३० जून २०१६
सर्वसामान्यपणे आपली समजूत असते की, आपली बायकापोरे, आपले घरदार, कुटुंब म्हणजे आपला संसार. आणि आपल्याला पक्की खात्री असते की आपल्या सर्व गोष्टी या दुस-या लोकांमुळेच होत असतात. म्हणून आपण सवयीनेच आपल्या प्रत्येक सुखदु:खाचे, प्रत्येक भोगाचे खापर सोयिस्कररित्या दुस-यावर फोडतो. या दोन्ही गोष्टी अगदी चुकीच्याच आहेत, शिवाय परमार्थात फार घातक देखील.
या संदर्भात अगदी महत्त्वाचा बोध प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून करीत आहेत.
आपल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याच वासना कारणीभूत असतात व त्या आपणच पूर्वी केलेल्या कर्मांवर अवलंबून असतात. म्हणून आपणच आपल्या सर्व गोष्टींचे मूळ कारण असतो, दुसरा कोणीही नाही. या चांगल्या-वाईट वासनांच्या कचाट्यातून जो स्वत:ला वेगळा समजू शकतो, अलिप्त राहतो, तोच खरा पारमार्थिक होय. हाच विलक्षण विचार आजच्या बोधातून प. पू. श्री. मामा अगदी नेमकेपणे अधोरेखित करीत आहेत.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
0 comments:
Post a Comment