महात्म्यांचे दुसरे वैशिष्ट्य सद्गुरु श्री माउली सांगतात की, त्यांचे वैराग्य झोपेतही कायम असते.
वैराग्य म्हणजे कोणत्याही सुखोपभोगांविषयीची अनास्था. माणूस एखाद्या गोष्टीचा वरकरणी कितीही आव आणत असला, तरी झोपेतील बेसावध क्षणी त्याचे सत्य बाहेर पडतेच. यासंबंधातली नाना फडणवीसांची अनोळखी माणसाची मातृभाषा ओळखून दाखविण्याची चातुर्यकथा आपल्याला माहीतच आहे.
सद्गुरु माउली म्हणतात, या महात्म्यांच्या ठायी वैराग्य इतके दृढ झालेले असते की, झोपेतही ते नष्ट होत नाही. कार्यरत मनात तर ते वैराग्य असतेच पण सुप्त स्थितीतही ते जागते असते. देह झोपलेला असला तरी हा वैराग्यसूर्य त्याच्या अंतरी कायमच पूर्ण प्रकाशाने तळपत असतो. अशी तीव्र वैराग्याची स्थिती हे महात्म्यांचे भूषणच होय !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment