परमार्थात सहजतेला खूप महत्त्व असते. काहीही मारून मुटकून केलेले परमार्थात ग्राह्य धरले जात नाही, कारण ते कधीच चिरस्थायी नसते. शेवटी उसने आणलेले अवसान किती काळ टिकणार ना?
आपल्या मनी मानसी मुरलेल्या विषयांचेही तसेच असते. मी सोडले म्हणून खरेतर काहीही सुटत नसते. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यथार्थतेची जाणीव करून देत सांगतात की, आपल्या मनातले विषय आतूनच सुटले पाहिजेत, मुद्दाम ठरवून सोडलेला विषय हा वासनाक्षय मानला जात नाही. माकड शांत बसले म्हणून त्याच्या माकडचेष्टा कायमच्या संपल्या असे होते का? थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या होणारच त्याचे. इकडे कडकडीत निर्जली उपास करायचा पण मनात मात्र जेवणावळींचा विचार करायचा किंवा स्वप्नात जेवणच पहायचे, हा काही वासनाक्षय नाही. एखादी गोष्ट सुटली तर मग मनात देखील ती गोष्ट येता कामा नये. यासाठी आपल्याकडून भरपूर साधनाच व्हावी लागते. अशक्य नसले तरी सहज शक्य देखील नाही हे. मनापासून प्रयत्न करण्याची तयारी, पक्का निर्धार आणि आपल्या श्रीसद्गुरूंवर व त्यांनी दिलेल्या साधनेवर निष्ठा असल्यास हे नक्कीच अवघड वाटणार नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
19 September 2016
॥ अमृतबोध ॥ १९ सप्टेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
September
(30)
- ॥ अमृतबोध ॥३० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ सप्टेंबर २०१६
-
▼
September
(30)
0 comments:
Post a Comment