अनंत चतुर्दशी !
आपल्या अंत:करणातील वासना या धगधगीत अग्नीसारख्याच असतात. त्यांची तृप्ती कधीच होत नसते. आगीत जितके इंधन घाला तितके ती जास्त पेटते, वासनांचे तसेच होते. आयुष्यभर जरी आपण वासनांनुसार विविध भोग मिळवत राहिलो तरी त्या शेवटपर्यंत संपतच नाहीत, उलट भोगाने त्या वाढतच राहतात. मरायला टेकले तरी काही ना काही इच्छा अपूर्ण राहिलेलीच असते माणसांची. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज वासनांना ' अपूर्य ' म्हणत आहेत. या वासनांच्या तावडीतून सुटायचे असेल तर स्वत:वर, आपल्या मनावर काहीतरी मर्यादा किंवा निर्बंध स्वत:च घालून घ्यावे लागतात आणि निर्धारानेच ते नियम पाळावेही लागतात. ' अनंत ' जन्मांच्या कर्मांतून सुटून ' अनंत ' असा परमात्मा प्राप्त व्हावा, असे जर आपल्याला मनापासून वाटत असेल, तर आपल्या वासनांवर आपण मर्यादा ठेवलीच पाहिजे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment