सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या आठव्या अभंगात म्हणतात, "संतांचें संगति मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥८.१॥" या चरणाचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, प्रत्येक प्राणिमात्र कोणा ना कोणाची संगत करूनच असतो. तो संगतीशिवाय राहू शकत नाही. त्यातही एक सोपे गणित आहे की, ज्याला ज्याची आवड त्याला तशाच प्रकारची संगत बरोबर मिळत असते.
जो व्यसनी असतो, त्याला व्यसनाधीन असलेल्या मनुष्याबद्दल आस्था वाटते व तो नेमका तशाच माणसाची संगत करतो. जो द्रव्यार्थी असतो त्याला, ज्याच्याजवळ पैसा आहे, अशाचीच संगत करावीशी वाटते. ज्याला कीर्तीची हौस, तो मोठमोठ्या हुद्देवाल्यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे, ज्याला जे व्यसन, त्यास त्याचा पुरवठा ज्याच्यातर्फे, त्याचीच संगत त्या व्यसनी माणसास करावीशी वाटते. ही झाली लौकिक जगातली पद्धत. पण संतांच्या संगतीचे मात्र तसे नसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment