भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात. आज मार्गशीर्ष पौर्णिमा हे भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचे पावन पर्व आहे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *" श्रीदत्तात्रेय अवतार ' हा चिरंजीव का आहे? तर, '...
3 December 2017
29 September 2017
29
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २९ सप्टेंबर २०१७

भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हाती संतजनीं ॥ " यावर मिश्किल पण फार मार्मिक टिप्पणी करताना पू.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " संतजनांनी ' माझ्या हाती भक्ती द्यावी ' याचा अर्थ काय? भक्ती...
28 September 2017
28
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा - २८ सप्टेंबर २०१७

भक्ती हा शब्द खूपच प्रचलित असला तरी त्याचा खरा अर्थ फारच थोडे जाणतात. आपण जी काही करतो ती 'भक्ती' नसून 'उपासना' आहे. भक्ती 'करण्याची' गोष्टच नाही, ती तर 'कृपेने होण्याची' गोष्ट आहे ! शास्त्रांनी व संतांनी यावर सुरेख लिहून ठेवलेले आहे. सर्वांचे याबाबत एकमत आहे की, भक्ती ही प्राप्त व्हावी लागते आणि...
27 September 2017
27
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा - २७ सप्टेंबर २०१७

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा स्वजनांविषयीचा मोेह जाण्यासाठीच श्रीगीतेचा पावन उपदेश केला. कोणत्या ना कोणत्या रूपात मोह आपल्या प्रत्येकाच्या मनात असतोच. काम, क्रोध, लोभ, अहंकार व मत्सर हे पाच रिपू काही काळच प्रभाव दाखवतात, नंतर शांत होतात. पण मोह मात्र सतत जागताच असतो, कारण तोच अज्ञानाचे मूर्तिमंत...
26 September 2017
26
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २६ सप्टेंबर २०१७

॥ अमृतबोध ॥
जागर आदिशक्तीचा
२६ सप्टेंबर २०१७
आपण शरण जाऊन मागितलेल्या जोगव्याने परमकनवाळू श्रीसद्गुरूंना दया आली व त्यांनी आपल्यावर कृपा केली. आपल्या ठायी असणारी अनादि निर्गुण भगवती जगदंबा जागृत करून दिली. आपण ख-या अर्थाने आता ' सनाथ ' झालेलो आहोत ! पण ही जगदंबा कुंडलिनी शक्ती कोणत्या कार्यासाठी...
25 September 2017
25
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २५ सप्टेंबर २०१७

देवीच्या नवरात्रात जोगवा मागण्याची प्रथा आहे. जसा नवस केलेला असेल त्याप्रमाणे किंवा जी काय रूढी असेल त्यानुसार ओला किंवा कोरडा जोगवा मागतात. मात्र हा जोगवा पाचच घरी मागायचा असतो. घरोघरी मागितल्यास ती भीक होईल. जोगवा म्हणजे नुसती भिक्षा किंवा माधुकरी नव्हे. त्याला खोल अर्थ आहे.
ज्याला आपले शाश्वत...
24 September 2017
24
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २४ सप्टेंबर २०१७

चराचर विश्व निर्माण करणारी व ते सर्व व्यापून असलेली भगवती शक्ती, श्रीसद्गुरूंच्या कृपेने साधकाच्या ठायी जागृत होते. जागृत होते म्हणजे काय होते? हे प्रथम समजून घ्यायला हवे.
प्रत्येक जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. पण हे तो जाणतच नाही म्हणून स्वत:ला त्या परब्रह्माहून वेगळा मानतो. हे सर्व घडते त्या परब्रह्माच्याच...
23 September 2017
23
Sep
॥ अमृतबोध ॥जागर आदिशक्तीचा - २३ सप्टेंबर २०१७

एकदा देव दानवांचे मोठे युद्ध झाले. त्यात परब्रह्माच्या कृपेने देव विजयी झाले. पण देवतांना वाटले की हा आमचाच विजय आहे. ब्रह्माने देवांचा अहंकार जाणला व ते विचित्र यक्ष रूप घेऊन त्यांच्या समोर प्रकटले. देवांना काही ते रूप ओळखता आले नाही. म्हणून त्यांनी अग्निदेवांना ते रूप जाणण्यासाठी पाठवले. समोर...
22 September 2017
22
Sep
॥ अमृतबोध ॥जागर आदिशक्तीचा - २२ सप्टेंबर २०१७

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज भगवती आदिशक्ती जगदंबेच्या अवतरणाची लीलाकथा सांगत आहेत. परमात्मा आधी एकटाच होता. त्याला त्या एकटेपणाचा कंटाळा आला व त्यामुळे " आपण बहुत व्हावे " असा त्याच्या मनात संकल्प उठला. त्याबरोबर त्याच्यापासून त्याची शक्ती बाहेर पडली व तिने आपल्यामधूनच सा-या विश्वाची उत्पत्ती...
21 September 2017
21
Sep
॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २१ सप्टेंबर २०१७

॥ अमृतबोध ॥
जागर आदिशक्तीचा
पहिली माळ
२१ सप्टेंबर २०१७
आजपासून आदिशक्ती भगवती श्रीजगदंबा मातेचा नवरात्रोत्सव! प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे भगवती आदिशक्तीचे निस्सीम उपासक होते. त्यांच्या सखोल, स्वतंत्र व मूलगामी चिंतनातून प्रकटलेले आदिशक्तीचे चिन्मय स्वरूप-वैभव, " जागर आदिशक्तीचा " मधून...
30 June 2017
30
Jun
*॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९३॥*
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, *"रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
या चरणाच्या विवरणात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नामस्मरणाच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा व फारसा कुठेही न आलेला एक मौलिक सिद्धांत स्पष्ट करून सांगतात.
पू.मामा म्हणतात, "असा नियम आहे की, मूळ *'ॐ तत् सत्'* हे तत्त्व आहे, अगर मूळ मंत्र आहे. माउलींनी त्याचेच स्वरूप...
29 June 2017
29
Jun
*॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९२ ॥*
श्रीराम व श्रीकृष्ण हे भिन्न नाहीत. ते एकाच श्रीविष्णूंचे अवतार असून, कार्य पूर्ण झाले की पुन्हा त्या विष्णूंप्रतच जातात. हेच माउली अभंगाच्या दुस-या चरणात सांगतात की,
*"उपजोनि करंटा नेणें अद्वय वाटा ।*
*रामकृष्णीं पैठा कैैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्राणिमात्र या जगात जन्मास येतो; म्हणजेच उपजतो. परंतु त्यास जर आल्याची वाट माहीत नसेल, तर...
28 June 2017
28
Jun
*॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९१ ॥*
हरिपाठाच्या नवव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सर्वव्यापी तत्त्वाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप व्यर्थ होय. तसेच एकदेशीय जपज्ञान किंवा माहात्म्यज्ञान हेही व्यर्थच म्हणायला हवे. असा अर्थ कशावरून काढला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात माउली स्वत:च तसे सूचित करतात की, *"रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.१॥"*
राम हा अलग, कृष्ण हा अलग व पंढरीचा पांडुरंग...
27 June 2017
27
Jun
*॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९० ॥*
भगवान श्री वामनांनी, "तिसरे पाऊल कुठे ठेवू?" असे विचारल्यावर, बली राजाने आपले मस्तक झुकवले व त्यावर पाऊल ठेवायची विनंती केली. कारण बली हा ज्ञानीभक्त होता. मी देह नसून देही आहे, हे तो यथार्थ जाणत होता. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून देह बनलेला आहे; तर त्या देहात नांदणारा, त्या देहातील देही जो जीव, तो तर ब्रह्माचाच अंश असल्याने तो कधीच त्या देहात विलीन होऊ शकत नाही. तेव्हा भगवंतांनी...
26 June 2017
26
Jun
॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की, "विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।" याचा गूढार्थ सांगण्यासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीभगवंतांच्या श्री वामन अवताराचे उदाहरण घेतात.
बटू वामन बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यांनी बलीकडे तीन पावले जमीन मागितली. ती मिळताच, एका पावलात सप्त स्वर्ग व्यापले, दुस-या पावलात सप्त पाताळ व्यापल्यावर,...
25 June 2017
25
Jun
*॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८८ ॥*

*प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज जयंती !!*
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील नवव्या अभंगाची प्रस्तावना करताना म्हणतात, "सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा मोठा गोड अभंग आहे. तसे पाहिले तर, सर्वच अभंग एकापेक्षा एक असे वरचढ अाहेत. परंतु...
24 June 2017
24
Jun
*॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८७ ॥*
हरिपाठाच्या नवव्या अभंगाचा उर्वरित सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीसद्गुरूंच्या उपदेशावाचून ज्ञान होणार नाही; आणि त्या ज्ञानाशिवाय द्वैतभ्रांती जाणार नाही. अपरोक्ष ज्ञानानुभव होण्यासाठी ईश्वराच्या सगुण-स्वरूपाचे नित्य ध्यान जडले पाहिजे. तसेच मी-तू पणाची सर्व भाषा संपून, अखंड नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे; असे श्री ज्ञानेश्वर महाराज येथे स्पष्ट सांगतात. "
मी (जीव)...
23 June 2017
23
Jun
॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या नवव्या अभंगात दुर्दैवी अभक्तांविषयी खेद व्यक्त करतात.
या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "कितीही ज्ञानी असला तरी, महाविष्णू श्रीहरींच्या रामकृष्णादी सगुण अवतारांच्या लीला गाण्यात आणि त्यांचे नामस्मरण करण्यात ज्यांचे...
22 June 2017
22
Jun
॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७

सर्वत्र दुर्लभ असणारे नाम खरेतर सुलभ असल्याचा अनुभव कसा येतो, हे सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीगुरूंची सेवा करून, त्यांच्याकडून ते शक्तियुक्त, दुर्लभ नाम मिळते. मग प्रेमाने, श्रद्धेने व आदराने साधना झाल्यावर, तेच नाम किती सुलभ आहे याचा अनुभव येतो. इतकेच नाही तर ते घ्यावेही...
Subscribe to:
Posts (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
►
September
(9)
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २९ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा - २८ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा - २७ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २६ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २५ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २४ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥जागर आदिशक्तीचा - २३ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥जागर आदिशक्तीचा - २२ सप्टेंबर २०१७
- ॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २१ सप्टेंबर २०१७
-
►
June
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७
-
►
September
(9)