*'साधुबोध झाला'* मधील रहस्य प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, साधूंनी चार प्रकारांपैकी (कालच्या अमृतबोधात सांगितलेल्या) एका प्रकाराने कृपा केल्यावर शिष्याने नुसते डोळे मिटून आसनावर स्थिर बसावयाचे असते व जे जे होईल ते ते अनुभवायचे असते. हाच साधुबोध होण्याचा राजमार्ग किंवा पंथराज आहे.
सद्गुरु श्री माउली श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील बाराव्या श्लोकाच्या विवरणात यावर फार सुंदर विवेचन करतात. त्या ओव्यांचा भावार्थ पू.मामा सांगतात की, "त्या आसनावर बसून, आपण सद्गुरुस्मरण करू लागावे आणि निश्चलतेचा, एकाग्र अंत:करणाचा अनुभव घ्यावा. अत्यंत आदरपूर्वक ते स्मरण करताक्षणीच, अंतर्बाह्य सात्त्विक भावनेचा उदय होऊन आपला अहंकार विरघळू लागतो. विषयांचा विसर पडून इंद्रियांची धडपड थांबते आणि मनाचे बाह्य व्यापार आकुंचित होऊन ते जागच्या जागी निश्चलतेला पावते."
अशी निश्चलतेची आपोआप आलेली अनुभूतीच साधुबोध झाल्याची खरी खूण आहे ! म्हणूनच सद्गुरु श्री माउली साधुबोध झाल्याबरोबर तो साधक *'नुरोनिया ठेला'* असे आवर्जून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
7 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११२ ॥*
6 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १११ ॥*
साधूंच्या संगतीत राहिल्याने आपल्यामध्ये पालट होतोच. ही साधुबोध होण्याची प्रक्रिया कशी असते? हे सांगताना प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींचा एक बहारीचा अभंगचरण समोर ठेवतात.
*याकारणें श्रीगुरुनाथु ।*
*जंव मस्तकीं न ठेवि हातु ।*
*निवृत्तिदास असे विनवितु ।*
*तंव निवांत केवि होय ॥*
याचा अर्थच असा की, संतांच्या संगतीत राहावे व चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहावी. साधूंना जेव्हा वाटेल की हा आता योग्य झाला आहे, तेव्हा ते त्याच्या मस्तकावर हात ठेवतात; किंवा त्याच्यावर कृपाकटाक्ष टाकतात; किंवा त्याच्याबद्दल मनात संकल्प करतात; किंवा त्याला एकाक्षर मंत्राचा बोध करतात व त्याचा उद्धार करतात.
साधू आपल्या शिष्याला शब्दज्ञान सांगत बसत नाहीत; तर आपल्या शक्तियुक्त व ज्ञानयुक्त बलाने त्याच्यातील सुप्त शक्ती जागवतात व युक्तीने त्यास अभ्यास करावयास लावतात. हीच सर्व ख-या साधूंची बोध करण्याची पद्धत असते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
5 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११०॥*
सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील सहाव्या अभंगाचे विवरण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करीत आहेत. त्यातील पहिल्याच 'साधुबोध' शब्दातील 'साधु' या शब्दाची खोली आपण सविस्तर पाहिली. आता 'बोध' शब्दाचा विचार करूया.
पू.मामा म्हणतात की, माउली येथे 'साधुबोध झाला' असे म्हणतात. त्याचा अर्थच असा की, बोध करावयाचा नसून व्हावयाचा आहे !
तापलेल्या तव्याला चुकून जरी हात लागला, तरी हात भाजणारच. तसे संतांच्या संगतीत राहिल्यावर परिणाम हा होणारच. आधी सांगितलेल्या साधुलक्षणांची पूर्तता ज्यांच्या ठायी होते, त्यांच्या संगतीत आपण आलो की त्यांच्या कृपेने बोध होतो. पण असा बोध होण्यासाठी साधू काय करतात? तेही पाहणे जरूर आहे. पू.मामांचे ते सांगणे आपण उद्या अभ्यासूया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
4 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०९ ॥*
साधू शब्दाची विविधांगी माहिती प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज देत आहेत. सद्गुरु श्री माउलींचे साधुत्वाचे विवरण सांगून झाल्यावर ते श्रीसंत एकनाथ महाराजांचा एक सुरेख अभंग सांगतात. त्याचा भावार्थ आपण पाहू.
कोणत्याही प्रसंगी त्याच्या चित्तात क्रोधाची ऊर्मी उठत नाही व चोरांनी सर्व धन जरी लुटून नेले, तरी त्याचे मन उद्विग्न होत नाही. अगदी शत्रूने आपल्या एकुलत्या एका पुत्राचा वध केला तरी त्याच्या नेत्रांत मोहाचे दोन अश्रूही येत नाहीत. स्वत:च्या शरीरावर जरी घाला आला तरी त्याच्या चित्तातील शांतीत काहीही उणेपणा येत नाही. ज्याच्या ठायी असा 'पूर्णबोध' ठसावलेला असतो, तोच या जगात साधू म्हटला जातो. जोवर ही स्थिती एखाद्याच्या आचरणात प्रत्यक्ष दिसत नाही, तोवर खरे साधुत्व प्रकटले आहे, असेही म्हणता येत नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
3 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०८ ॥*
एखादी आई तिच्या पोराचे कौतुक केले की जशी आपल्यावर खूश होते, तसे श्रीभगवंतही त्यांच्या भक्तांचे गुणवर्णन केले, स्तुती केली की प्रसन्न होतात. त्याने ते किती आनंदित होतात हे ते स्वमुखानेच अर्जुनाला सांगतात की, "सख्या, या भक्तिकथेविषयी ज्यांच्या मनात प्रेम असते ते भक्त तीर्थक्षेत्रांप्रमाणे अत्यंत पूज्य व पवित्र मानले जातात. एखाद्या देवतेप्रमाणे आम्ही त्यांची पूजा करतो. त्यांच्याशिवाय आम्हांला इतर काहीही प्रिय वाटत नाही. त्यांचेच जणू आम्हांला व्यसन असते. त्या भक्तिकथा-प्रेमी जीवांची भेट झाली म्हणजे एखादा गुप्त खजिना हाती लागल्याप्रमाणे आम्हांला परमानंद होतो, अपार समाधान वाटते. आमच्या भक्तांच्या भक्तांनाही आम्ही आमची परमदेवताच मानतो, इतके आमचे या साधुतुल्य भक्तांवर प्रेम असते !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
2 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०७ ॥*
श्रीभगवंत भक्तराज अर्जुनाला आत्तापर्यंत सांगितलेल्या भक्तगुणवर्णनाच्या रम्य कथेचे माहात्म्य सांगतात की, "जे ही अमृताप्रमाणे मधुर व धर्माचे स्वरूप असणारी, धर्माला अनुकूल असणारी भक्तिकथा शुद्ध भावाने आणि आदरपूर्वक श्रवण करून, दृढनिश्चयपूर्वक स्वत: साधना करून या भक्तीचा अनुभव घेतील, त्यांना चांगल्या भूमीत पेरलेल्या उत्तम बीजाप्रमाणे भक्तिसुखाचे भरपूर पीक मिळेल.
तसेच मला सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य मानून आणि माझ्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून, जे मला सर्वस्व मानून राहतील, तेच या जगात खरे भक्त आणि योगी म्हटले जातील. तेच खरे साधू असून मला त्यांच्याविषयी अखंड तळमळ राहील !"
श्रीभगवंतांच्या भक्तांची स्तुती केल्यानेही एवढा महालाभ होतो, हे सद्गुरु श्री माउली मुद्दामच आवर्जून सांगत आहेत. आपल्याला त्यातून ते भक्तांची गुणवर्णनरूप सेवा करण्याचा उपदेशच करीत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
1 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०६ ॥*
भक्तांवरील आपले अपरंपार प्रेम विविधप्रकारे सांगून श्रीभगवंत आता त्या कथनाच्या शेवटाला आलेले आहेत. माझ्या लाडक्या साधूंचे गुणवर्णन करणारे, साधूंचे चरित्र गाणारे व ऐकणारे देखील मला माझ्या प्राणांहूनही प्रिय आहेत; असे देव स्वमुखाने भक्तराज अर्जुनाला सांगतात.
भक्तीचे माहात्म्य सांगताना पुढे श्रीकृष्णप्रभू सांगतात की, या भक्तीच्याच एकमात्र अवलंबनाने माझे पूर्ण प्रेम संपादन करता येते. एवढेच नाही तर, मलाही त्या अनन्यभक्तांचा वेध लागून मी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो. म्हणूनच ही भक्तस्थिती अवश्य प्राप्त करून घ्यावीच, अशी विशेष गोष्ट आहे. तीच सर्वश्रेष्ठ होय !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...