Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

9 May 2017

॥ अमृतबोध ॥ ९ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४४ ॥

व्यसनी माणूस बरोबर दुस-या व्यसनी माणसाची संगत शोधतो. पण संतांच्या संगतीचे तसे मुळीच नसते. मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर, ज्याचे पूर्वसुकृत उदयाला येते, त्यालाच संतांची संगत करावीशी वाटते. त्यामुळे तो संतांच्या शोधात असतो. त्याच्या गाठीशी पूर्वीचे सुकृत म्हणजेच पूर्वजन्मी कमविलेले पुण्य असल्यामुळे, दैवयोगाने त्याला तसे संतमहात्मे भेटतातही.
संतांविषयी प्रेम वाटणे, त्यांची संगती करावीशी वाटणे, त्यांनी केलेल्या बोधाचे मनन करावेसे वाटणे इत्यादी सर्व गोष्टी पूर्वसुकृतामुळेच घडतात. अशी आवड वाटू लागल्यावर त्या माणसाला तसे संतमहात्मेही त्यामुळे आपोआप भेटतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

8 May 2017

॥ अमृतबोध ॥ ८ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४३ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या आठव्या अभंगात म्हणतात, "संतांचें संगति मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥८.१॥" या चरणाचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, प्रत्येक प्राणिमात्र कोणा ना कोणाची संगत करूनच असतो. तो संगतीशिवाय राहू शकत नाही. त्यातही एक सोपे गणित आहे की, ज्याला ज्याची आवड त्याला तशाच प्रकारची संगत बरोबर मिळत असते.
जो व्यसनी असतो, त्याला व्यसनाधीन असलेल्या मनुष्याबद्दल आस्था वाटते व तो नेमका तशाच माणसाची संगत करतो. जो द्रव्यार्थी असतो त्याला, ज्याच्याजवळ पैसा आहे, अशाचीच संगत करावीशी वाटते. ज्याला कीर्तीची हौस, तो मोठमोठ्या हुद्देवाल्यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे, ज्याला जे व्यसन, त्यास त्याचा पुरवठा ज्याच्यातर्फे, त्याचीच संगत त्या व्यसनी माणसास करावीशी वाटते. ही झाली लौकिक जगातली पद्धत. पण संतांच्या संगतीचे मात्र तसे नसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

7 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४२ ॥*

श्रीभगवंतांचे नाम हे सर्वात सोपे साधन नक्कीच आहे, पण ते सामान्यपणे सुलभ नाही, दुर्लभच आहे. याचे कारण सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या आठव्या अभंगाच्या समारोपात सांगतात.
त्याचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, वास्तविक पाहिले तर नामस्मरण करण्याला काहीच कठीण नाही. परंतु मनुष्याची त्यावर श्रद्धाच नसल्यामुळे, ते हातून घडत नाही. त्यामुळेच त्या नामामृताची खरी गोडी लागून चटक उत्पन्न होणे, हे तर फारच दुर्घट होऊन राहिलेले आहे; असे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली स्पष्टच सांगतात.
नामसाधन सहज व सोपे असूनही केवळ आपल्या आळस आणि अश्रद्धेमुळे दुर्लभ होऊन बसलेले आहे ! ज्याची आपल्याला खरी आवड निर्माण होत नाही, त्याचे अनुसंधानही मग घडत नाही. नामामृताची गोडीच न वाटल्यामुळे त्याची चटकही लागत नाही; अाणि म्हणूनच इतके सहज-सोपे साधन उगीचच दुर्लभ झालेले आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

6 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *६ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४१॥*

वैष्णवांनी सद्गुरुकृपेने नामामृताची खरी गोडी जाणल्यानेच ते अमरत्वाला पावले; असे श्री माउली सांगतात. ते नुसताच हा सिद्धांत सांगत नाहीत, लगेच त्यासाठी दोन उदाहरणेही देतात.
भक्तराज प्रल्हादांना या नामामृताची गोडी मातेच्या उदरात असतानाच देवर्षी नारदांच्या कृपेने दृढ समजली. देवर्षींनी कयाधूच्या उदरातील भक्तराज प्रल्हादांना 'गर्भदीक्षा' दिलेली असल्याने, प्रल्हादजी वैष्णवीमायेच्या कचाट्यात सापडलेच नाहीत. ते जन्मत:च ब्रह्मभावाने परिपूर्ण होते.
दुसरे थोर वैष्णव म्हणजे महात्मा उद्धवजी. त्यांना प्रत्यक्ष अानंदकंद भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंनीच ज्ञानोपदेश करून ही गोडी पटवून दिलेली होती. त्यामुळे तेही देहीच ब्रह्मत्वाला पावले.
या दोन्ही वैष्णववीरांना सद्गुरुकृपेने शक्ति-युक्तीसहित नाम मिळाल्यानेच त्यांना ती खरी गोडी लागली व ते श्रीहरींची प्राप्ती करून घेऊ शकले, असाच मोलाचा अभिप्राय सद्गुरु श्री माउली या आठव्या अभंगातून व्यक्त करतात. शेवटी मात्र ते हे नामामृत सोपे असले तरी सुलभ नाही, हेही सांगायला विसरत नाहीत. त्यांचे ते महत्त्वाचे सांगणे काय आहे, हे आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

5 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४० ॥*

हरिपाठाच्या आठव्या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज पुढे सांगतात, "नामस्मरण हेच सर्व साधनांचे सारभूत साधन अाहे व त्याचा जे आश्रय करतात, ते या द्वैतभ्रांतीच्या बंधनात सापडत नाहीत. वैष्णवजनांना या नामामृताची खरी गोडी लागल्यामुळे, योग्यांना लाभणा-या सतराव्या जीवनकलेचा लाभ झाल्याप्रमाणे अमरत्वाला पावले."
श्रीभगवंतांकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत आणि सर्वच मार्ग जरी ज्याच्या त्याच्या रुचीनुसार चांगले असले, तरीही त्या सर्वांचे सार हे नामस्मरणच होय. या साधनाचा जे मनापासून आश्रय करतात, त्यांना द्वैताची भ्रांती उरत नाही, ते श्रीहरींशी एकरूपच होऊन जातात. वैष्णवजनांना या नामरूपी अमृताची खरी गोडी नेमकी कळल्यामुळेच, ते हरिभक्तही योग्यांप्रमाणे सतराव्या जीवनकलेचा लाभ घेऊन अमर झालेले आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

4 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *४ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३९ ॥*

हरिपाठाच्या आठव्या अभंगात सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली, श्रीभगवंतांची हमखास प्राप्ती करवून देणा-या, सद्गुरुकृपेने लाभलेल्या नामामृताचे माहात्म्य प्रतिपादित करतात.
या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "सत्संगतीत राहून, मनावरच मनाची राखण ठेवून, ते आपल्या ताब्यात ठेवणे; हा लक्ष्मीपती श्रीहरींना आपल्या स्वाधीन करून घेण्याचा मार्ग आहे. त्यासाठी प्रत्यक्ष श्रीशंकरांनी जे रामनाम जिव्हारी जतन करून ठेवलेले आहे, तेच रामकृष्ण नामस्मरण, आपल्या जिव्हेने श्रद्धापूर्वक सतत करीत राहिले पाहिजे !"
श्रीभगवंतांचे दिव्य नाम हेच त्यांच्या प्राप्तीचे महत्त्वाचे साधन आहे, असे सर्व अनुभवी संतांचे प्रेमाचे सांगणे आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

3 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३८ ॥*

प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे एक कथा सांगत असत. एका मनुष्याने आपला सगळा ठेवा पुरून ठेवलेला होता. पण तो अकाली मेला. नंतर तोच त्या ठेव्यावर पिशाच होऊन बसून राहिला. खुद्द त्याचा मुलगा ते द्रव्य घ्यायला आला तरी तो त्याला छळू लागला. तसे मनुष्याने ज्या वासना निर्माण केलेल्या आहेत, त्यांचेच भूत त्याच्याच ठेव्यावर बसते. म्हणूनच सामान्यांना तो ठेवा मिळू शकत नाही.
पुढे मग तो मुलगा एका निष्णात मांत्रिकाकडे जाऊन पिशाचाचा बंदोबस्त करतो आणि मग ते द्रव्य त्याच्या हाती येते. तसे हा जो आत्मा-निधान आहे, त्याच्यावर आपल्याच वासनेचे भूत बसलेले आहे. ते जाण्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून शक्ती, युक्ती व ज्ञान मिळवून साधना करावी लागते. त्या साधनेने वासनांचे भूत जळून खाक होते व तो आत्मठेवा प्राप्त होतो. एकदा का ते आत्म-निधान लाभले की मग मनुष्य आनंदाची अनुभूती घेऊन त्यातच कायमचा रमून जातो. हेच सद्गुरु श्री माउलींचे या सातव्या अभंगातून आपल्याला सांगणे आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates