10 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७४ ॥*

*'संतांचे संगति'*नेच अंतिम ध्येय साधले जाते. पण हे न साधायला मन आड येते. त्यासाठीच सद्गुरु श्री माउली सांगतात, *' मनोमार्ग गति ।'* 
मनाच्या मार्गाविषयी आता प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज एक विशेष संदर्भ सांगत आहेत. ते म्हणतात, "मनाला मार्ग दाखविणारा व गती देणारा प्राणच होय. त्याच्यातर्फे मन गेले, तरच उपयोग होतो. एवढ्याने जर भागले नाही; तर त्या प्राणरूपी घोड्यावर भगवतीशक्तीचे आरोहण झाले, म्हणजे त्या शक्तीच्या योगाने प्राण व्यवस्थित पंथाने जातो व त्याबरोबरच मन जाते. म्हणूनच या चरणाच्या शेवटी माउली म्हणतात, *'आकळावा श्रीपति येणें पंथे ॥हरि.८.१॥'* श्रीहरीचे आकलन व्हावे असे वाटत असेल, तर याच पंथाने म्हणजे मार्गाने गेले पाहिजे !
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates