३ सप्टेंबर २०१६
संत हे अत्यंत समंजस असतात व सतत समोरच्याला सकारात्मक विचारांचेच बळ देत असतात. आजचे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे अमृतवचन हे संतांच्या या सद्गुणाचा उत्तम नमुनाच म्हणायला हवा.
प. पू. श्री. मामा म्हणतात, चुकणे हा मनुष्यस्वभावच आहे, त्यामुळे चूक करणे हा गुन्हा नाहीच. एखादी चूक झाली म्हणून त्याची उगीच खंत बाळगून कष्टी होऊन सुरू केलेली साधना थांबवू नये व ठरवलेल्या ध्येयापासून अजिबात मागे हटू नये. पण आपल्या हातून झालेल्या चुकीचे समर्थन करणे, तीच ती चूक वारंवार करणे किंवा समजल्यानंतरही तशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्नच न करणे; हा मात्र मोठा दोष आहे आणि याला परमेश्वरही क्षमा करीत नाहीत, हे पक्के ध्यानात ठेवावे.
( कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment