प्रेम ही हृदयीची निखळ भावना आहे. म्हणूनच प्रेमाचे यथार्थ वर्णन करणे आजवर कोणालाही जमलेले नाही. पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज यासाठी देवर्षी नारदांचाच संदर्भ देतात. आपल्या भक्तिसूत्रांमध्ये देवर्षी म्हणतात की, प्रेमाचे स्वरूपवर्णन करणे कठीणच आहे. मुका माणूस साखरेची गोडी चाखेल, पण तो ते वर्णन करून सांगणार कसे? आपला अनुभव तो शब्दांनी बोलून दाखवूच शकत नाही. तद्वतच, प्रेम करूनच पाहावे लागते; भक्ती स्वत: करूनच अनुभव घ्यावा लागतो. तेथे कल्पनेला वाव नाही. आणि यासाठी श्रीगुरुकृपेची नितांत आवश्यकता असतेच.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
13 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *१३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५९ ॥*
12 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *१२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५८ ॥*
सद्गुरु श्री माउली येथ भक्तीचे श्रेष्ठत्व सांगत आहेत. त्यांच्या त्या भक्तिविवरणाचे मर्म सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "खरे म्हणजे, प्रेमाने केलेले शास्त्रसंमत सर्वच कर्म श्रीभगवंतांना आवडते. भक्तीमध्ये श्रीभगवंतांचा परितोषच महत्त्वाचा असतो."
यासाठीच माउली प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्याच मुखाने सांगतात की, "माझे माझ्या भक्तांवर इतके प्रेम असते की, मला अर्पण करण्याच्या बुद्धीने एखादे फळ किंवा फूल जरी त्यांनी दिले तरी मी ते तत्काळ सेवन करतो. फळ-फूल सोडा, साधे वाळलेले पान जरी अर्पण केले तरी, ते शुद्ध भक्तिप्रेमाने मला दिलेले असल्याने, मला अमृतपानासारखेच वाटते. त्यानेही मी तृप्त होतो. एकवेळ पालाही नाही मिळणार, पण जगात पाण्याला काहीच कमतरता नाही ना? तेही जर मनोभावे मला अर्पण केले तर त्यानेही मी अत्यंत संतुष्ट होतो. अर्जुना, सुदाम्याचे पोहे नाही का मी आवडीने भक्षण केले? कारण, मला खरा भक्तिभाव प्रिय आहे, त्यात लहान-मोठा असा भाव मी मानत नाही. ज्याच्या मनात माझ्याविषयी निष्कलंक, अव्यभिचारी भक्ती आहे, त्याच्या घरचा मी कायमचाच पाहुणा आहे. म्हणून ज्याला माझे प्रेम संपादन करावयाचे आहे, त्याने आपली मन व बुद्धी स्वाधीन ठेवून, आपल्या हृदयात माझे विस्मरण कधीही होऊ देऊ नये !"
श्रीभगवंतांना ज्याने संतोष होईल, ते ते प्रत्येक शास्त्रोचित कर्म हे भक्त म्हणून आपले आवश्यक कर्तव्यच नव्हे काय?
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *११ फेब्रुवारी २०१७* *॥ श्रीगुरुप्रतिपदा ॥* *॥ हरिपाठ मंजिरी - ५७ ॥*
प्रेमाने व नेमाने साधना केली तरच श्रीगुरुकृपेची अलौकिक अनुभूती येते. श्रीगुरूंनी दिलेली साधना प्रेमाने करणे, हाच खरी भक्ती लाभण्याचा एकमात्र मार्ग आहे.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगात म्हणतात, *"बळेंवीण शक्ति बोलों नये ॥४.१॥"* याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "अंगात बळ असल्याशिवाय शक्तीचे प्रदर्शन करू नये. बरे; नुसती शक्तीच असेल पण युक्ती नसेल, तरी काही उपयोग नाही. म्हणून ज्ञान, शक्ती आणि युक्ती यांचा समन्वय असावा लागतो." हा समन्वय योग्यप्रकारे झाला तरच आपल्या हृदयात विशुद्ध भक्ती प्रकट होते. हे सर्व काही पूर्वपुण्याईच्या योगाने प्राप्त होणा-या श्रीगुरुकृपेचेच उत्तम फळ मानलेले आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
10 February 2017
॥ अमृतबोध ॥ १० फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ५६ ॥
आपल्या अंत:करणातील प्रेमभावाला सद्गुरूंच्या कृपेचे बळ प्राप्त झाले की अनुभूतीरूप फळ मिळते; असे पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. याचे आणखी स्पष्टीकरण करताना ते म्हणतात की, एखाद्याला शिरा-पुरी खायचा भाव निर्माण झाला; परंतु ते बनवण्याची माहिती व सामानसुमान जमवून ते करण्याचे कष्ट केल्यानंतरच तृप्ती लाभते. तसेच आपल्या प्रेमभावाचेही असते. त्याला श्रीसद्गुरूंच्या कृपेचे बळ लाभल्यावरच तृप्ती मिळते.
यासाठी पू.मामा श्रीसंत एकनाथ महाराजांचे सुंदर प्रमाण सांगतात. प्रेमाशिवाय सर्व काही व्यर्थ अाहे. वेदांचे ज्ञान, श्रुती, स्मृती, ध्यान-पूजन, श्रवण कीर्तन इत्यादींचे ज्ञान श्रीगुरूंकडून करून घेतले; तरी ते नुसते शब्दज्ञान होईल. परंतु तेच शक्तियुक्त म्हणजेच प्रेमयुक्त मिळाले तर मात्र उपयोगी पडेल. श्रीसद्गुरूंची ही प्रेममय कृपाशक्ती पूर्वपुण्याईने प्राप्त होते. ती मिळाल्यानंतर साधनाही प्रेमाने घडली पाहिजे. अशी भक्ती झाली की मुक्ती मिळणारच, असे श्री माउली आवर्जून सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
9 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५५ ॥*
सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील चौथ्या अभंगाचा सरलार्थ सांगून झाल्यावर, आता प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यातील शब्दांच्या गूढार्थाचे विवरण करीत आहेत.
सद्गुरु श्री माउलींच्या 'भावेंवीण भक्ति' मधील भाव शब्दाबद्दल ते म्हणतात, "या 'भाव' शब्दाचे अनेक अर्थ संभवतात. पण श्री माउलींना येथे त्याचा 'प्रेम' हाच अर्थ अभिप्रेत आहे. भक्तीचे स्वरूपच मुळी प्रेममय असल्याचे देवर्षी श्री नारदमुनी आपल्या भक्तिसूत्रांमध्ये सांगतात. म्हणून प्रेमाने केलेली भक्ती असेच माउलींना येथे म्हणायचे आहे.
आता हा भाव नुसता बोलण्याचा आहे की त्यातून काही कृती देखील अपेक्षित आहे? कृती हवी असेल तर नुसत्या प्रेमभावाचे तेथे चालत नाही. कारण माउलीच म्हणतात की, 'भावबळे आकळे ए-हवी नाकळे ।' भावाला बळ प्राप्त झाल्याशिवाय फळ मिळत नाही. भाव आपला तर बळ श्रीगुरूंचे. नंतर साधना आपली व तीही भावाने म्हणजे प्रेमाने केली तर ते योग्य फळ मिळते, अन्यथा नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
8 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५४ ॥*
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या चौथ्या अभंगाच्या शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्याचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, सर्वसामान्य लोक जेवढ्या आस्थेने प्रपंच करतात, तेवढ्या परिश्रमाने हरिभजन करीत नाहीत; असे येथे माउली आपले दु:ख व्यक्त करतात. आणि म्हणतात की, जर त्याच आस्थेने, प्रेमाने भगवन्नामाचा सतत जप केला, तर या दु:खमूळ प्रपंचाची आसक्ती हळू हळू कमी होत जाऊन, त्याच्या जीवघेण्या बंधनातून तुमची मुक्तता होईल व सर्वश्रेष्ठ असा आनंदही प्राप्त होईल.
प्रपंचाची आपल्याला रात्रंदिवस सवय पडलेली असते. त्यामुळे आपण त्यात सतत गढून गेलेलो असतो. तो प्रपंच कायम वेगवेगळी दु:खेच समोर आणत असला, तरीही आपण नेटाने करतोच ना? पण तीच आपली आस्था परमार्थ करायचा म्हटला की कोठे निघून जाते बरे? जर तेवढ्या प्रेमाने आपण नाम घेतले तर दु:खांचा व दु:खरूप प्रपंचाचाही समूळ नाश होईलच, असे श्री माउली छातीठोकपणे सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
7 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५३ ॥*
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगातून आपल्याला फार मार्मिक उपदेश करतात. त्यावर नेमके भाष्य करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, अंतर्यामी भक्ती ठसल्याशिवाय मुक्तीचे नावच काढू नये. जसे, अंगी काहीतरी करामत, कौशल्य, बळ असल्याशिवाय पराक्रमाच्या पोकळ गप्पांना अर्थ तरी असतो का? तसे, नुसती लगबग करून परमार्थ होत नाही किंवा ईश्वरप्रसाद लाभत नाही. त्यासाठी स्वस्थपणाने राहून, निश्चल स्थिती प्राप्त करून घ्यावी लागते. त्याशिवाय बाकीच्या सर्व खटपटी व्यर्थ आहेत.
परमार्थ हा बोलघेवड्यांचा प्रांतच नव्हे. जो नेटाने व कष्टाने तसेच प्रेमादराने श्रीगुरूंनी दिलेले साधन करतो, तोच या प्रांतात खरोखरीच काहीतरी मिळवतो. बाकी नुसत्या गप्पा मारणा-यांना येथे काहीही प्राप्त होत नाही. योग्य दिशेने, योग्य प्रकाराने, निष्ठेने व शांतपणे केलेले प्रयत्नच परमार्थात यशस्वी होतात. इथे केवळ धावाधावीला किंमत नाही. उलट सर्व प्रकारचे निश्चलत्व कसे साधेल? हेच येथे महत्त्वाचे मानलेले आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...