५ सप्टेंबर २०१६
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ जयंती !
आज श्रीगणेश चतुर्थी, भगवान श्रीगणेशांच्या साधकीय जीवनातील आदर्शांचे अत्यंत नाविन्यपूर्ण विवरण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून करतात. भगवान गणेशांचे कान मोठे व डोळे लहान आहेत. साधकाने ते अंगीकारावे. हत्तीच्या कानात मुंगी गेली की तो मरतो. तसे अध्यात्माची पहिली ओळख आपल्याला कानाद्वारे म्हणजेच श्रवणभक्तीतून होते व त्याने आपोआप आपला दु:खमूळ प्रपंचच संपून जातो, मनुष्यत्वातील दुर्गुण मरून देवत्व प्रकट होते, म्हणून साधकाचे कान मोठे असावेत. लांबवरची गोष्ट पाहायला आपण डोळे बारीक करतो, तसे परमार्थ जो उगीचच आपण लांब ठेवलाय, तो नीट बघता यावा म्हणून साधकाचे डोळे बारीक हवेत. हे दोन्ही श्रीगणेशांचे सद्गुण साधकाने जाणीवपूर्वक अंगी बाणवले तर प्रपंचाबरोबर त्याचा परमार्थही सुकर होऊन श्रीगणेशांसारखाच ज्ञानमय अखंड आनंद त्याला लाभतो.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment