॥ अमृतबोध ॥
॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥
श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झालेले सोने दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याचे काही सोने करू शकत नाही. म्हणून सर्वांनाच स्वत:च्या मुक्तीनंतर इतरांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान मिळणे ही फार महत्त्वाची स्थिती आहे. म्हणूनच श्री तुकोबाराय महाराज म्हणतात, "सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्यारें होऊं नका रानभरी ॥"
असा जाणत्या व दावित्या सद्गुरूंकडून ज्याला श्रीगुरुकृपेचा लाभ झाला नाही ; म्हणजेच श्रीगुरूंच्या कृपेने जीवात्म्यास 'सुषुम्ना मार्ग' (म्हणजेच 'वाट') ; ज्या वाटेने जायचे व परमात्मरूप व्हायचे ; ती वाट सापडवून दिली जात नाही, तोपर्यंत अद्वैत सिद्धांताचे ज्ञान होणार नाही व ते ज्ञान ज्याला नाही, 'त्यां कैचे कीर्तन घडे नामी ?' त्याला खऱ्या अर्थाने कीर्तन घडणार नाही, असे श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील तिसऱ्या चरणात सांगतात.
आता 'खरे कीर्तन किंवा संकीर्तन' म्हणजे काय ? हे प.पू.श्री.मामा सविस्तर सांगतात, ते आपण उद्यापासून पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
फार सुंदर. खरच वाटल की कमी होत नाही हेच खरे
ReplyDelete