९ सप्टेंबर २०१६
सुख आणि दु:ख या आपल्याच मनाच्या भावना आहेत व त्यांना सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. बाहेरून कोणी आपल्याला कधीच सुख-दु:ख देत नसते. पूर्वी आपणच केलेल्या कर्मांमुळे आज होणा-या मानसिक आंदोलनांचा परिपाक म्हणजे आपले सुख-दु:ख होय. म्हणूनच प्रत्येकाच्या या दोन्ही भावना भिन्न असतात.
प्रत्यक्ष सुख-दु:खांपेक्षाही त्यांच्या नको इतक्या चिंतनाने आपण ती कर्मे उगीचच वाढवतो व जास्त कष्टी होत असतो. एखादी घटना अवघी काही क्षणांची असली तरी आपण अक्षरश: दिवसभर देखील त्यात मनाने व शरीरानेही गुंतलेलो असतो, हेच त्या भावनांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरील परिणामांचे मूळ आहे. म्हणूनच आपण जास्त काळ व जास्त तीव्रतेने ते सुख-दु:ख भोगतो. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपल्याच पूर्वकर्मांचे चांगले-वाईट फळ आज आपण उपभोगत आहोत, हे जाणून त्या प्रत्येक परिस्थितीत जो प्रयत्नपूर्वक शांत राहतो, तोच त्या कर्मांच्या कचाट्यातून लवकर सुटून खरा सुखी होतो. हे जमणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. फक्त मनापासून निर्धार तेवढा हवा.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment