Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 June 2016

॥ अमृतबोध ॥ ३० जून २०१६



३० जून २०१६

सर्वसामान्यपणे आपली समजूत असते की, आपली बायकापोरे, आपले घरदार, कुटुंब म्हणजे आपला संसार. आणि आपल्याला पक्की खात्री असते की आपल्या सर्व गोष्टी या दुस-या लोकांमुळेच होत असतात. म्हणून आपण सवयीनेच आपल्या प्रत्येक सुखदु:खाचे, प्रत्येक भोगाचे खापर सोयिस्कररित्या दुस-यावर फोडतो. या दोन्ही गोष्टी अगदी चुकीच्याच आहेत, शिवाय परमार्थात फार घातक देखील.
या संदर्भात अगदी महत्त्वाचा बोध प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून करीत आहेत.
आपल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याच वासना कारणीभूत असतात व त्या आपणच पूर्वी केलेल्या कर्मांवर अवलंबून असतात. म्हणून आपणच आपल्या सर्व गोष्टींचे मूळ कारण असतो, दुसरा कोणीही नाही. या चांगल्या-वाईट वासनांच्या कचाट्यातून जो स्वत:ला वेगळा समजू शकतो, अलिप्त राहतो, तोच खरा पारमार्थिक होय. हाच विलक्षण विचार आजच्या बोधातून प. पू. श्री. मामा अगदी नेमकेपणे अधोरेखित करीत आहेत.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

29 June 2016

॥ अमृतबोध ॥ २९ जून २०१६


संतांच्या उपदेशात फार मार्मिकता असते. " गागर में सागर " भरावा तर तो संतांनीच. थोडक्या शब्दांतून प्रचंड अर्थ फक्त संतच काढू शकतात. आजचे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे अमृतवचन हे याचा वस्तुपाठ आहे. प्रपंच आणि परमार्थात साधकाची मनोभूमिका कशी असावी म्हणजे हाती घेतलेले कार्य सर्वार्थाने सुखदायक होते, त्याचे अचूक मार्गदर्शन पू. मामा यातून आपल्याला करीत आहेत. प्रपंचात कष्टाला पर्याय नाही, त्याबद्दल रडतही बसू नये. परमार्थ हा धैर्याची अपेक्षा करतो, त्यात लेचेपेचे धोरण उपयोगी पडत नाही, तिथे पक्का निर्धारच हवा. पण श्रीसद्गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व असतात, त्यांच्या चरणीं अनन्यशरणागती झाल्याशिवाय काहीही पदरात पडत नाही. हाच नेमका बोध पू. श्री. मामा करीत आहेत. हे जमले की यश लाभलेच म्हणून समजा  !!
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

28 June 2016

॥ अमृतबोध ॥ २८ जून २०१६

॥ अमृतबोध ॥
२८ जून २०१६
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज हे भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे निष्ठावंत वारकरी. त्यांनी सलग ५३ वर्षे माउलींसोबत पंढरीची वारी केली. एवढेच नाहीतर वारीच्या नित्यक्रमात म्हटल्या जाणा-या आंधळा, पांगळा, वासुदेव इत्यादी प्रकारच्या गूढ योगानुभूती सांगणा-या असंख्य अभंगांवर निरूपणेही केली. संतांच्या या अभंगांवर पू. मामांशिवाय फारसे कोणी आजवर बोललेलेच नाही. ही सर्व निरूपणे श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेली असून अभ्यासकांनी वाखाणलेली आहेत.
माउलीकृपेने वारी पू. मामांच्या अंगोअंगी मुरलेली होती, म्हणून एका सच्च्या वारक-याचेच प्रामाणिक मनोगत प. पू. मामा जणू आजच्या अमृतबोधातून व्यक्त करीत आहेत. ख-या वारक-याला हरिनामाचेच व्यसन असते व तो त्याच मस्तीत, निरंतर गुरुप्रेमाच्या धुंदीतच रममाण झालेला असतो. आजचे हे अमृतवचन प. पू. मामांचेच हृदयभाव प्रकट करीत आहे.
प. पू. श्री. मामासाहेबांचे हृदय-अधिष्ठाते भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसोहळ्याचे आज प्रस्थान, त्यानिमित्त मुद्दाम हा खासा अमृतबोध !!
( अशा पोस्टस नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

27 June 2016

॥ अमृतबोध ॥ २७ जून २०१६



॥ अमृतबोध ॥

२७ जून २०१६

साधकांना साधना करताना नाना शंका-कुशंका सतावत असतात. त्यातील एक कुशंका म्हणजे, आपल्या श्रीसद्गुरूंना आपली नक्की आठवण आहे का? त्यांचे आपल्याकडे खरेच लक्ष आहे ना? या ९९% साधकांच्या शंकेचे, स्वत:च पडताळून पाहता येईल असे, अतिशय नेमके व अचूक उत्तर प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या आजच्या अमृतबोधात आहे.
( अशा पोस्टस नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

26 June 2016

॥ अमृतबोध ॥२६ जून २०१६

॥ अमृतबोध ॥
२६ जून २०१६
संतांचे " सांगणे " फार चपखल असते. आजचेच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे अमृतवचन याची साक्ष आहे. प. पू. श्री. मामा सांगतात की, साधकाने प्रपंच करताना व परमार्थ करताना मनाची/चित्ताची भूमिका कशी ठेवायला हवी ते. हे जर प्रयत्नपूर्वक जमले तर, वेगळे कठीण कष्ट न घेता प्रपंच करतानाही सहज परमार्थ साधेल, यात शंका नाही.
( अशा पोस्टस नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

25 June 2016

॥ अमृतबोध ॥ २५ जून २०१६

॥ अमृतबोध ॥

२५ जून २०१६

श्रीभगवंतच लोकांच्या उद्धारासाठी संतांचे रूप घेऊन प्रकट होत असतात. पण या दोघांमध्ये महत्त्वाचा भेद आहे. भगवंतांची करुणा आणि संतांच्या करुणेत फार फरक आहे. देव पित्याच्या भूमिकेत असतात तर संत मातृवत्सल असतात. त्यांची करुणा अपरंपार आणि अगाध असते. ह्याच गोष्टीचे अत्यंत चपखल वर्णन प. पू. श्री. मामा आजच्या विचारातून करीत आहेत. विशेष म्हणजे आज इंग्रजी तारखेनुसार प. पू. श्री. मामांची १०२ वी जयंती आहे. म्हणूनच संतांच्या अवताराचे महत्त्व आणि माहात्म्य, त्याच संतत्वाचे परमादर्श असणा-या प.  पू. श्री. मामांच्या वचनाने, आज त्यांच्या जयंतीदिनी आपण जाणून घेऊया.
( अशा पोस्टस नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

24 June 2016

॥ अमृतबोध ॥ २४ जून २०१६



॥ अमृतबोध ॥

२४ जून २०१६

कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामस्मरण साधनेविषयी आणि आपण सर्वसामान्यांच्या त्या साधनेविषयीच्या अनादराबद्दलचे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे महत्त्वपूर्ण विचार  !
( कृपया हे पेज जरूर लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

23 June 2016

॥ अमृतबोध ॥ २३जून २०१६



॥ अमृतबोध ॥

२३ जून २०१६

उत्तम साधकाचा विचार कसा असावा? याचे अतिशय सुंदर व मार्मिक स्पष्टीकरण करणारे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे अमृतवचन
Read More

22 June 2016

॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१६



॥ अमृतबोध ॥

२२ जून २०१६

अंत:करण शुद्धीचे परमार्थमार्गातील अनन्यसाधारण महत्त्व सांगणारे प. पू. सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे अमृतवचन  !!
Read More

21 June 2016

॥ अमृतबोध ॥ २१ जून २०१६



नमस्कार  !!
प. पू. सद्गुरु श्री. मामा महाराज देशपांडे हे विलक्षण सत्पुरुष होते. त्यांनी वेळोवेळी केलेले मार्मिक उपदेश परमार्थ साधकांसाठी निरंतर ऊर्जास्रोत आहेत. या उपदेश-वचनांच्या वाचनाने, मननाने आपल्या जीवनात अमूलाग्र बदल घडवले जाऊन आपले जीवन आणखी आनंददायक होते, यात शंका नाही.
याच विचाराने आजपासून आम्ही आपल्या या पेजवरून दररोज प. पू. श्री. मामांचा एक विचार त्यांच्या सुरेख फोटोसह पोस्ट करणार आहोत. कृपया आपल्या दिवसाची सुरुवात या सद्विचाराच्या वाचनाने करावी, ही विनंती. तसेच ही इमेज फेसबुक, व्हॉटसप सारख्या माध्यमांतून आपल्या स्नेही-सुहृदांपर्यंत आवर्जून पोहोचवून त्यांच्याही दिवसाची आनंददायी सुरुवात करून द्यावी, ही प्रार्थना !
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्यानिमित्त प. पू. श्री. मामांचा योगविषयक मौलिक विचार आपल्यापुढे ठेवत आहोत.

( कृपया असे विचार रोज वाचण्यासाठी खालील पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/-सद्गुरुबोध-Sadgurubodh-995762407205984/ )
Read More

20 June 2016

श्रीज्ञानेश्‍वरीचे अपूर्व भाष्यकार




‘‘आई, श्रीज्ञानेश्‍वर माउली ‘पायाळू’ हा शब्द वापरतात. ‘पायाळू’चा नेमका अर्थ काय गं?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणार्‍या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू. पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्‍वविख्यात सत्पुरुष, प.पू. श्री श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, १५ मार्च २०१५ रोजी पू. श्री मामांची २५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या अलौकिक प्रतिभासंपन्न ज्ञानेश्‍वरी अभ्यासकाच्या कार्याचा हा अल्प परिचय.
मामासाहेब हे भगवान श्रीज्ञानेश्‍वरी माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली’ हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या वाङ्मयाच्या शब्दन् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन करू शकत असत. इतकी ज्ञानेश्‍वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता.

मामांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत लाखो प्रवचनांच्या माध्यमातून माउलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमधील त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनीदेखील ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास सुरू केला. संतविचारांच्या आधारे उपासनेला सुरुवात केली.
मामा हे तरुणपणी उत्तम नाट्य दिग्दर्शक व नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी माउलींच्या जीवनावर लिहिलेले ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे चार अंकी संगीत नाटक अतिशय बहारीचे आहे. त्यांच्या संहितेवरूनच दोन वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत नाटक रंगभूमीवर आले व हिंदुस्थानभर गाजले होते.

माऊलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, विलक्षण, रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व भक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू. मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्‍वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणार्‍या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू. मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘ज्ञानेश्‍वरीचे अपूर्व भाष्यकार’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे पू. मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्‍वरीचे मार्गदर्शन घेत असत.

मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन’ नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस सव्वा दोनशे पुस्तके प्रकाशित करून अल्पदरात विक्री करणारी ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू. मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे.

या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी-योगाचे औचित्य साधून ज्ञानेश्‍वरीच्या या अलौकिक आणि अपूर्व भाष्यकारास, प.पू. श्री. मामा देशपांडे महाराजांस ही सप्रेम शब्दांजली अर्पण असो! त्यांनी लावलेली ही ज्ञानज्योत आपण सर्वांनी अनुसरून हा अभ्यास-वसा जोपासणे, वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज व प. पू. श्री. मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. प. पू. मामा प. पू. काकांना गुरुस्थानीच मानत असत. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प. पू. मामा प. पू. काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा होत असे. प. पू. काकांनी एकदा प. पू. मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प. पू. मामा नेहमीच प. पू. काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
आज प. पू. मामांच्या पंचविसाव्या पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक साष्टांग नमस्कार !!


Read More

16 June 2016

प .पू . मामासाहेब देशपांडे आणि मातुल घराणे ( वंशावळ )







Read More

विशेष घटना आणि काल









Read More

15 June 2016

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म pdf

प. पू. सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या सव्विसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त लिहिलेल्या " झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म " या लेखमालेची ही पीडीएफ आहे. ही संग्रही ठेवल्यास हे  संपूर्ण दिव्य चरित्र त्यामुळे कधीही व कायम वाचण्यासाठी सोपे जाईल. या पीडीएफची प्रिंट काढणेही सुलभ ठरते. कृपया याचा भाविकांनी जरूर लाभ घ्यावा ही विनंती  !!


https://drive.google.com/file/d/0Bybr9CTA2ot0UkJQVEpZQ3M5VUU/view?usp=sharing


Read More

प.पू.सद्गुरु श्री मामांचे हस्ताक्षर


Read More

श्रीसद्गुरु चरणमुद्रा


Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates