इतर लोकांना दाखवल्याशिवाय, सांगितल्याशिवाय आपण काहीही कधी करूच शकत नाही. इतकी आपल्याला या नसत्या दिखावूपणाची सवयच झालेली असते. आणि आता फेसबुक, व्हॉटसपच्या जमान्यात तर बोलूच नका.
पण परमार्थ ही तर अंतरंग गोष्ट आहे, दाखवायची नाही. या आपल्या सवयीमुळे तो हृदयाच्या गाभ्यात अनुभवायचा परमार्थही आपण गावाच्या चव्हाट्यावर कधी आणून ठेवतो, हे आपले आपल्यालाही कळत नाही. मग त्या श्रीभगवंतांपर्यंत नेणा-या निष्कळ भक्तीचाही बाजारच होऊन जातो आणि भगवंत कधीच त्यातून दूर निघून जातात. या फार महत्त्वाच्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला जाणीव करून देतात की, इतरांनी चांगले म्हणावे, मान द्यावा म्हणून कधीही परमार्थ करू नये. नाहीतर ते नाटकच ठरते व त्याद्वारे श्रीभगवंतांची प्राप्ती कदापि होत नाही. परमार्थ हा केवळ श्रीभगवंतांच्या निष्कपट व निष्काम सेवेसाठीच करावा, त्यांच्या निरपेक्ष भजनासाठीच करावा आणि तोही आपल्या पाचवीला पुजलेला सगळा आळस झटकून करावा ! तरच तो त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना आपली दया येते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
25 September 2016
॥ अमृतबोध ॥ २५ सप्टेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
September
(30)
- ॥ अमृतबोध ॥३० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ सप्टेंबर २०१६
-
▼
September
(30)
0 comments:
Post a Comment