महात्म्यांची आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "धर्माविषयी या महात्म्यांना पूर्ण आस्था असते आणि त्यांचे मन नेहमीच सद्सद्-विवेकाचे पोषण करीत असते."
धर्म म्हणजे; मनुष्यजन्माला येऊन कसे वागावे? कसे वागू नये? याचे स्वानुभवी सिद्ध-महात्म्यांनी, ऋषिमुनींनी घालून दिलेले व स्वत: देखील आचरलेले नियम. यानुसार जो वागेल तो नि:संशय सुखी व समाधानी जीवन जगेल. असे सात्त्विकतेने जगल्यामुळे मनुष्याचे संपूर्ण आयुष्य आनंदातच व्यतीत होते. अशा लौकिक अभ्युदय व पारमार्थिक नि:श्रेयसकर धर्माविषयी महात्म्यांच्या मनात अतीव प्रेमादराची, आस्थेची भावना असते.
धर्मानुसार आचरण केल्यावर आपोआपच माणसाच्या मनात सत् काय व असत् काय याचा विवेक पूर्ण कार्यरत होतो. मग त्याच्याकडून कधीच चुकीचे व पुढे जाऊन पश्चात्ताप करावा लागेल असे वर्तन घडत नाही. महात्म्यांच्या ठायी हा विवेक परिपूर्णतेने प्रकटलेला असतो. त्यामुळेच अशा महात्म्यांना प्रमाण मानून वागणारे लोकही कालांतराने शाश्वत सुखी होतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment