प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज भगवती आदिशक्ती जगदंबेच्या अवतरणाची लीलाकथा सांगत आहेत. परमात्मा आधी एकटाच होता. त्याला त्या एकटेपणाचा कंटाळा आला व त्यामुळे " आपण बहुत व्हावे " असा त्याच्या मनात संकल्प उठला. त्याबरोबर त्याच्यापासून त्याची शक्ती बाहेर पडली व तिने आपल्यामधूनच सा-या विश्वाची उत्पत्ती केली. भगवतीच्या एकमेवाद्वितीय निर्गुण निराकार शक्तीतूनच अनंत, सगुण साकार स्वरूपाचा आविर्भाव झाला. सर्व देव-देवतांच्या रूपाने तीच नटलेली आहे. एवढेच नाही तर, विश्वातील पदार्थमात्र तिचेच स्वरूप आहेत. ती सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म व विराटापेक्षाही विराट आहे. तीच सर्व जगाचा एकमेव आधार आहे !
एखाद्या दोरीमध्ये मणी ओवावेत त्याप्रमाणे तिने हे यच्चयावत् सर्व विश्व आपल्यातच गोवून ठेवलेले आहे. म्हणून "ऊयते इति उमा" या विग्रहानुसार, त्या आदिशक्तीला उपनिषदांमध्ये ' उमा ' असे संबोधले जाते. हीच भगवती उमा इंद्रादी देवतांचा अभिमान नष्ट करून, त्यांना ब्रह्मविद्येचा उपदेश करण्यासाठी लखलखीत सोन्यासारख्या अत्यंत तेजस्वी रूपात प्रकटल्याची सुंदर कथा केनोपनिषदात आलेली आहे.
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment