१ सप्टेंबर २०१६
संत कधीच कोणाला कामधाम सोडून, आपली कर्तव्ये सोडून देऊन परमार्थ करा, असे म्हणत नाहीत. उलट आपली जबाबदारी चोखपणे करून वर त्यात लिप्त न होता आनंदात परमार्थ करण्याची कला शिकवतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या साधकाला पत्रातून केलेला प्रस्तुत बोध हे त्याचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल.
नातेवाईकांमुळे त्रास होऊन कष्टी झालेल्या साधिकेला ते सांगतात की, स्वजन दु:खाचे कारण होतात म्हणूनच त्यांची, त्यांच्या वागण्याची काळजी करणे सोडून द्यावे. आवश्यक तेवढी त्यांची काळजी मात्र घ्यावी. आपण काळजी करतो म्हणूनच दु:ख भोगावे लागते, कारण काळजी करणे हेच दु:खाचे खरे स्वरूप अाहे. आपण काळजीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीत फार गुंततो म्हणूनच दु:खी होत असतो. ते गुरफटणेच आधी सोडून द्यावे व आनंदात परमार्थ करावा. संतांचा बोध हा असा रामबाणासारखाच असतो; दिसायला लहान पण परीणामाला खूपच मोठा !!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment