22 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५६ ॥*

महात्म्यांच्या संकीर्तनाचे अलौकिकत्व सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "महात्म्यांच्या या कीर्तनरूप भक्तीने यमदमादिक साधने निर्बल ठरतात. मन:संयमाला कामच राहत नाही. इंद्रियांचे दमन करावेच लागत नाही."
कोणतीही साधना करण्यासाठी आधी काही विशिष्ट पात्रता साधकाच्या अंगी असावी लागते. त्यात यम व नियम हे प्रमुख आहेत. एकूण पाच यम व पाच नियम सांगितलेले आहेत.
याबद्दल प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज फार सुंदर सांगत की, "दुस-याशी कसे वागावे याची आखणी म्हणजे 'यम' आणि स्वत:शी कसे वागावे याचे ज्ञान म्हणजे 'नियम' !"
महात्म्यांच्या कृपेने होणा-या या संकीर्तन भक्तीमध्ये हे यम-नियम आपोआपच होऊ लागतात. प्रयत्न न करताच मनाचा संयम होऊ लागतो आणि इंद्रियांचे दमनही त्या संकीर्तनामुळे कष्ट न करताच होते.
प.पू.मामांच्या सांगण्याचा उद्या आपण आणखी थोडा विचार करू !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates