महात्म्यांचे अलौकिकत्व सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "महात्म्यांच्या सर्व इंद्रियांना शांततेने भूषविलेले असते; आणि त्यांच्या विशुद्ध चित्ताने श्रीभगवंतांच्या व्यापक स्वरूपाला कायमची गवसणी घातलेली असते."
साधू महात्म्यांच्या ठिकाणी शांतीचा अद्भुत विस्तार झालेला असतो. सामान्य माणूस क्रोधाविष्ट झाला की त्याचे सर्व शरीरही तसेच होते. त्या क्रोधाने त्याचे डोळे लालभडक होतात, ओठ थरथरू लागतात, श्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे होऊ लागतो, हातपाय देखील थरथरायला लागतात, दात ओठ खात, मोठ्या आवाजात तो भराभरा बडबडू लागतो. पण महात्म्यांच्या नुसत्या चित्तातच शांती असते असे नाही, तर त्यांच्या सर्व इंद्रियांच्या ठायी देखील ती भरून राहिलेली असते. ते सहसा क्रोधाविष्ट होतच नाहीत.
एवढेच नाही तर, त्यांच्या चित्ताने अपरंपार अशा श्रीभगवंतांच्या व्यापक स्वरूपालाही कायमची पूर्ण गवसणी घातलेली असते. त्यांचे साधनेने विशुद्ध झालेले चित्त इतके मोठे होते की ते साक्षात् श्रीभगवंतांनाही गवसणी घालू शकते. हे सामर्थ्य फक्त महात्म्यांच्याच ठायी पाहायला मिळते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment