श्रीभगवंत अर्जुनाला ख-या महात्म्यांची लक्षणे सविस्तर सांगत आहेत. देव म्हणतात, "ते महात्मे ज्ञानाच्या श्रेष्ठ अनुभवाला पावून, आपल्या ठायी शोभणा-या दैवी प्रकृतीला सतेजता आणून आणि सर्व जग मद्रूप जाणून, नित्य वाढत्या भक्तिभावाने सतत माझे अनुसंधान करतात."
ज्ञानाची श्रेष्ठ भूमिका म्हणजे, मी भगवत्स्वरूप आहे हे जाणणे, *"अहं ब्रह्मास्मि ।"* चे ज्ञान होणे. या भूमिकेला पोहोचूनही महात्म्यांची भक्तिभावना काही कमी होत नाही. मी अाणि माझे भगवंत एकच आहोत, हे जाणूनही त्यांचा प्रेमभाव सतत वाढताच राहतो. त्यांचे श्रीभगवंतांचे अनुसंधान त्या ज्ञानामुळे संपून न जाता, उलट अधिक गहिरे होत जाते. यालाच श्री माउली 'अद्वैती भक्ती' म्हणतात. ही 'ज्ञानोत्तर भक्ती'च खरी भक्ती होय. असे महात्मे हे आपल्या ठायी त्या भक्तीमुळे प्रकटलेल्या दैवी सद्गुणांना आणखी उजाळा आणतात. ते दैवी गुण या महात्म्यांच्या ठायी प्रकटल्यानेच अधिक शोभिवंत होतात, असे प्रत्यक्ष गुणनिधी श्रीभगवंत सांगत आहेत.
असे आत्मज्ञान होण्यापूर्वी केल्या जाणा-या व तुम्ही आम्ही नेहमी करीत असलेल्या गौणीभक्तीलाच 'उपासना' म्हटले जाते. ज्ञानापूर्वीची ती उपासना, ज्ञानोत्तर ती भक्ती; असेच शास्त्रप्रमाण आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
19 May 2017
*॥ अमृतबोध ॥* *१९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५३ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
May
(28)
- *॥ अमृतबोध ॥* *३१ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *३० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- ॥ अमृतबोध ॥२१ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १५५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १५४ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- ॥ अमृतबोध ॥१८ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १५२ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- *॥ अमृतबोध ॥* *१५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५...
- ॥ अमृतबोध ॥ १४ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४९ ॥
- ॥ अमृतबोध ॥१३ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४८ ॥
- ॥ अमृतबोध ॥१२ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १४७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ११ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४६ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४...
- ॥ अमृतबोध ॥ ९ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ८ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४३ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४२ ॥*
- *॥ अमृतबोध ॥* *६ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४१॥*
- *॥ अमृतबोध ॥* *५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४० ॥*
- *॥ अमृतबोध ॥* *४ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३...
- *॥ अमृतबोध ॥* *३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३८ ॥*
- *॥ अमृतबोध ॥* *१ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३६ ॥*
-
▼
May
(28)
0 comments:
Post a Comment