१६ सप्टेंबर २०१६
मोजके पण नेमके बोलावे ते संतांनीच. आपल्याला खंडीभर बोलून जे सांगता येत नाही ते संत अवघ्या एका वाक्यात सांगून मोकळे होतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज असेच विलक्षण बोलण्यात समर्थ होते.
प्रपंचाला सर्वजण बंधनकारक म्हणतात, पण खरोखरीच बंधन कशाचे आहे? याचे चपखल उत्तर पू. श्री. मामासाहेब देतात. प्रपंच बंधन नाही की दुसरे अजून काहीही बंधनकारक नाही, आपल्याच अंत:करणातील आसक्ती हाच सर्वात मोठा बंध आहे. सर्व प्रकारच्या बंधनांचा मूळ स्रोत ही आसक्तीच होय. कमळाच्या परागांवर आसक्त झालेल्या भुंग्याला संध्याकाळ झालेली समजत नाही. त्यामुळे कमळ मिटून गेल्यावर तो तेथेच अडकून पडतो. तसेच आपण आपल्या आसक्तीपायी धन, बायका-पोरे, घरदार, अहंकार, आपले तुटपुंजे ज्ञान, प्रसिद्धी अशा आपणच तयार केलेल्या अनेकविध बंधनांमध्ये अडकून पडतो व हकनाकच दु:ख भोगत असतो. आसक्ती सोडल्याबरोबर ते दु:ख क्षणात नष्ट होणारे असते, पण ती आसक्ती सुटता सुटत नाही. यासाठीच आपल्या आयुष्यात परमार्थाला फार महत्त्व आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment