१२ सप्टेंबर २०१६
भगवान श्रीमाउलींच्या कृपेने, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे ' सांगणे ' अतिशय मार्मिक व नेमके असते. त्यांचे स्वानुभूत तत्त्वज्ञान मांडणारे शब्द हे इतके चपखल असतात की ज्याचे नाव ते. आजच्या अमृतबोधातून याची चुणूक मिळते.
पाप आणि पुण्य यांचे गणित मोठे मजेशीर अाहे. त्यांची बेरीज होते, पण वजाबाकी होत नाही. म्हणजे पाप आणि पुण्य हे एकत्र होऊन मनुष्यजन्म मिळतो, पण दोन्हींही स्वतंत्रपणे भोग भोगूनच संपवावे लागतात. आपल्या पदरी खूप पाप आहे, ते जावे म्हणून एखाद्याने खूप पुण्य केले, तरीही त्या पापाचा भोग होणारच. पुण्याने पाप नष्ट करता येत नाही. यासाठी पू. मामा सुंदर उदाहरण देतात. आपण नेहमी पाहतो की, जगात सर्वात जास्त दु:ख हे साधू-संतांनाच भोगावे लागलेले आहे. अगणित पुण्य गाठीशी आहे म्हणूनच ते साधुत्वाला पोचलेले असूनही, उसन्या आणलेल्या पापाचा भोग म्हणून त्यांना प्रचंड अपेष्टा सहन कराव्या लागतात व ते संतही आनंदानेच ते दु:ख भोगून संपवतात.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी. संतांचे प्रारब्ध आपल्यासारखे स्वत: कमावलेले नसते. ते तर त्यांना श्रीभगवंतांनी आपल्या कर्मांच्या गंगाजळीतून उचलून दिलेले कर्म असते, म्हणूनच ते त्रयस्थाच्या वृत्तीने अलिप्तपणे ते भोगतात व मोकळे होतात. यातूनही ते आपल्याला व्यवहारात कसे वागावे याची योग्य शिकवणच देत असतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment