
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते. ग्रंथ काही तुमच्या शंकांचे समाधान करू शकत नाहीत. ग्रंथांमध्ये जे सांगितलेले असते, त्या ज्ञानाचा श्रीसद्गुरूंच्या कृपेने जो अनुभव येतो, तोच आत्मानुभव होय. ग्रंथप्रचिती...