अधिकस्य अधिकं फलम् - २५
_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_
१३. शांत निद्रा आणि दुःस्वप्ननाश याकरिता मंत्र
उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दु:स्वप्ननाशनः।
वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥११२॥
उत्तारण: - संसार-सागराच्या पार नेणारा.
दुष्कृतिहा - पापांचा नाश करणारा.
पुण्यः - पुण्य प्रदान करणारा
दुःस्वप्ननाशन: - वाईट स्वप्नांचा नाश करणारा.
वीरहा - सांसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा.
रक्षणः - संरक्षण करणारा.
सन्तः - सन्तरूप.
जीवनः - सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा.
पर्यवस्थितः - विश्वाला व्यापून राहणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
0 comments:
Post a Comment