२ सप्टेंबर २०१६
नम करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण । सुख समाधान जे इच्छा ते ॥ असे श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात. मनाचे सामर्थ्य अद्भुत असते; पण ते स्थिर व शांत असेल तरच. मनाला उद्देशून, " उत्तम चाकर पण भयंकर मालक " असे उगीच म्हणत नाहीत. श्रीगीतेत श्रीभगवंतही म्हणतात की, चंचल मनाला ताब्यात ठेवणे सोपे नाहीच, पण अशक्यही नाही. मन एका जागी, एका ध्येयावर स्थिर झाले की त्याची ताकद प्रचंड वाढते. ते हळूहळू उन्मन होते. यासाठीचे एकमात्र साधन म्हणजे आपल्या श्रीगुरूंनी कृपापूर्वक दिलेली साधना हेच होय. म्हणूनच आपल्यासारख्यांचे मनोधैर्य वाढवत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जशी सांगितलेली आहे तशीच साधना मनापासून करीत राहावे, मन स्थिर झाल्याचा अनुभव येणारच येणार ! भगवान श्रीमाउली देखील म्हणतात की, अभ्यासाला दुष्कर, अशक्य असे काहीही या जगात अस्तित्वातच नाही. म्हणून अभ्यासाला अर्थात् साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment