७ सप्टेंबर २०१६
प्रपंच आणि परमार्थ दोन्हीत गोष्टी बरोबर उलट्या असतात. म्हणूनच जे प्रपंचात भाग्य मानले जाते तेच परमार्थात अभाग्य ठरते. तसेच जे प्रपंचात वाईट मानतात ते परमार्थात उत्तम मानले जाते. प्रपंचात जास्त गुंतणे ही अधोगती तर परमार्थात जास्त गुंतणे ही भाग्याची गोष्ट होय. अर्थात् प्रपंचातील अावश्यक कर्तव्ये कधीही टाळायची नाहीत व त्यांचा कंटाळा न मानता ती कामे ईश्वरसेवा म्हणून करायची, ही सर्वच संतांची स्पष्ट शिकवण आहेत. संत कधीच स्वत: जबाबदारी सोडून नुसता परमार्थ करीत नाहीत व आपल्यालाही तसे करू देत नाहीत. फक्त नको इतके जास्तीचे गुंतणे संत टाळायला सांगतात, एवढेच.
यासंदर्भातला एक सत्य सिद्धांत मोठ्या मिश्किल शब्दांत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, ' बारा ' हा आकडा प्रपंचात फार वाईट म्हणतात. त्याचे बारा वाजले म्हणजे वाटोळे झाले. पण तेच परमार्थात बारा हा अतिशय शुभ आकडा आहे. बारा सेकंदांपासून ते बारा वर्षांपर्यंत केलेली एखादी साधना ही तपश्चर्याच मानली जाते. पू. श्री. मामासाहेबांचे सकारात्मक भान पाहा, ते अवघ्या बारा सेकंदांची देखील मुभा देतात. आता तेवढेही जर आपल्याला न चुकता परमार्थाला देता येत नसतील तर मग कोणीच आपल्याला वाचवू शकणार नाही की कधी सुखी करू शकणार नाही. म्हणून, " तरी झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । " हेच आपले आता ब्रीदवाक्य हवे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment