काम, क्रोध व लोभ या तीन दुर्गुणांना भगवान श्रीकृष्णांनी श्रीगीतेत ' नरकाचे द्वार ' म्हटलेले आहे. भगवान श्रीमाउलींनी सोळाव्या अध्यायातील त्या श्लोकांवर श्रीज्ञानेश्वरीत फारच मार्मिक व विस्तृत लिहिलेले आहे. त्याच विवरणाचे सार सांगताना, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज अवघ्या एकाच वाक्यात प्रचंड अर्थ असणारा बोध करतात की, लोभच यच्चयावत् सर्व पापांचे मूळ आहे. अंत:करणात लोभ असला की तो आपल्याला काहीही सुचू देत नाही व त्या लोभाची पूर्ती होईपर्यंत आपला सदसद् विवेकही नष्ट करून टाकतो. लोभाच्या आहारी गेलेला माणूस कधीच समजुतदारपणे वागू शकत नाही. अक्षरश: अंगावर काटा येईल अशी भयानक कृत्ये करायला लावून लोभ त्याचे पूर्ण वाटोळे करूनच शांत होत असतो. लोभाचा हा दुर्गुण सहजतेने फायद्यात बदलण्याचाही सोपा पण प्रयत्नसाध्य मार्ग प. पू. श्री. मामा सांगतात की; लोभ असावा, पण ईश्वरभजनी असावा.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
14 September 2016
॥ अमृतबोध ॥ १४ सप्टेंबर २०१६
13 September 2016
॥ अमृतबोध ॥ १३ सप्टेंबर २०१६
पापाचे गणित फार अवघड असते. पाप एकदा हातून घडले तरी त्याचा प्रभाव तसा लगेच संपत नसतो. त्या पापाची भयंकर पद्धत सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपल्या हातून एखादे पाप घडले की ते ताबडतोब फलद्रूप होत नसते, ते पुन्हा पुन्हा केले जाते व शेवटी कर्त्याचा सर्वनाशच ओढवून आणते. म्हणून पाप घडण्यापूर्वी आपण शंभर वेळा त्याच्या ब-या-वाईट परिणामांचा विचार केलाच पाहिजे. पापभीरु वृत्ती असणे हा दुबळेपणा अजिबात नाही, उलट ते नेहमीच हिताचे ठरते. श्रीसंत तुकाराम महाराजही, " पापाची वासना नको दाऊ डोळां । त्याहूनि आंधळा बराच मी ॥ " असेच म्हणतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
12 September 2016
॥ अमृतबोध ॥ १२ सप्टेंबर २०१६
१२ सप्टेंबर २०१६
पाप आणि पुण्य यांचे गणित मोठे मजेशीर अाहे. त्यांची बेरीज होते, पण वजाबाकी होत नाही. म्हणजे पाप आणि पुण्य हे एकत्र होऊन मनुष्यजन्म मिळतो, पण दोन्हींही स्वतंत्रपणे भोग भोगूनच संपवावे लागतात. आपल्या पदरी खूप पाप आहे, ते जावे म्हणून एखाद्याने खूप पुण्य केले, तरीही त्या पापाचा भोग होणारच. पुण्याने पाप नष्ट करता येत नाही. यासाठी पू. मामा सुंदर उदाहरण देतात. आपण नेहमी पाहतो की, जगात सर्वात जास्त दु:ख हे साधू-संतांनाच भोगावे लागलेले आहे. अगणित पुण्य गाठीशी आहे म्हणूनच ते साधुत्वाला पोचलेले असूनही, उसन्या आणलेल्या पापाचा भोग म्हणून त्यांना प्रचंड अपेष्टा सहन कराव्या लागतात व ते संतही आनंदानेच ते दु:ख भोगून संपवतात.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी. संतांचे प्रारब्ध आपल्यासारखे स्वत: कमावलेले नसते. ते तर त्यांना श्रीभगवंतांनी आपल्या कर्मांच्या गंगाजळीतून उचलून दिलेले कर्म असते, म्हणूनच ते त्रयस्थाच्या वृत्तीने अलिप्तपणे ते भोगतात व मोकळे होतात. यातूनही ते आपल्याला व्यवहारात कसे वागावे याची योग्य शिकवणच देत असतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 September 2016
॥ अमृतबोध ॥ ११ सप्टेंबर २०१६
११ सप्टेंबर २०१६
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
10 September 2016
॥ अमृतबोध ॥ १० सप्टेंबर २०१६
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
9 September 2016
॥ अमृतबोध ॥९ सप्टेंबर २०१६
९ सप्टेंबर २०१६
प्रत्यक्ष सुख-दु:खांपेक्षाही त्यांच्या नको इतक्या चिंतनाने आपण ती कर्मे उगीचच वाढवतो व जास्त कष्टी होत असतो. एखादी घटना अवघी काही क्षणांची असली तरी आपण अक्षरश: दिवसभर देखील त्यात मनाने व शरीरानेही गुंतलेलो असतो, हेच त्या भावनांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरील परिणामांचे मूळ आहे. म्हणूनच आपण जास्त काळ व जास्त तीव्रतेने ते सुख-दु:ख भोगतो. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपल्याच पूर्वकर्मांचे चांगले-वाईट फळ आज आपण उपभोगत आहोत, हे जाणून त्या प्रत्येक परिस्थितीत जो प्रयत्नपूर्वक शांत राहतो, तोच त्या कर्मांच्या कचाट्यातून लवकर सुटून खरा सुखी होतो. हे जमणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. फक्त मनापासून निर्धार तेवढा हवा.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
8 September 2016
॥ अमृतबोध ॥ ८ सप्टेंबर २०१६
८ सप्टेंबर २०१६
सामान्यपणे आपल्याला एक विचित्र सवय असते की, आपण इतरांच्या बोलण्याचा नको इतका विचार करून हकनाकच आपली मनस्थिती बिघडवून घेत असतो. ह्या दुर्गुणावर मात करण्यासाठीचा सोपा उपाय प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, ज्यांना सतत उलटसुलट विचार मांडायची सवय असते, जे कधीच विवेकाने एका निर्णयावर ठाम होऊ शकत नाहीत, अशा कोत्या बुद्धीच्या माणसांचा व त्यांच्या मतांचा आपण अजिबात विचारच करू नये. त्यांच्याकडे कायम दुर्लक्षच करावे, म्हणजे आपण समाधानी राहून हाती घेतलेले आपले काम चोख होते. त्यांच्याकडे जास्त लक्ष दिल्यास, विचारांचे स्थैर्य जाऊन आपलाही गोंधळ उडतो व त्यामुळे आपली सगळीच कामे अर्धवट होऊन पदरी निराशाच येते. हाच नियम दररोजच्या जीवनाबरोबर परमार्थातही फार उपयुक्त आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
