॥ अमृतबोध ॥
१४ मे २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १४९ ॥
सद्गुरु श्री माउली महात्म्यांचे अलौकिकत्व सांगताना म्हणतात की, "हे महात्मे मोक्षाला फुटलेले कोंभच असतात. ते धैर्यगुणाचे आधारभूत स्तंभ असतात. निजानंदाने भरलेल्या समुद्रातून उचंबळून निघालेले नित्यप्रसन्न कुंभच असतात."
मोक्ष हा या महात्म्यांचा सहज विस्तारच असतो. ते मोक्षरूपच झालेले असतात. धैर्य या सद्गुणाचे तेच आधारस्तंभ असतात, म्हणूनच महात्म्यांच्या संगतीत किंवा त्यांच्या कृपेने सर्वसामान्य माणसालाही सर्वप्रकारचे धैर्य प्राप्त होत असते. त्यांच्या संगतीत धैर्य पैसावते.
उचंबळणा-या निजानंदरूप समुद्रातून भरून काढलेले आनंदकुंभ असतात हे महात्मे. त्यामुळेच त्यांच्या आतबाहेर तोच निजानंद व्यापून राहिलेला असतो. ते महात्मे आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच अलौकिक आनंदाचे भरभरून दानही देत असतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment