संत आपल्या अथक परमार्थसाधनेने स्वत: तर उद्धरून जातातच, पण तेवढ्यावर थांबले तर ते संत कसले? ते जनांच्या तीव्र कळवळ्याने आपल्यासोबत असंख्य दु:खी-कष्टी जीवांचाही उद्धार करतात. लोकांना बाबा-पुता करून परमार्थ समजावण्याचे हे मोठ्या कष्टाचे कामही ते निरलसपणे, निरपेक्षपणे सेवावृत्तीने करतात. त्याविषयी प्रत्यक्ष श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात की, "महात्मे आपल्या कीर्तनरूप भक्तीने, पापक्षालनासाठी तीर्थयात्रादिक साधनांची आवश्यकताच न राहिल्यामुळे, त्यांना ओस पाडून टाकतात. यमलोकीची राहाटीच खुंटवतात."
तीर्थयात्रा केल्याने थोडेबहुत पाप नष्ट होते. पण त्याचे नियमही खूप असल्याने त्यातून म्हणावा तेवढा लाभ होत नाही, वरून प्रवासाचे तसेच गैरसोयीचे कष्ट होतात ते वेगळेच. पण नामसंकीर्तनरूप भक्तीने असले कोणतेही कष्ट न होता सुलभपणे पापक्षालन होते. महात्मे आपल्याबरोबर इतरांनाही भक्ती करायला लावून हे अलौकिक भाग्य तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांनाही कमी कष्टात प्रदान करतात. त्यामुळे यमलोकातील रौरव, तामिस्र, अंधतामिस्र इत्यादी विभिन्न नरकांची वर्दळच संपून जाते. पापच राहिले नाही तर ते भोगायला नरकात तरी कशाला जावे लागेल?
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment