॥ अमृतबोध ॥
२० मे २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १५४ ॥
भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्याकडून होणारे अलौकिक संकीर्तनाचे महिमान स्वत: श्रीभगवंत स्वमुखाने अर्जुनाला सांगताना म्हणतात, "हे महापुरुष अत्यंत प्रेमभराने नित्य माझे नामसंकीर्तन करीत असतात आणि त्यामुळे त्यांना पापक्षलनार्थ इतर खटपटींची जरूर न राहता ते निष्पाप बनतात."
नामाचे संकीर्तन हे विशेष साधन आहे. नाम घेणे व त्याचे संकीर्तन करणे हे भिन्न आहे. सद्गुरुकृपेने त्या नामस्मरणाचे संकीर्तन होते. अतीव प्रेमभराने ते संकीर्तन होऊ लागल्यावर, पापाची नामोनिशाणीही शिल्लक राहात नाही. म्हणूनच पापक्षालनासाठी वेगळ्या खटपटी करण्याची मग आवश्यकताच उरत नाही. श्रीसद्गुरुकृपेने होणा-या त्या नामसंकीर्तन-भक्तीने ते महात्मे निष्पाप बनतात !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment