८ सप्टेंबर २०१६
संतांच्या ठायी अलौकिक सद्गुण असतात. त्यामुळे त्यांचे जन-मानसाचे, लोकप्रवृत्तीचे वाचनही अगदी नेमके व चपखल असते. म्हणून संतांच्या सांगण्यानुसारच आपण व्यवहारातही वागावे, हेच आपल्या सर्वस्वी हिताचे असते.
सामान्यपणे आपल्याला एक विचित्र सवय असते की, आपण इतरांच्या बोलण्याचा नको इतका विचार करून हकनाकच आपली मनस्थिती बिघडवून घेत असतो. ह्या दुर्गुणावर मात करण्यासाठीचा सोपा उपाय प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, ज्यांना सतत उलटसुलट विचार मांडायची सवय असते, जे कधीच विवेकाने एका निर्णयावर ठाम होऊ शकत नाहीत, अशा कोत्या बुद्धीच्या माणसांचा व त्यांच्या मतांचा आपण अजिबात विचारच करू नये. त्यांच्याकडे कायम दुर्लक्षच करावे, म्हणजे आपण समाधानी राहून हाती घेतलेले आपले काम चोख होते. त्यांच्याकडे जास्त लक्ष दिल्यास, विचारांचे स्थैर्य जाऊन आपलाही गोंधळ उडतो व त्यामुळे आपली सगळीच कामे अर्धवट होऊन पदरी निराशाच येते. हाच नियम दररोजच्या जीवनाबरोबर परमार्थातही फार उपयुक्त आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment