एकदा एक विलक्षण प्रसंग घडला होता. प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना विचारले, " मामा, ' भावबळें आकळ ए-हवी नाकळे । ' असे श्रीमाउली म्हणतात, त्यातील 'भावबळे'चा नेमका अर्थ काय? " त्यावर पू. मामा म्हणाले, " ती समोर गादीवर माझी शबनम दिसते ना, त्यात काही आहे का पहा जरा." पू. दादांनी पाहिले, ती रिकामी होती. मग पू. मामा म्हणाले, " त्यात आता पेढे आहेत असा तू मनात भाव धर आणि पाहा जाऊन. " पू. दादांनी तसे केले. पण त्या पिशवीत काहीच नव्हते. ते पुन्हा पू. मामांपाशी येऊन बसले. त्यानंतर पू. मामा म्हणाले, " आता पुन्हा तू तसाच भाव मनात धर, आम्ही तुझ्या भावाला बळ देतो." पू. दादांनी पुन्हा भाव धरला, पू. मामांनी त्यांचे बळ दिले व जाऊन पाहायला सांगितले. आश्चर्य म्हणजे खरोखरीच त्या शबनम मध्ये पेढ्यांचा पुडा होता. हे पाहून चकित झालेल्या पू. दादांना पू. मामा म्हणाले, " यालाच म्हणतात, ' भावबळें आकळे ए-हवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥हरि.१२.२॥' शिष्याच्या मनात साधनेने आलेल्या शुद्ध भावाला जेव्हा श्रीसद्गुरूंच्या कृपेचे बळ मिळते, तेव्हाच निर्गुण असा परमात्माही त्या शिष्याला हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा स्पष्ट जाणवतो. प. पू. मामा नुसते शब्दांनी सांगत नसत, तर तशी प्रत्यक्ष अनुभूतीच आणून देत असत !
प. पू. मामांनी पू. दादांना अशा विलक्षण पद्धतीने कृपापूर्वक अनुभवाला आणून दिलेला तोच परमार्थ-सिद्धांत आजच्या अमृतबोधातून शब्दबद्ध झालेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
29 September 2016
॥ अमृतबोध ॥ २९ सप्टेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
September
(30)
- ॥ अमृतबोध ॥३० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ सप्टेंबर २०१६
-
▼
September
(30)
0 comments:
Post a Comment