११ सप्टेंबर २०१६
सुख आणि दु:ख या पूर्णपणे सापेक्ष भावना आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत म्हणून सुख-दु:ख भिन्नच असते. यासाठी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपल्याला जे प्रिय वाटते ते आपण सुख म्हणतो व जे अप्रिय वाटते त्याला दु:ख म्हणतो. पण प्रत्येकवेळी प्रिय वाटणारे खरोखरीच हिताचे असते असे नाही आणि अप्रिय वाटणारे अनहिताचे असतेच असे नाही; म्हणून तारतम्याने व पुढील गोष्टींचा विचार करून जो आपल्या भावना बनवतो तोच खरा समाधानी होऊ शकतो. ही सुख-दु:खांची सापेक्षता विचारात घेऊन वागणे सुखी जीवनासाठी फार महत्त्वाचे आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment