प्रपंच आणि परमार्थ यात मूलभूत फरक आहेत. प्रपंचात देह हाच मुख्य आधार आहे, तर परमार्थात देव ! म्हणूनच प्रपंचात देहासक्ती असते तर परमार्थात देवभक्ती असते. संसारात प्रबळ असणारी ही देहासक्ती कमी झाल्याशिवाय देवभक्ती लाभत नाही आणि तोपर्यंत खरा परमार्थही सुरू होत नाही. प्रपंचात राहूनच परमार्थ करायचा असल्यामुळे, या दोन्हींची योग्य सांगड घातल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. ही सांगड कशी घालायची हे मात्र श्रीगुरुकृपेनेच केवळ समजून येत असते.
हे देहाचे ममत्व कमी होण्यासंदर्भात अचूक मार्गदर्शन आजच्या अमृतबोधातून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज करत आहेत. आपला स्थूल देह ही एक धर्मशाळा आहे, त्यात आपण तात्पुरतेच राहायला आलो आहोत, ही भावना दृढ केल्यास त्याचे ममत्व लवकर संपुष्टात येते. म्हणून परमार्थात सुरुवातीला हाच विचार मनात पक्का झाला पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment