Read More

рдк. рдкू. рд╕рдж्рдЧुрд░ु рд╢्рд░ी рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ
Read More

рдк. рдкू. рд╕рдж्рдЧुрд░ु рд╢्рд░ी рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ
Read More
рдк. рдкू. рд╕рдж्рдЧुрд░ु рд╢्рд░ी рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ
Read More
рдк. рдкू. рд╕рдж्рдЧुрд░ु рд╢्рд░ी рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ
Read More
рдк. рдкू. рд╕рдж्рдЧुрд░ु рд╢्рд░ी рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ
Read More
рдк. рдкू. рд╕рдж्рдЧुрд░ु рд╢्рд░ी рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ

30 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥рейреж рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

рдк्рд░рдкंрдЪ рдЖрдгि рдкрд░рдоाрд░्рде рдпाрдд рдоूрд▓рднूрдд рдлрд░рдХ рдЖрд╣ेрдд. рдк्рд░рдкंрдЪाрдд рджेрд╣ рд╣ाрдЪ рдоुрдЦ्рдп рдЖрдзाрд░ рдЖрд╣े, рддрд░ рдкрд░рдоाрд░्рдеाрдд рджेрд╡ ! рдо्рд╣рдгूрдирдЪ рдк्рд░рдкंрдЪाрдд рджेрд╣ाрд╕рдХ्рддी рдЕрд╕рддे рддрд░ рдкрд░рдоाрд░्рдеाрдд рджेрд╡рднрдХ्рддी рдЕрд╕рддे. рд╕ंрд╕ाрд░ाрдд рдк्рд░рдмрд│ рдЕрд╕рдгाрд░ी рд╣ी рджेрд╣ाрд╕рдХ्рддी рдХрдоी рдЭाрд▓्рдпाрд╢िрд╡ाрдп рджेрд╡рднрдХ्рддी рд▓ाрднрдд рдиाрд╣ी рдЖрдгि рддोрдкрд░्рдпंрдд рдЦрд░ा рдкрд░рдоाрд░्рдерд╣ी рд╕ुрд░ू рд╣ोрдд рдиाрд╣ी. рдк्рд░рдкंрдЪाрдд рд░ाрд╣ूрдирдЪ рдкрд░рдоाрд░्рде рдХрд░ाрдпрдЪा рдЕрд╕рд▓्рдпाрдоुрд│े, рдпा рджोрди्рд╣ींрдЪी рдпोрдЧ्рдп рд╕ांрдЧрдб рдШाрддрд▓्рдпाрд╢िрд╡ाрдп рдЖрдкрд▓्рдпाрд▓ा рддрд░рдгोрдкाрдп рдиाрд╣ी. рд╣ी рд╕ांрдЧрдб рдХрд╢ी рдШाрд▓ाрдпрдЪी рд╣े рдоाрдд्рд░ рд╢्рд░ीрдЧुрд░ुрдХृрдкेрдиेрдЪ рдХेрд╡рд│ рд╕рдордЬूрди рдпेрдд рдЕрд╕рддे.
рд╣े рджेрд╣ाрдЪे рдордордд्рд╡ рдХрдоी рд╣ोрдг्рдпाрд╕ंрджрд░्рднाрдд рдЕрдЪूрдХ рдоाрд░्рдЧрджрд░्рд╢рди рдЖрдЬрдЪ्рдпा рдЕрдоृрддрдмोрдзाрддूрди рдк. рдкू. рд╢्рд░ी. рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ рдХрд░рдд рдЖрд╣ेрдд. рдЖрдкрд▓ा рд╕्рдеूрд▓ рджेрд╣ рд╣ी рдПрдХ рдзрд░्рдорд╢ाрд│ा рдЖрд╣े, рдд्рдпाрдд рдЖрдкрдг рддाрдд्рдкुрд░рддेрдЪ рд░ाрд╣ाрдпрд▓ा рдЖрд▓ो рдЖрд╣ोрдд, рд╣ी рднाрд╡рдиा рджृрдв рдХेрд▓्рдпाрд╕ рдд्рдпाрдЪे рдордордд्рд╡ рд▓рд╡рдХрд░ рд╕ंрдкुрд╖्рдЯाрдд рдпेрддे. рдо्рд╣рдгूрди рдкрд░рдоाрд░्рдеाрдд рд╕ुрд░ुрд╡ाрддीрд▓ा рд╣ाрдЪ рд╡िрдЪाрд░ рдордиाрдд рдкрдХ्рдХा рдЭाрд▓ा рдкाрд╣िрдЬे !
(рдХृрдкрдпा рд╣ी рдЗрдоेрдЬ рдЖрдкрд▓्рдпा рдлेрд╕рдмुрдХ рд╡ॉрд▓рд╡рд░ рддрд╕ेрдЪ рд╡्рд╣ॉрдЯ्рд╕рдк рдЧ्рд░ूрдк्рд╕рд╡рд░ рдЖрд╡рд░्рдЬूрди рд╢ेрдпрд░ рдХрд░ाрд╡ी рд╣ी рд╡िрдиंрддी. рдЕрд╢ा рдкोрд╕्рдЯ्рд╕ рдиिрдпрдоिрдд рд╡ाрдЪрдг्рдпाрд╕ाрдаी рдХृрдкрдпा рд╣े рдкेрдЬ рд▓ाрдИрдХ рдХрд░ाрд╡े.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

29 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реиреп рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

एकदा एक विलक्षण प्रसंग घडला होता. प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना विचारले, " मामा, ' भावबळें आकळ ए-हवी नाकळे । ' असे श्रीमाउली म्हणतात, त्यातील 'भावबळे'चा नेमका अर्थ काय? " त्यावर पू. मामा म्हणाले, " ती समोर गादीवर माझी शबनम दिसते ना, त्यात काही आहे का पहा जरा." पू. दादांनी पाहिले, ती रिकामी होती. मग पू. मामा म्हणाले, " त्यात आता पेढे आहेत असा तू मनात भाव धर आणि पाहा जाऊन. " पू. दादांनी तसे केले. पण त्या पिशवीत काहीच नव्हते. ते पुन्हा पू. मामांपाशी येऊन बसले. त्यानंतर पू. मामा म्हणाले, " आता पुन्हा तू तसाच भाव मनात धर, आम्ही तुझ्या भावाला बळ देतो." पू. दादांनी पुन्हा भाव धरला, पू. मामांनी त्यांचे बळ दिले व जाऊन पाहायला सांगितले. आश्चर्य म्हणजे खरोखरीच त्या शबनम मध्ये पेढ्यांचा पुडा होता. हे पाहून चकित झालेल्या पू. दादांना पू. मामा म्हणाले, " यालाच म्हणतात, ' भावबळें आकळे ए-हवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥हरि.१२.२॥' शिष्याच्या मनात साधनेने आलेल्या शुद्ध भावाला जेव्हा श्रीसद्गुरूंच्या कृपेचे बळ मिळते, तेव्हाच निर्गुण असा परमात्माही त्या शिष्याला हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा स्पष्ट जाणवतो. प. पू. मामा नुसते शब्दांनी सांगत नसत, तर तशी प्रत्यक्ष अनुभूतीच आणून देत असत !
प. पू. मामांनी पू. दादांना अशा विलक्षण पद्धतीने कृपापूर्वक अनुभवाला आणून दिलेला तोच परमार्थ-सिद्धांत आजच्या अमृतबोधातून शब्दबद्ध झालेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирео рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

क्रोध हा कोणालाही पटकन् आवरता न येणारा दुर्गुण आहे. क्रोध येतो तेव्हा आपला सारासारविचार नष्ट होत असतो, म्हणूनच क्रोधाचे दुष्परिणाम फार भयंकर होतात. आपल्या सर्वस्वाची हानी करणारा हाच क्रोध जर आपण सुयोग्य ठिकाणी व सुयोग्य प्रकारे वापरू शकलो, तर तोच आपल्याला परम लाभदायकही ठरू शकतो. कसा? ते सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एखाद्या संतापी, क्रोधी माणसाला असतो तसाच तीव्र व न आवरता येणारा क्रोध, विषयांच्या आहारी जाण्याविषयी आपल्या मनात असावा. म्हणजे मग त्या विषयांपुढे हतबल होऊन आपल्या हातून कधीच चुकीचे वर्तन होत नाही. आपले हानिकारक दुर्गुण सुद्धा योग्य प्रकारे वापरून, त्यातून आपलाच शाश्वत लाभ करून देण्याची कला फक्त संतांनाच अवगत असते. म्हणूनच परमार्थात संतसंगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирен рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

परमार्थ निर्विघ्नपणे पूर्णत्वाला जाण्यासाठी साधकांना सत्संगतीची, संतांच्या सहवासाची नितांत आवश्यकता असते. साधुसंगतीतच परमार्थ खरा फुलतो, म्हणूनच त्याचे महत्त्वही अनन्यसाधारणच मानलेले आहे. या सत्संगतीची इच्छा, आवड किती तीव्र असावी? तर, एखाद्या कामी माणसाला स्त्रीची असते तेवढी ! त्याच्या मनात सतत तोच विचार असतो, त्याशिवाय दुसरे काहीही त्याला सुचत नाही व ती प्राप्त होईपर्यंत तो गप्प बसत नाही. तसेच प्रत्येक साधकाचे संतांच्या संगतीबद्दल व्हायला हवे, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирем рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू. पार्वतीदेवी या श्रीस्वामी समर्थ महाराजांची परमकृपा लाभलेल्या फार थोर विभूतिमत्व होत्या. त्यांचे बोल इतके विलक्षण असत की ज्याचे नाव ते. त्यांच्याच मुशीत तयार झाल्याने पू. मामा देखील दररोजच्या, आपल्या ओळखीच्या उदाहरणांतून कठीण परमार्थ अगदी सोपा करून सांगत असत. आजपासून पुढील तीन अमृतबोध हे त्यादृष्टीने विशेष चिंतनीय ठरावेत.
आपल्या दुर्गुणांचाही सुयोग्य पद्धतीने वापर केल्यास तेही लाभदायकच ठरतात, कसे? तर पू. मामा म्हणतात, लोभ घालवणे आपल्याला सहज शक्य नाही ना, मग त्या लोभाचे स्वरूपच बदलून टाकावे. धन संपत्ती वगैरे संपणा-या गोष्टींचा लोभ ठेवण्यापेक्षा,  कंजूष माणसाला पैशांबद्दल जसा तीव्र लोभ असतो, अगदी तसाच आपण शाश्वत अशा श्रीभगवंतांच्या विषयी तरी ठेवावा. यासाठीच पू. मातु:श्री म्हणत, " लोभ असावा ईश्वरभजनी । " म्हणजे मग नाना संकटांमध्ये अडकवणारा तोच लोभ, संकटांची परंपराच नष्ट करणारा ठरतो ! प. पू. श्री. मामांचे सांगणे हे असे असे, कायम सकारात्मक, लाभदायक व परमहितकारक !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирел рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

इतर लोकांना दाखवल्याशिवाय, सांगितल्याशिवाय आपण काहीही कधी करूच शकत नाही. इतकी आपल्याला या नसत्या दिखावूपणाची सवयच झालेली असते. आणि आता फेसबुक, व्हॉटसपच्या जमान्यात तर बोलूच नका.
पण परमार्थ ही तर अंतरंग गोष्ट आहे, दाखवायची नाही. या आपल्या सवयीमुळे तो हृदयाच्या गाभ्यात अनुभवायचा परमार्थही आपण गावाच्या चव्हाट्यावर कधी आणून ठेवतो, हे आपले आपल्यालाही कळत नाही. मग त्या श्रीभगवंतांपर्यंत नेणा-या निष्कळ भक्तीचाही बाजारच होऊन जातो आणि भगवंत कधीच त्यातून दूर निघून जातात. या फार महत्त्वाच्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला जाणीव करून देतात की, इतरांनी चांगले म्हणावे, मान द्यावा म्हणून कधीही परमार्थ करू नये. नाहीतर ते नाटकच ठरते व त्याद्वारे श्रीभगवंतांची प्राप्ती कदापि होत नाही. परमार्थ हा केवळ श्रीभगवंतांच्या निष्कपट व निष्काम सेवेसाठीच करावा, त्यांच्या निरपेक्ष भजनासाठीच करावा आणि तोही आपल्या पाचवीला पुजलेला सगळा आळस झटकून करावा ! तरच तो त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना आपली दया येते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирек рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

सुखाचे दोन दुष्ट मित्र आहेत, ते  कायम त्यासोबत येतातच. सुख आले की त्या पाठोपाठ आळस आणि माज येतोच. ज्या प्रयत्नांमुळे ते सुख लाभलेले असते त्या प्रयत्नांवरच पहिल्यांदा हा आळस मारा करतो आणि ते प्रयत्न मंदावले की हळूहळू सुखही संपून जाते. शिवाय सुखातला माज, त्या सुखाचे कर्ते आपणच आहोत, ही खोटी भावनाही मनात तीव्रतेने निर्माण करतो. मग ज्या श्रीभगवंतांच्या कृपेने ते सुख लाभलेले अाहे, त्यांनाच आपण सोयिस्करपणे विसरतो. या दोन्हींमुळे सुखाला गालबोट लागते.
यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, प्रापंचिक व सांसारिक सुखांची करमरता असली की आपोआपच हे दोन्ही दुर्गुण आपल्या चित्तात येऊन खळबळ माजवत नाहीत. आणि सुखात जेवढे देवांचे स्मरण आपल्याला होते, त्यापेक्षा जास्त दु:खात, उणीवांमध्येच होत असते. म्हणूनच तशी कमतरता असणे, हे श्रीभगवंतांच्या कृपेचेच द्योतक आहे, असेच खरे भगवद् भक्त मनोमन जाणून जीवनातील दु:खांचा, कमतरतेचा आनंदानेच
स्वीकार करतात. श्रीभगवंतांचे स्मरण सतत टिकून राहावे, यासाठीच आपल्याला प्रापंचिक उणीवाची शिदोरी त्यांनी बरोबर दिलेली आहे, हीच भगवंतांची आपल्यावरील मोठी प्रेमकृपा नाही का?
येथे प. पू. मामासाहेब प्रपंचात सुख मिळवण्याचे प्रयत्न थांबवा, असे अजिबात म्हणत नाहीत, फक्त त्या उणीवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे ते सांगत आहेत. या दृष्टीने पाहिल्यास आपले समाधान टिकून राहते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирей рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

संत आपल्या विचारभूमिकांमध्ये अतिशय स्पष्ट व नेमके असतात. संतांचे शब्द हे प्रचंड अभ्यासाचा, साधनेचा परिपाकच असतात. म्हणूनच त्यांचे ठोकताळेही फार विलक्षण असतात.
साधकाने आपले आत्मपरीक्षण करताना काय निकष लावावेत, याचा सुरेख संदर्भ प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून देत आहेत.
प्रपंचातील घडामोडींनी मन अशांत होण्याचे प्रसंग सर्वांवरच कधी ना कधी येत असतात. पण ते तसे अशांत मन हे श्रीभगवंतांच्या विस्मरणाचेच फळ आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. कारण श्रीभगवंत हे परमशांत आहेत, स्थिर आहेत; त्यामुळे जेथे त्यांचे अखंडित स्मरण असते, तेथे शांती व समाधान निरंतर वास करून असतातच. आपले मन अशांत झाले, चिंता किंवा दु:खाच्या वृत्तीने ते चंचल झाले की स्पष्ट समजावे, आपल्याला देवांचे विस्मरण झालेले आहे. तत्काळ मनाला बजावून पुन्हा श्रीभगवंतांशी जोडून टाकावे, जादूची कांडी फिरवल्यासारखे मन शांत होऊन जाते. असे शांत मन हेच सुखी जीवनाचे गमक आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реиреи рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

श्रीज्ञानेश्वरी जयंती  !!

आज भाद्रपद कृष्ण षष्ठी, श्रीसंत एकनाथ महराजांनी केलेल्या श्रीज्ञानेश्वरीच्या प्रतिशुद्धीची जयंती. भगवान श्रीमाउलींनी ज्ञानेश्वरी केव्हा सांगीतली, याची नोंद उपलब्ध नाही. म्हणून हीच श्रीज्ञानेश्वरी जयंती मानतात.
श्रीज्ञानेश्वरी हा प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा जीव की प्राण होता. श्रीमाउलींच्या कृपेने त्यांच्या हृदयी ती यथार्थपणे प्रकटलेली होती, म्हणूनच आजवर कधीच कुणीही न सांगीतलेले विलक्षण अर्थ पू. मामा सांगत असत. तुमचा लाडका शिष्य कोण? या प्रश्नाचे उत्तर पू. मामा देतात की, " गुरूंचा कोणी लाडका-दोडका नसतो, सगळ्यांवरच त्यांचे समान प्रेम असते आणि त्यांचे श्रीगुरूच त्यांचे लाडके असतात. पण विचारलेच आहे म्हणून सांगतो, मी श्रीज्ञानेश्वरी वर निष्ठा ठेवून ती जगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून जो ज्ञानेश्वरीवर प्रेम करतो, ती रोज न चुकता वाचतो, तोच माझा लाडका शिष्य होय ! " इतके विलक्षण प्रेम होते त्यांचे ज्ञानेश्वरीवर.
श्रीमाउलींच्या या पावन वाङ्मयीमूर्तीची खरी गरज कोणाला आहे? याचा खुलासा पू. मामा करतात की, जे पूर्ण ज्ञानी नाहीत व पूर्ण अज्ञानीही नाहीत,  पण ज्यांची वेद व ईश्वरावर श्रद्धा असून तो परमात्मा जाणून घ्यायची सदिच्छा ज्यांच्या मनात आहे, अशा तुम्हां-आम्हां लोकांसाठीच श्रीज्ञानेश्वरी सांगीतलेली आहे श्रीमाउलींनी. म्हणून तोच आपला सर्वांचा आदर्श जीवनग्रंथ व्हायला हवा, त्याचेच आपण निरंतर सेवन करायला हवे. श्रीमाउलींच्या या बोधदीपाच्या शांतस्निग्ध प्रकाशात आपला प्रपंच व परमार्थ उजळून निघेल यात शंकाच नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реирез рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

संतांचा प्रत्येक उपदेश अलौकिकच असतो, पण त्यातही काही बोध हे नित्यस्मरणीय, वारंवार ज्यांचे मनन करावे, असेच असतात. त्या श्रेयनामावली मध्ये आजचे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे बोधवचन फारच वरच्या क्रमांकावर आहे. आपले जीवन निरामय, सुखी व समाधानी होण्यात मोलाची भूमिका निश्चित बजावेल असा, अक्षरश: रोज सकाळी उठल्यावर एकदातरी वाचावा, असाच हा उत्तम विचार आहे.
आपले आयुष्य भूत, भविष्य आणि वर्तमान या तीन काळात विभागलेले आहे. खरेतर त्यातला वर्तमानच मुख्य असूनही, आपण संपून गेलेल्या भूतकाळात किंवा अजून यायच्या असलेल्या भविष्यातच जास्त रममाण झालेलो असतो. तेच इतके अंगवळणी पडलेले असते की, चालू क्षण आपण पुरेपूर उपभोगतच नाही; आणि म्हणूनच आपले वर्तमान सुखावह ठरत नाही.
आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जावा असे वाटत असेल, तर भूतकाळातील गोष्टींचे उगीचच स्मरण करू नये, कारण आता त्या घडून गेलेल्या आहेत, कोणालाच बदलता येणार नाहीत. भविष्य तर अजून घडायचे असल्याने, अजूनही ते आपल्या हातातच आहे, आपल्या आजच्या वर्तनात त्याचे बीज आहे; म्हणून भावी गोष्टींची उगीचच आज चिंता करत बसू नये. हे जमले तरच समोरचा प्रत्येक क्षण अधिक आपलेपणाने, सळसळत्या उत्साहाने व आनंदाने उपभोगला जातो. हीच समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

20 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ реиреж рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

काळजी करणे आणि काळजी घेणे हे दोन वरकरणी सारखे वाटतात, पण त्यात फार भेद आहे. सतत काळजी करणे, हा मनुष्यस्वभावच आहे. पण खरेतर काळजी घेणे, हेच योग्य वागणे आहे. काळजी करण्याने कोणतेच काम साधत नाही, उलट बिघडतेच. पण काळजी घेण्याने मात्र सर्व कामे सुलभ व सोपी होतात. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, दररोजच्या जीवनात उगीचच काळजी करण्याचे सोडून, वेळच्या वेळी आवश्यक ती काळजी घ्यायची सवय लावून घेतली, तर प्रपंच काही प्रमाणात सुखदायक होऊ शकतो. आणि  हेच साधनेत बरोबर उलटे आहे. सर्व प्रकारच्या काळज्या मिटवण्यासाठीच श्रीसद्गुरु कृपापूर्वक साधना देत असतात, म्हणून त्यात मात्र काळजी सोडून 'स्वस्थ' बसावे. आपण परमात्म्याचेच अंश आहोत, म्हणजे आपला ' स्व ' हा त्याचेच द्योतक आहे, म्हणून त्या ' स्व ' मध्ये रममाण होणे हेच स्वस्थ बसणे होय. साधनेत असे स्वस्थ बसल्याने, व्यवहारातही काळजी करण्याची मग आवश्यकताच उरत नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

19 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ резреп рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем


परमार्थात सहजतेला खूप महत्त्व असते. काहीही मारून मुटकून केलेले परमार्थात ग्राह्य धरले जात नाही, कारण ते कधीच चिरस्थायी नसते. शेवटी उसने आणलेले अवसान किती काळ टिकणार ना?
आपल्या मनी मानसी मुरलेल्या विषयांचेही तसेच असते. मी सोडले म्हणून खरेतर काहीही सुटत नसते. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यथार्थतेची जाणीव करून देत सांगतात की, आपल्या मनातले विषय आतूनच सुटले पाहिजेत, मुद्दाम ठरवून सोडलेला विषय हा वासनाक्षय मानला जात नाही. माकड शांत बसले म्हणून त्याच्या माकडचेष्टा कायमच्या संपल्या असे होते का? थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या होणारच त्याचे. इकडे कडकडीत निर्जली उपास करायचा पण मनात मात्र जेवणावळींचा विचार करायचा किंवा स्वप्नात जेवणच पहायचे, हा काही वासनाक्षय नाही. एखादी गोष्ट सुटली तर मग मनात देखील ती गोष्ट येता कामा नये. यासाठी आपल्याकडून भरपूर साधनाच व्हावी लागते. अशक्य नसले तरी सहज शक्य देखील नाही हे. मनापासून प्रयत्न करण्याची तयारी, पक्का निर्धार आणि आपल्या श्रीसद्गुरूंवर व त्यांनी दिलेल्या साधनेवर निष्ठा असल्यास हे नक्कीच अवघड वाटणार नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ резрео рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

कर्म तीन प्रकारचे असते; संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित म्हणजे बँक बॅलन्स, त्यात भर पडते, पण त्याला हात लावता येत नसतो. प्रारब्ध म्हणजे खर्चासाठी काढलेली रक्कम, तिचा खर्च होणारच असतो काहीही झाले तरी. आणि या खर्चाच्या रकमेतून जे नवीन तयार होते ते क्रियमाण. या तिन्हीतले प्रारब्ध हे या जन्मात सुख-दु:खांच्या रूपाने भोगून संपते तर क्रियमाणातून संचितात भर पडत राहते.
एवीतेवी प्रारब्ध जर आपल्याला भोगायचेच आहे, त्यात कोणालाच सुटका नाही; तर मग ते तरी शांतपणे, चित्ताची चलबिचल होऊ न देता भोगून संपवून टाकावे, असा मोलाचा सल्ला प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज देतात. प्रारब्ध भोगताना जर चित्त शांत राहिले व त्याचवेळी नामस्मरणही होत राहिले तर नवीन क्रियमाण होण्याची प्रक्रिया मंदावते आणि हेच आपल्यासाठी फार फायद्याचे असते. चलबिचल वाढली की उगीचच चुकीचे वागले जाऊन कर्मात फुकटच आणखी भर पडते. हे होऊ नये म्हणून नामस्मरणाची सवय प्रयत्नपूर्वक लावून घेणे फार महत्त्वाचे आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

17 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ резрен рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

आपण जन्मजन्मांतरी ज्या ज्या वासना निर्माण करून चित्तात साठवून ठेवलेल्या असतात, त्याच आपल्याला या जन्मात सतत काही ना काही अडचणीत अाणत असतात. एक छान उदाहरण देऊन हे समजावून सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ज्याप्रमाणे पाण्यातील दगडावर शेवाळ साचते व त्यावरून कोणाचाही पाय घसरतो; त्याप्रमाणे सतत  त्याच प्रपंचाच्या विचारांनी चित्तावर वासना साठतात व त्यावरून आपला जीव घसरतो. घसरतो म्हणजे ऊर्ध्वगामी होऊन उत्तम अनुभूती घेण्याचे सोडून तो खाली जातो. प्रगती व्हायच्या ऐवजी त्याची अधोगतीच होते; आणि तसे घसरणे नक्कीच तोट्याचे असते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

16 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ резрем рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем

резрем рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем
рдоोрдЬрдХे рдкрдг рдиेрдордХे рдмोрд▓ाрд╡े рддे рд╕ंрддांрдиीрдЪ. рдЖрдкрд▓्рдпाрд▓ा рдЦंрдбीрднрд░ рдмोрд▓ूрди рдЬे рд╕ांрдЧрддा рдпेрдд рдиाрд╣ी рддे рд╕ंрдд рдЕрд╡рдШ्рдпा рдПрдХा рд╡ाрдХ्рдпाрдд рд╕ांрдЧूрди рдоोрдХрд│े рд╣ोрддाрдд. рдк. рдкू. рд╢्рд░ी. рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрд╢рдкांрдбे рдорд╣ाрд░ाрдЬ рдЕрд╕ेрдЪ рд╡िрд▓рдХ्рд╖рдг рдмोрд▓рдг्рдпाрдд рд╕рдорд░्рде рд╣ोрддे.
рдк्рд░рдкंрдЪाрд▓ा рд╕рд░्рд╡рдЬрдг рдмंрдзрдирдХाрд░рдХ рдо्рд╣рдгрддाрдд, рдкрдг рдЦрд░ोрдЦрд░ीрдЪ рдмंрдзрди рдХрд╢ाрдЪे рдЖрд╣े? рдпाрдЪे рдЪрдкрдЦрд▓ рдЙрдд्рддрд░ рдкू. рд╢्рд░ी. рдоाрдоाрд╕ाрд╣ेрдм рджेрддाрдд. рдк्рд░рдкंрдЪ рдмंрдзрди рдиाрд╣ी рдХी рджुрд╕рд░े рдЕрдЬूрди рдХाрд╣ीрд╣ी рдмंрдзрдирдХाрд░рдХ рдиाрд╣ी, рдЖрдкрд▓्рдпाрдЪ рдЕंрдд:рдХрд░рдгाрддीрд▓ рдЖрд╕рдХ्рддी рд╣ाрдЪ рд╕рд░्рд╡ाрдд рдоोрдаा рдмंрдз рдЖрд╣े. рд╕рд░्рд╡ рдк्рд░рдХाрд░рдЪ्рдпा рдмंрдзрдиांрдЪा рдоूрд│ рд╕्рд░ोрдд рд╣ी рдЖрд╕рдХ्рддीрдЪ рд╣ोрдп. рдХрдорд│ाрдЪ्рдпा рдкрд░ाрдЧांрд╡рд░ рдЖрд╕рдХ्рдд рдЭाрд▓ेрд▓्рдпा рднुंрдЧ्рдпाрд▓ा рд╕ंрдз्рдпाрдХाрд│ рдЭाрд▓ेрд▓ी  рд╕рдордЬрдд рдиाрд╣ी. рдд्рдпाрдоुрд│े рдХрдорд│ рдоिрдЯूрди рдЧेрд▓्рдпाрд╡рд░ рддो рддेрдеेрдЪ рдЕрдбрдХूрди рдкрдбрддो. рддрд╕ेрдЪ рдЖрдкрдг рдЖрдкрд▓्рдпा рдЖрд╕рдХ्рддीрдкाрдпी рдзрди, рдмाрдпрдХा-рдкोрд░े, рдШрд░рджाрд░, рдЕрд╣ंрдХाрд░, рдЖрдкрд▓े рддुрдЯрдкुंрдЬे рдЬ्рдЮाрди, рдк्рд░рд╕िрдж्рдзी рдЕрд╢ा рдЖрдкрдгрдЪ рддрдпाрд░ рдХेрд▓ेрд▓्рдпा рдЕрдиेрдХрд╡िрдз рдмंрдзрдиांрдордз्рдпे рдЕрдбрдХूрди рдкрдбрддो рд╡ рд╣рдХрдиाрдХрдЪ рджु:рдЦ рднोрдЧрдд рдЕрд╕рддो. рдЖрд╕рдХ्рддी рд╕ोрдбрд▓्рдпाрдмрд░ोрдмрд░ рддे рджु:рдЦ рдХ्рд╖рдгाрдд рдирд╖्рдЯ рд╣ोрдгाрд░े рдЕрд╕рддे, рдкрдг рддी рдЖрд╕рдХ्рддी рд╕ुрдЯрддा рд╕ुрдЯрдд рдиाрд╣ी. рдпाрд╕ाрдаीрдЪ рдЖрдкрд▓्рдпा рдЖрдпुрд╖्рдпाрдд рдкрд░рдоाрд░्рдеाрд▓ा рдлाрд░ рдорд╣рдд्рдд्рд╡ рдЖрд╣े.
(рдХृрдкрдпा рд╣ी рдЗрдоेрдЬ рдЖрдкрд▓्рдпा рдлेрд╕рдмुрдХ рд╡ॉрд▓рд╡рд░ рддрд╕ेрдЪ рд╡्рд╣ॉрдЯ्рд╕рдк рдЧ्рд░ूрдк्рд╕рд╡рд░ рдЖрд╡рд░्рдЬूрди рд╢ेрдпрд░ рдХрд░ाрд╡ी рд╣ी рд╡िрдиंрддी. рдЕрд╢ा рдкोрд╕्рдЯ्рд╕ рдиिрдпрдоिрдд рд╡ाрдЪрдг्рдпाрд╕ाрдаी рдХृрдкрдпा рд╣े рдкेрдЬ рд▓ाрдИрдХ рдХрд░ाрд╡े.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

15 September 2016

॥ рдЕрдоृрддрдмोрдз ॥ резрел рд╕рдк्рдЯेंрдмрд░ реирежрезрем


अनंत चतुर्दशी !

आपल्या अंत:करणातील वासना या धगधगीत अग्नीसारख्याच असतात. त्यांची तृप्ती कधीच होत नसते. आगीत जितके इंधन घाला तितके ती जास्त पेटते, वासनांचे तसेच होते. आयुष्यभर जरी आपण वासनांनुसार विविध भोग मिळवत राहिलो तरी त्या शेवटपर्यंत संपतच नाहीत, उलट भोगाने त्या वाढतच राहतात. मरायला टेकले तरी काही ना काही इच्छा अपूर्ण राहिलेलीच असते माणसांची. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज वासनांना ' अपूर्य ' म्हणत आहेत. या वासनांच्या तावडीतून सुटायचे असेल तर स्वत:वर, आपल्या मनावर काहीतरी मर्यादा किंवा निर्बंध स्वत:च घालून घ्यावे लागतात आणि निर्धारानेच ते नियम पाळावेही लागतात. ' अनंत ' जन्मांच्या कर्मांतून सुटून ' अनंत ' असा परमात्मा प्राप्त व्हावा, असे जर आपल्याला मनापासून वाटत असेल, तर आपल्या वासनांवर आपण मर्यादा ठेवलीच पाहिजे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates