॥ अमृतबोध ॥
१० सप्टेंबर २०१६
अनंत जन्मांमधील आपणच केलेल्या कर्मांमुळे आज सुख-दु:ख आपल्या समोर भोगाला आलेले असते. म्हणूनच त्यात शांत राहावे व ते भोग भोगून संपवावेत, हे कालच आपण पाहिले. पण नुसते भोगून ते संपत नाहीत. आपण आपल्या अधीरतेमुळे व मनाच्या सततच्या कोलांट्याउड्यांमुळे ते भोग संपवायच्या ऐवजी अजून वाढवतो. म्हणून येथेच खरी मेख आहे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यासाठीच सांगतात की, या अनंत जन्मांच्या अगणित कर्मांच्या कचाट्यातून सहज सुटायचे असेल तर त्यासाठी साधनाच करायला हवी व ती देखील योग्य सद्गुरूंकडून जाणून घेऊन. शांत राहून त्यांनी कृपापूर्वक दिलेले साधन जर प्रेमाने व नेमाने केले, तर कधी त्या कर्मभोगांमधून आपण सुटून समाधानी होतो, हे कळत देखील नाही. नाहीतर मग ते राहाटगाडगे जन्मजन्मांतरी चालूच राहते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment