.
श्रीनिवासः - श्रीमंतांमध्ये नित्य वास करणारा.
श्रीनिधिः - सर्व ऐश्वर्याचा आधार.
श्रीविभावनः - मनुष्यांना कर्मानुसार ऐश्वर्य देणारा.
श्रीधरः - मायेला धारण करणारा.
श्रीकरः - स्मरण, स्तवन आणि पूजन करणाऱ्यांना ऐश्वर्य देणारा.
श्रेयः - परमकल्याणरूपी.
श्रीमान् - सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त.
लोकत्रयाश्रयः - तीनही लोकांचे आश्रयस्थान.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

9 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २५


अधिकस्य अधिकं फलम् - २५

_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_

१३. शांत निद्रा आणि दुःस्वप्ननाश याकरिता मंत्र

उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दु:स्वप्ननाशनः।
वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥११२॥

उत्तारण: - संसार-सागराच्या पार नेणारा.
दुष्कृतिहा - पापांचा नाश करणारा.
पुण्यः - पुण्य प्रदान करणारा 
दुःस्वप्ननाशन: - वाईट स्वप्नांचा नाश करणारा.
वीरहा - सांसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा.
रक्षणः - संरक्षण करणारा. 
सन्तः - सन्तरूप.
जीवनः - सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा.
पर्यवस्थितः - विश्वाला व्यापून राहणारा. 

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

8 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २४

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
१२. भय, चिंता दूर होण्याकरिता मंत्र
सहस्रार्चिः सप्तजिह्व: सप्तैधाः सप्तवाहनः ।
अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥१०२॥
सहस्रार्चिः - हजारो किरण असलेला.
सप्तजिह्व: - काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची अशा सात जिह्वा असलेला, अग्निरूप.
सप्तैधाः - सात ज्वाला असलेला, अग्निरूप.
सप्तवाहनः - सात घोड्यांचे वाहन असलेला, सूर्यरूप.
अमूर्तिः - निराकार.
अनघः - निष्पाप.
अचिन्त्य: - चिंतनाने आकलन न होणारा.
भयकृत् - दुष्टांना भयभीत करणारा.
भयनाशनः - वर्णाश्रम पाळणाऱ्यांचे भय नाहीसे करणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

7 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २३


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

११. वैषयिक-वासनानाशाकरिता मंत्र


भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽनलः ।

दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥८९॥

भूतावासः - भूतमात्रांचे मुख्य निवास-स्थान.
वासुदेवः - आपल्या मायेने जगाला आच्छादणारा देव.
सर्वासुनिलय: - सर्व प्राणांचा जीवरूप आधार 
अनलः - अपार शक्ती आणि संपत्तीने युक्त.
दर्पहा - अधर्मी लोकांचा अहंकार नष्ट करणारा. 
दर्पदः - धार्मिकांना गौरव देणारा.
दृप्तः - नित्य आनंदात मग्न असलेला.
दुर्धरः - हृदयामध्ये धारण करण्यास कठीण.
अपराजितः - अंतर्बाह्य-शत्रूंकडून पराजित होत नाही, असा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)


Read More

6 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २२

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१०. सर्वप्रकारचे कल्याण होण्याकरिता मंत्र

अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः ।
श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥७७॥

अनिवर्ती - रणभूमीतून मागे न हटणारा.
निवृत्तात्मा - विषयांपासून स्वभावतः दूर राहणारा.
संक्षेप्ता - प्रलयकाळी सृष्टीला सूक्ष्म करणारा.
क्षेमकृत् - प्राप्त पदार्थाचे रक्षण करणारा.
शिवः - नामस्मरणानेही पवित्र करणारा.
श्रीवत्सवक्षाः - वक्षावरती श्रीवत्स चिन्ह धारण करणारा.
श्रीवासः - ज्याच्या हृदयात लक्ष्मीचे निवासस्थान आहे, असा.
श्रीपतिः - लक्ष्मीचा पती.
श्रीमतांवरः - वेदरूप ऐश्वर्याने युक्त अशा ब्रह्मादी देवांच्यापेक्षा श्रेष्ठ.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

5 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २१

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

९. प्रतिकूल काळात रक्षण होण्याकरिता मंत्र
ऋतुः सुदर्शन: कालः परमेष्ठी परिग्रहः ।
उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः॥५८॥

ऋतुः - काळरूप.
सुदर्शन: - ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे, असा.
कालः - सर्वांची गणना करणारा.
परमेष्ठी - आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा.
परिग्रहः - शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात, असा.
उग्रः - सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात, असा.
संवत्सरः - सर्व भूतमात्रांचे निवासस्थान.
दक्ष: - सर्व कार्ये तत्परतेने करणारा.
विश्राम: - मुमुक्षूंना विश्रांती देणारा.
विश्वदक्षिणः - सर्वांत दक्ष.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

4 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २०

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

८. विवाहयोग जुळून येण्याकरिता मंत्र

कामदेवः कामपालः कामी कान्त: कृतागमः ।
अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनंजयः ॥८३॥

कामदेवः - चार पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी इच्छिलेला देव.
कामपाल: - सकाम भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा.
कामी - पूर्णकाम.
कान्तः सुंदर शरीर धारण केलेला.
कृतागमः - सर्व वेदशास्त्रांची रचना करणारा
अनिर्देश्यवपुः - ज्याच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, असा.
विष्णु: - ज्याची कांती पृथ्वी आणि आकाश यांना व्यापून आहे, असा.
वीरः - गतिमान.
अनन्तः - ज्याला अन्त नाही, असा.
धनंजयः - अर्जुनरूप.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

Read More

3 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १९

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
७. स्मरणशक्ती वाढण्याकरिता मंत्र

महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥३२॥

महाबुद्धि: - महान बुद्धिमान
महावीर्यः - माया हे ज्याचे महान वीर्य आहे, असा
महाशक्ति: - महान सामर्थ्यवान
महाद्युतिः - अंतर्बाह्य अत्यंत कान्तिमान
अनिर्देश्यवपुः - ज्याच्या शरीराविषयी सांगणे शक्य नाही, असा
श्रीमान् - समग्र ऐश्वर्यशाली
अमेयात्मा - ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही, असा
महाद्रिधृक् - मंदर आणि गोवर्धन या महान पर्वतांना धारण करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

Read More

2 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १८

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. मानसिक विकार दूर होण्याकरिता मंत्र
वेद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु: ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ॥३१॥
वेद्य: - कल्याणाची इच्छा असणा-यांकडून जाणण्यास योग्य.
वैद्य: - सर्व विद्या जाणणारा.
सदायोगी - नेहमी प्रत्यक्ष असणारा.
वीरहा - राक्षसांना मारणारा.
माधव: - विद्यापती.
मधु: - मधाप्रमाणे प्रसन्नता उत्पन्न करणारा.
अतीन्द्रिय:- इंद्रियातीत.
महामाय: - मायावींच्या वर आपल्या मायेचे वर्चस्व ठेवणारा.
महोत्साह: - परम उत्साही.
महाबल: - अत्यंत बलशाली.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

1 June 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १७

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

५. व्यवसायवृद्धी व नोकरीत बढती होण्याकरिता मंत्र

व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः ।
परर्द्धि: परमस्पष्टस्तुष्ट: पुष्टः शुभेक्षणः ॥

व्यवसाय: - ज्ञानमात्रस्वरूप
व्यवस्थानः - सर्व विश्वाची व्यवस्था करणारा
संस्थानः - प्रलयकाळी प्राणिमात्रांचे स्थान असलेला
स्थानदः - प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान देणारा
ध्रुवः - अविनाशी
परर्द्धि - श्रेष्ठ विभूतिस्वरूपी
परमस्पष्टः - श्रेष्ठ वैभव व ज्ञान असलेला
तुष्टः - एकमात्र परमानन्दस्वरूप
पुष्ट: - सर्वत्र परिपूर्ण
शुभेक्षणः - दर्शनाने कल्याण करणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

31 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १६

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

४. अर्थप्राप्तीसाठी मंत्र

विस्तारः स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम् ।
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥५९॥

विस्तारः - सकल भुवनांचा विस्तार ज्यामध्ये आहे असा
स्थावरस्थाणुः - स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा
प्रमाणम् - ज्ञानरूप असल्याने स्वयंप्रमाणरूपी
बीजमव्ययम् - संसाराचे एकमेव अविनाशी कारण
अर्थः -  सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात, तो
अनर्थः - कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित
महाकोशः - अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला
महाभोग: - आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा
महाधनः - ज्याचे भोगाचे साधनस्वरूप महान धन आहे, असा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

30 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् -१५

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
३. सर्वरोगनाशाकरिता मंत्र*
अमृतांशूद्भवो भानु: शशबिन्दु: सुरेश्वर: I
औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: II४४II
अमृतांशूद्भव: - चंद्र ज्याच्या पासून उत्पन्न झाला, तो
भानु: - प्रकाशमान
शशबिन्दु: - चंद्राप्रमाणे प्राणिमात्रांचे पोषण करणारा
सुरेश्वर: - देवाधिदेव
औषधं: - संसाररोगावरचे औषध
जगत: सेतु: - भवसागर पार करण्याकरता सेतुरूप
सत्यधर्मपराक्रम: - धर्म आदी गुण व ज्याचा पराक्रम सत्य आहे, तो
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून दररोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

29 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १४

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. कार्यसिद्धी होण्याकरिता मंत्र*
भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनोऽनल: I*
कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: II४५II*
भूतभव्यभवन्नाथ:* - त्रैकालिक सर्व प्राण्यांचा स्वामी
पवन: - वायुरूप
पावन: - चालक
अनल: - अनंत
कामहा - भक्तांच्या विषयवासना नष्ट करणारा
कामकृत् - भक्तांच्या कामना पूर्ण करणारा
कान्त: - अत्यंत रूपवान
काम: - पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला
कामप्रद: - भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा
प्रभु: - सर्वोत्कृष्ट.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

28 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १३


'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' हा भक्तश्रेष्ठ श्री भीष्माचार्यांनी रचलेला अत्यंत अद्भुत असा एक मालामंत्र आहे. शिवाय यातील प्रत्येक श्लोक हाही स्वतंत्र मंत्र आहे. या विविध मंत्रांचे असंख्य अनुभूत प्रयोगही जुन्या जाणत्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' ग्रंथामध्ये त्यांच्या श्रीगुरुपरंपरेने आलेले अतिशय प्रभावी असे यातील एकवीस मंत्रांचे प्रयोग दिलेले आहेत. हे सर्व स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहेत. आजवर इतरत्र कुठेच यांचा उल्लेखही आलेला नाही. कोणीही श्रद्धेने यांचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतो. आजपासून आपण त्यातील काही मंत्रप्रयोग पाहू या.
१. इच्छापूर्ती होण्याकरिता मंत्र
असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: I
सिद्धार्थ: सिद्धसंकल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: II४०II
अर्थ :-
असंख्येय: - ज्याच्यात नाम, रूप इत्यादी भेद नाहीत, असा;
अप्रमेयात्मा - ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही, असा;
विशिष्ट: - सर्वोत्कृष्ट;
शिष्टकृत् - शासन करणारा;
शुचि: - परम पवित्र;
सिद्धार्थ: - ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत, असा
सिद्धसंकल्प: - सत्यसंकल्प असलेला;
सिद्धिदः - कर्माचे योग्य फल देणारा;
सिद्धिसाधन: - सिद्धींचा दाता.
या मंत्राचा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईपर्यंत, शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates