हरिपाठातील आठव्या अभंगाच्या दुस-या चरणात सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "आत्मा जो शिवाचा रामजप ॥८.२॥" प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या चरणाचा गूढार्थ सांगतात की, "काही जण याचा आग्रहाने भलताच अर्थ लावतात की, भगवान शिवांनी हलाहल विष घेतले व ते कंठात धारण केले. त्याचा दाह शमन व्हावा म्हणून रामनामाचा जप केला. या कथेचा गर्भितार्थ वेगळाच आहे.
आता विचार केला तर; 'राम' नामातील 'रं' या बीजाची देवता अग्नी आहे. अग्नीत अग्नी टाकला तर, पहिला विझतो की वाढतो? याचा विचार केला म्हणजे लक्षात येते.
म्हणूनच याठिकाणी अर्थ थोडा वेगळा होतो. येथे 'रामजप' म्हणजे आत्माराम जो परमात्मा आहे, त्याचा जप जो अखंड चालू आहे, त्याचेच भगवान शिवांनी अनुसंधान केले. त्यामुळेच तो दाह शमला. यावर सद्गुरु श्री माउली स्पष्टच सांगतात, "शिवनाम शीतल मुखीं । सेविं पा कापडिया रे ॥(स.सं.ज्ञा.७२९.१)" म्हणजे शिवांनी शिवांचाच म्हणजेच आपल्या आत्मारामाचाच जप केला, कारण ते शिवनामच शीतल आहे, त्यायोगे हलाहलाचा दाह शांत झाला.
याचा आणखी खुलासा सद्गुरु श्री माउली पुढील कडव्यात करतात."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment