9 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७३ ॥*

सद्गुरु श्री माउली संतांच्या संगतीत राहण्यास सांगतात. त्याविषयी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, संगतीचा अर्थ लोक भलताच लावून, संतांजवळ राहणे एवढाच करून, त्यांच्याजवळचे जे काय असेल ते लुबाडण्याकडेच जर प्रवृत्ती असेल; तर त्या संगतीचा उपयोग काय?
एका श्रीगुरूंजवळ एक शिष्य पंधरा वर्षे राहिला आणि त्याने श्रीगुरूंच्या जवळ असलेले डबोले पळविले. एवढेच त्याचे भांडवल जर लोक मानू लागले, तर त्या शिष्याचे कल्याण होणारच नाही; परंतु त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांचेही अकल्याणच होईल; याची वाट काय? म्हणून 'संतांचे संगति'चा मथितार्थ लक्षात घेतला पाहिजे.
*_संतांचे संगति_ म्हणजे संतांनी दाखविलेल्या मार्गाने, अभ्यासबळावर आक्रमण करून अंतिम ध्येय साधणे होय !*
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates