संतांच्या उपदेशात फार मार्मिकता असते. " गागर में सागर " भरावा तर तो संतांनीच. थोडक्या शब्दांतून प्रचंड अर्थ फक्त संतच काढू शकतात. आजचे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे अमृतवचन हे याचा वस्तुपाठ आहे. प्रपंच आणि परमार्थात साधकाची मनोभूमिका कशी असावी म्हणजे हाती घेतलेले कार्य सर्वार्थाने सुखदायक होते, त्याचे अचूक मार्गदर्शन पू. मामा यातून आपल्याला करीत आहेत. प्रपंचात कष्टाला पर्याय नाही, त्याबद्दल रडतही बसू नये. परमार्थ हा धैर्याची अपेक्षा करतो, त्यात लेचेपेचे धोरण उपयोगी पडत नाही, तिथे पक्का निर्धारच हवा. पण श्रीसद्गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व असतात, त्यांच्या चरणीं अनन्यशरणागती झाल्याशिवाय काहीही पदरात पडत नाही. हाच नेमका बोध पू. श्री. मामा करीत आहेत. हे जमले की यश लाभलेच म्हणून समजा !!
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
0 comments:
Post a Comment