सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की, "विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।" याचा गूढार्थ सांगण्यासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीभगवंतांच्या श्री वामन अवताराचे उदाहरण घेतात.
बटू वामन बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यांनी बलीकडे तीन पावले जमीन मागितली. ती मिळताच, एका पावलात सप्त स्वर्ग व्यापले, दुस-या पावलात सप्त पाताळ व्यापल्यावर, 'तिसरे पाऊल कोठे ठेवू?' म्हणून विचारले.
बलीराजा पण काही कमी कमी नव्हता. भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा परम भगवद्भक्त असा नातूच होता तो. त्याला माहीत होते की, प्रत्येक मानवाच्या देहात जीवरूपाने देवच असतात. असे ज्याला कळते, तोच खरा मानव होय. परंतु भ्रमाने मनुष्य 'मी म्हणजे देह' असे म्हणतो. पण बलीचे तसे नव्हते. त्याला हे ज्ञान असल्यामुळेच त्याने भगवंतांच्या प्रशनाचे सुयोग्य उत्तर दिले. त्याने भगवान वामनांना आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवायला सांगितले.
प.पू.श्री.मामा बलीच्या या कृतीमागील कारणही फार सुंदर समजावून सांगतात. ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment