30 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६३ ॥*

महात्म्यांचा आणखी एक थोर सद्गुण सद्गुरु श्री माउली सांगतात की, त्यांना कसलाही आपपर भावच नसतो. राजा असो किंवा रंक, त्यांच्या दृष्टीने दोघेही समानच असतात. शिवाय लहान-थोर असाही भेद त्यांच्या ठायी नसतो. ते सरसकट सर्वांना आपल्या आनंदाने वेष्टून टाकतात."
संतांच्या ठायी श्रीभगवंतांचा परमानंद परिपूर्ण भरलेला असतो. ते सदैव त्याच आनंदात रममाण झालेले असतात व तोच आनंद ते कोणताही भेद न मानता एकजात सर्वांना कृपापूर्वक प्रदानही करीत असतात. कारण श्रीभगवंतांचेच स्वरूप असणारे संत हे शाश्वत आनंदाची अपरंपार खाणच असतात !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates